एक्स्प्लोर

Akola Crime: संतापजनक! रस्त्यावरून जाणाऱ्या मुली पाहून नजर फिरली, दुचाकीस्वाराने मागून येत केला छातीला स्पर्श अन्...CCTV समोर

या घटनेमुळे विद्यार्थिनींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक नागरिकांनीही या प्रकाराबाबत संताप व्यक्त केला आहे.

Akola Crime: राज्यात गुन्हेगारी घटना काही थांबायचं नाव घेत नाहीत. अकोला शहरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याची चिंता व्यक्त होत असतानाच आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रस्त्यावरून पायी चालत जाणाऱ्या दोन मुलींमधील एका मुलीची दुचाकीवरून आलेल्या तरुणाने छेड काढल्याची घटना उघडकीस आली असून संपूर्ण प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. (Akola Crime News)

ही घटना अकोला शहरातील जवाहर नगर परिसरात घडली. हा भाग कोचिंग क्लासेससाठी ओळखला जातो. शहरासह ग्रामीण भागातून अनेक मुली येथे शिकवणीसाठी येत असतात. त्यामुळे या घटनेमुळे विद्यार्थिनींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक नागरिकांनीही या प्रकाराबाबत संताप व्यक्त केला आहे.

Akola Crime:नेमकं घडलं काय?

मिळालेल्या माहितीनुसार अकोला शहरातील जवाहर नगर परिसरात एका मुलीचा छेड काढल्याचा नवा व्हिडिओ समोर आलाय. रस्त्यावरून चालत जाणाऱ्या दोन मुलींपैकी एका मुलीची खुलेआम तरुणाने छेड काढत पसार झालाय.. दुचाकीस्वाराने पाठीमागून येत मुलीच्या छातीला स्पर्श केलाय आणि तिच्या गळ्यातील आयडीकार्ड अर्थातच ओळखपत्र घेऊन दुचाकीने पळाला आहे. ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालीय. अकोला शहरातील कोचिंग क्लासेस म्हणून प्रसिद्ध असलेला परिसर जवाहर नगर परिसरात ही घटना घडली आहे.. शहरासह ग्रामीण भागातून मुली शिकवणी वर्गासाठी या परिसरात येत असतात. त्यामुळं परिसरात मोठ्या प्रमाणात दामिनी पथकाची गस्ती वाढवावी, अशी मागणी नगरसेवक आशिष पवित्रकार यांनी केलीय ..

दरम्यान, या परिसरात यापूर्वीही मुलींच्या छेडछाडीच्या घटना घडल्याची चर्चा आहे. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना वाढवण्याची मागणी जोर धरत आहे. अकोल्याचे नगरसेवक आशिष पवित्रकार यांनी या भागात दामिनी पथकाची गस्त वाढवण्याची मागणी केली आहे. पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

लग्नाच्या मिरणवूकीत नंग्या तलवारी फिरवल्या

काही दिवसांपूर्वी अकोल्यात लग्नाच्या मिरणवूकीत नंग्या तलवार फिरवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. डीजेच्या तालावर काही तरुण या ठिकाणी नंग्या तलवारी फिरवत होते, याचं वेळी बाजूला उभ्या असलेल्या एका लहान मुलाच्या डोक्याला ही तलवार लागली. यात मुलाच्या डोक्याला मोठा मार लागला. तर त्याच्या डोक्याला 5 टाके लागलेमुलावर बाळापूरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं होतं. या प्रकरणी बाळापूर शहर पोलीस पुढील तपास करतायेत. दरम्यान, एखाद्या कार्यक्रमात म्यानातून तलावर उपसली तरी प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई होते.

