एक्स्प्लोर

Parbhani Crime : 25 हजारांच्या खंडणीसाठी दिवसाढवळ्या विद्यार्थ्याचं अपहरण, रेल्वे उड्डाणपुलावरुन खाली फेकलं

Parbhani Crime News : परभणीच्या मानवत शहरात 19 वर्षीय विद्यार्थ्याचं अपहरण करून खंडणीसाठी मारहाण करत रेल्वे उड्डाणपुलावरून खाली फेकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

परभणी : जिल्ह्यातील मानवत शहरात दिवसाढवळ्या घडलेल्या एका धक्कादायक घटनेनं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. डी.फार्मसीचं शिक्षण घेणाऱ्या 19 वर्षीय विद्यार्थ्याचं अपहरण करून त्याच्याकडून खंडणी मागण्यात आली. पैसे न दिल्यामुळे त्याला थेट रेल्वे उड्डाणपुलावरून खाली फेकल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.

पीडित विद्यार्थी सय्यद सुफियान सय्यद शाकेर हा मानवत येथील फार्मसी महाविद्यालयात प्रथम वर्षात शिक्षण घेतो. सोमवारी सकाळी सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास तो कॉलेजला जात असताना महाराणा प्रताप चौक परिसरात एक अल्टो कार त्याच्या जवळ येऊन थांबली. कारमधील मास्कधारी इसमांनी जबरदस्तीने त्याला गाडीत बसवत अपहरण केलं.

Kidnapping Case Parbhani : 25 हजारांची खंडणी, न दिल्याने हल्ला

अपहरणानंतर आरोपींनी विद्यार्थ्याकडे 25 हजार रुपयांची मागणी केली. मात्र त्याच्याकडे पैसे नसल्याचं समजताच आरोपी संतापले. त्यांनी विद्यार्थ्याकडील असलेले 1 हजार रुपये काढून घेतले आणि त्याला बेदम मारहाण केली. यानंतर आरोपींनी मानवत रोडवरील रेल्वे उड्डाणपुलावर नेऊन विद्यार्थ्याला खाली फेकून दिलं. या अमानुष घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

Student Condition Update : दोन्ही पाय फ्रॅक्चर, मणक्याला गंभीर दुखापत

या हल्ल्यात विद्यार्थ्याचे दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले असून मणक्यालाही गंभीर दुखापत झाली आहे. जखमी अवस्थेत विद्यार्थ्याने आपल्या वडिलांशी संपर्क साधला. त्यानंतर त्याला तातडीने मानवत ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं. प्राथमिक उपचारानंतर त्याची प्रकृती गंभीर असल्यामुळे पुढील उपचारासाठी परभणी येथे हलवण्यात आलं आहे.

Parbhani Police Investigation : गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू

या प्रकरणी पोलिसांनी पीडित विद्यार्थ्याचा जबाब नोंदवला असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगानं फिरवली आहेत. दिवसाढवळ्या अशा प्रकारे अपहरण आणि हल्ला झाल्यानं मानवत शहरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून नागरिकांनी कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

ही बातमी वाचा:

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime News: नवी कोरी गाडी गोल-गोल फिरवून स्टंट; शूट अन् ड्रोन, आळंदीत रिलस्टारसह चौघांवर गुन्हा दाखल, इनोव्हाही पोलिसांनी केली जप्त, नेमकं काय घडलं?
नवी कोरी गाडी गोल-गोल फिरवून स्टंट; शूट अन् ड्रोन, आळंदीत रिलस्टारसह चौघांवर गुन्हा दाखल, इनोव्हाही पोलिसांनी केली जप्त, नेमकं काय घडलं?
Akola News: अकोल्यात अवैध सावकारीविरोधात मोठी कारवाई, एपीएमसीसह 28 ठिकाणी छापे; संचालकही चाैकशीच्या फेऱ्यात, 11 जणांच्या तक्रारीनंतर सहकार विभागाच्या नेतृत्वात धाडसत्र
अकोल्यात अवैध सावकारीविरोधात मोठी कारवाई, एपीएमसीसह 28 ठिकाणी छापे; संचालकही चाैकशीच्या फेऱ्यात, 11 जणांच्या तक्रारीनंतर सहकार विभागाच्या नेतृत्वात धाडसत्र
Nashik Crime News: दारूच्या नशेत मित्रच बनले वैरी! दगडी जात्याने डोक्यात वार करून वाहन चालकाला संपवलं, नाशिकमध्ये खळबळ
दारूच्या नशेत मित्रच बनले वैरी! दगडी जात्याने डोक्यात वार करून वाहन चालकाला संपवलं, नाशिकमध्ये खळबळ
Desaiganj Accident: सौर ऊर्जा झटका मशीन यंत्राच्या विजेच्या जबर धक्का; दोन सख्या भावांचा जागीच दुर्दैवी अंत; गडचिरोलीच्या देसाईगंजमध्ये खळबळ
सौर ऊर्जा झटका मशीन यंत्राच्या विजेचा जबर धक्का, संख्या भावाला वाचवण्यासाठी गेलेल्या दुसऱ्या भावाचाही जागीच दुर्दैवी अंत, गडचिरोलीच्या देसाईगंजमध्ये शोककळा

