Nanded News नांदेड : नांदेडमध्ये असलेल्या संजय भंडारी फायनान्सकडे (Sanjay Bhandari Finance) आयकर विभागाने (Income Tax Department) छापा टाकत मोठी कारवाई केली. आयकर विभागाने शुक्रवारी केलेल्या या छापेमारीत 170 कोटीची बेहिशोभी मालामत्ता जप्त करण्यात आली आहे. त्यात आता 14 कोटी रुपये रोख, तर 8 किलोचे दागिने सुद्धा जप्त करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. 14 कोटीची रोकड मोजण्यासाठी आयकर विभागाला 14 तास लागल्याचे बोलले जात आहे. तर या कारवाईत काही महत्वपूर्ण दस्तावेज सुद्धा आयकर विभागाच्या हाती लागले आहे.


आयकर विभागाची हि कारवाई गेल्या 72 तासापासून सुरु असून अद्याप पोलीस आणि आयकर विभाग पुढील तपास करत आहेत. या घटनेने सध्या नांदेड शहरात एकच खळबळ उडाली आहे. अशातच या तपासाचे धागेदारे आणखी उलगडत असताना नवनवीन माहिती हाती लागत आहे. मात्र, अल्पावधीतच  कोट्यवधींची माया जमावणारे हे फायनान्सर भंडारी आहेत तरी कोण? हा प्रश्न आता साऱ्यांना पडला आहे.  


कोण आहे फायनान्सर भंडारी ?


नांदेड मधील शिवाजीनगर भागात भंडारी यांचा निवस्थानी आयकर विभागाने छापा मारला. त्यानंतर भंडारी यांच्या संस्था आदिनाथ अर्बन मल्टिस्टेट या ठिकाणी चौकशी करत त्यांचा घरासह सर्व आस्थापनांची  आयकर विभागे चौकशी केली. त्यानंतर निवस्थानी जाऊन घराची तपासणी केल्यानंतर 14 कोटी रूपय मिळाले. तर  8 किलो सोन देखील जप्त करण्यात आले. भंडारी हे 7 भाऊ आहेत.महावीर भंडारी  संजय भंडारी, पदम भंडारी, विनय भंडारी, संतोष भंडारी, आशिष भंडारी, विजय भंडारी हे ते 7 भाऊ आहेत. गेल्या 15 वर्षापासून संजय भंडारी हे बीसी फायनान्सच्या व्यवसायात उतरले. 


1 लाख रुपयांसाठी 11 हजारांची कपात 


फायनान्स नंतर त्यांनी गोल्ड स्कीम देण्याचे काम सुरू केले. त्यानंतर भंडारी यांनी बांधकाम व्यवसाय आणि बिल्डरशीप, वाहन कर्ज, डेली फायनान्सच्या माध्यमातून लाखोंचा वाटप केला. 1 लाख रुपयांसाठी ते 11 हजार रुपय कपात करत होते. तर 100 दिवसात 1000 रुपय हे डेली जमा करावं लागतं होते. रोज पैसे चुकल्यास त्यांना दंड देखील आकरला जात होता. त्यानंतर गोल्ड स्कीममध्ये 1 किलो गोल्ड देण्याची स्कीम देखील त्यांनी चालवली होती. त्यासाठी त्यांनी गुंतवणुक करण्यासाठी एक टीमही तयार केली होती.  


अनेक व्यवसायात सक्रिय 


भंडारी यांच्याकडे मोठे व्यापारी, डॉक्टर, उद्योजक आणि राजकिय नेतेमंडळी सुद्धा येत असून भंडारी यांचे अनेकांसोबत मैत्रीपूर्ण संबंध होते. त्यामुळे भंडारी यांच्याकडे सतत अनेकांचे येण-जाणे सुद्धा होत होतं. नांदेड शहरात जम बसल्यानंतर भंडारी यांनी मराठवाड्यात त्यांचे फायनान्सचे एक नेटवर्क तयार केले होते. त्यावेळी त्यांच्याकडे कोट्यवधींच्या बीसी साठी 3 ते 5 टक्याचे कमिशन घेत होते. याच व्यवसायात  त्यांनी कोट्यवधींची पैसा कमावला आणि तोच पैसा त्यांनी बाजारात पुन्हा फिरवला. पुढे प्लॉट व्यवसायात जागा नावाने करून घेणे आणि त्यांना फायनान्स करणे हे सुद्धा भंडारी यांनी केले. तसेच इतर ठिकाणी पैसे पाठवण्यासाठी हवालाचे काम सुद्धा भंडारी करत होते. आयकर विभागाची धाड पडण्याची आधी संतोष भंडारी यांनी कोट्यवधींची प्लॉट त्यांनी 25 हजार चौरसफुटाच्या दराने घेतल्याची चर्चा आहे.  


इतर महत्वाच्या बातम्या