व्हिडीओ

Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?
Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ध्रुव राठीला घरातून उचलल्यानंतर अभिजित दिपके, आशुतोष रांका आणि सौरभ दासना महिला पोलिसांनी थेट विमानात घुसून ताब्यात घेतलं, विमानतळावर शेकडो गाड्यांचा फौजफाटा, सीजेपीच्या लीगल टीम हेडला सुद्धा उचललं
ध्रुव राठीला घरातून उचलल्यानंतर अभिजित दिपके, आशुतोष रांका आणि सौरभ दासना महिला पोलिसांनी थेट विमानात घुसून ताब्यात घेतलं, विमानतळावर शेकडो गाड्यांचा फौजफाटा, सीजेपीच्या लीगल टीम हेडला सुद्धा उचललं
CJP Protest Delhi: आंदोलन पेटण्याआधीच दिल्ली पोलिसांनी ध्रुव राठीला उचललं, आता अभिजीत दिपकेंनाही ताब्यात घेणार? दिल्ली विमानतळावर सुरक्षेत प्रचंड वाढ
आंदोलन पेटण्याआधीच दिल्ली पोलिसांनी ध्रुव राठीला उचललं, आता अभिजीत दिपकेंनाही ताब्यात घेणार? दिल्ली विमानतळावर सुरक्षेत प्रचंड वाढ
Pune Crime News: नवी कोरी गाडी गोल-गोल फिरवून स्टंट; शूट अन् ड्रोन, आळंदीत रिलस्टारसह चौघांवर गुन्हा दाखल, इनोव्हाही पोलिसांनी केली जप्त, नेमकं काय घडलं?
नवी कोरी गाडी गोल-गोल फिरवून स्टंट; शूट अन् ड्रोन, आळंदीत रिलस्टारसह चौघांवर गुन्हा दाखल, इनोव्हाही पोलिसांनी केली जप्त, नेमकं काय घडलं?
Sanjay Raut on Delhi Protest: एक कॉकरोच सरकार को.... संजय राऊतांनी नाना पाटेकरांचा डायलॉग मारत सरकारला डिवचलं, म्हणाले...
एक कॉकरोच सरकार को.... संजय राऊतांनी नाना पाटेकरांचा डायलॉग मारत सरकारला डिवचलं, म्हणाले...
Donald Trump : सलग दुसऱ्या वर्षी शांततेच्या नोबेल पुरस्काराची हुलकावणी, डोनाल्ड ट्रम्प नॉर्वेवर भडकले... तुमचा निर्णय कधीच विसरणार नाही म्हणत थेट इशारा दिला
सलग दुसऱ्या वर्षी शांततेच्या नोबेल पुरस्काराची हुलकावणी, डोनाल्ड ट्रम्प नॉर्वेवर भडकले...
Video: शेतकरी आंदोलनाप्रमाणेच सीजेपी आंदोलनातही रस्त्यात खिळे पसरले, दिल्लीच्या सीमांवरही थेट सिमेंट बॅरिकेड, तिकडं जंतर मंतर 2.0 साठी अवघी जेनझी दिल्लीच्या रस्त्यांवर, अनेकांची धरपकड
Video: शेतकरी आंदोलनाप्रमाणेच सीजेपी आंदोलनातही रस्त्यात खिळे पसरले, दिल्लीच्या सीमांवरही थेट सिमेंट बॅरिकेड, तिकडं जंतर मंतर 2.0 साठी अवघी जेनझी दिल्लीच्या रस्त्यांवर, अनेकांची धरपकड
Delhi CJP Protest: राजधानी दिल्लीत अघोषित लॉकडाऊन! पोलिसांच्या अभेद्य चिरेबंदीला अन् छावण्यांना सुद्धा न घाबरता जेन झी बॅनरसह जंतर मंतरवर सकाळपासूनच धडकली
राजधानी दिल्लीत अघोषित लॉकडाऊन! पोलिसांच्या अभेद्य चिरेबंदीला अन् छावण्यांना सुद्धा न घाबरता जेन झी बॅनरसह जंतर मंतरवर सकाळपासूनच धडकली
Pune MPSC Protest: पुणे MPSC आंदोलनाबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यात दुसरा गुन्हा दाखल; नेमकं काय आहे कारण? शिवराज मोरेंसह या 5 नावांचा समावेश
पुणे MPSC आंदोलनाबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यात दुसरा गुन्हा दाखल; नेमकं काय आहे कारण? शिवराज मोरेंसह या 5 नावांचा समावेश
Embed widget