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur News: कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा मोठा स्फोट, भिंतींच्या अक्षरशः ठिकऱ्या उडाल्या; सुर्वे नगरमध्ये मध्यरात्री नेमकं काय घडलं?
कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा मोठा स्फोट, भिंतींच्या अक्षरशः ठिकऱ्या उडाल्या; सुर्वे नगरमध्ये मध्यरात्री नेमकं काय घडलं?
Jalgaon Crime News : चारित्र्यावर संशय, नवऱ्यानं संतापात पत्नीच्या अंगावर दारू ओतली अन्....; जळगाव जिल्ह्यातील पाचोरा हादरलं!
चारित्र्यावर संशय, नवऱ्यानं संतापात पत्नीच्या अंगावर दारू ओतली अन्....; जळगाव जिल्ह्यातील पाचोरा हादरलं!
बालकांच्या शोषणाशी संबंधित अश्लील व्हिडिओंचा काळाबाजार, रॅकेट चालवणाऱ्या सराईत गुन्हेगारांना अटक 
बालकांच्या शोषणाशी संबंधित अश्लील व्हिडिओंचा काळाबाजार, रॅकेट चालवणाऱ्या सराईत गुन्हेगारांना अटक 
गडचिरोलीत नक्षलवादावर आणखी एक घाव! हल्ल्याच्या उद्देशाने जमिनीत पुरलेला माओवाद्यांचा मोठा शस्त्रसाठा जप्त
गडचिरोलीत नक्षलवादावर आणखी एक घाव! हल्ल्याच्या उद्देशाने जमिनीत पुरलेला माओवाद्यांचा मोठा शस्त्रसाठा जप्त

व्हिडीओ

Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report
Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: 'ज्यांनी आमचं संरक्षण केलं पाहिजे तेच आम्हाला चोपून काढत आहेत' मुंबई पोलिसांची गाडी भर रस्त्यात अडवणाऱ्या रियासह देशातील तरुणी राहुल गांधींच्या भेटीला
Video: 'ज्यांनी आमचं संरक्षण केलं पाहिजे तेच आम्हाला चोपून काढत आहेत' मुंबई पोलिसांची गाडी भर रस्त्यात अडवणाऱ्या रियासह देशातील तरुणी राहुल गांधींच्या भेटीला
आता तर विधिमंडळ पक्ष दुसऱ्याच राजकीय पक्षात विलीन होत आहेत, लोकशाही मूल्यांचे रक्षण कसे करायचे, याचा निर्णय तुम्हालाच घ्यावा लागेल; कपिल सिब्बलांची 'सर्वोच्च' साद
आता तर विधिमंडळ पक्ष दुसऱ्याच राजकीय पक्षात विलीन होत आहेत, लोकशाही मूल्यांचे रक्षण कसे करायचे, याचा निर्णय तुम्हालाच घ्यावा लागेल; कपिल सिब्बलांची 'सर्वोच्च' साद
इकडं जंतर मंतरवर विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण, राम मंदिर लुटीवर चर्चेसाठी विरोधक एकवटले अन् तिकडं संसदेत पराभव होऊन सुद्धा केंद्र सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा आणण्याच्या तयारीत
इकडं जंतर मंतरवर विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण, राम मंदिर लुटीवर चर्चेसाठी विरोधक एकवटले अन् तिकडं संसदेत पराभव होऊन सुद्धा केंद्र सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा आणण्याच्या तयारीत
Tukaram Mundhe: ॲनालॉग पनीर काय आहे, 1 वर्षांनंतरही बंदी वाढवणार का? तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, म्हणाले, आरोग्याशी तडजोड नाही
ॲनालॉग पनीर काय आहे, 1 वर्षांनंतरही बंदी वाढवणार का? तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, म्हणाले, आरोग्याशी तडजोड नाही
Mumbai Mayor Bunglow : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग; टीकेची झोड उठताच महापौर रितू तावडेंचं स्पष्टीकरण, म्हणाल्या महापौर बंगल्याचा चुकून उल्लेख
मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग; टीकेची झोड उठताच महापौर रितू तावडेंचं स्पष्टीकरण, म्हणाल्या महापौर बंगल्याचा चुकून उल्लेख
FDA Raid Analog Paneer: संभाजीनगरमधील डेअरीवर एफडीएची धाड, ड्रममध्ये भरलेलं पनीर अन् तूप सापडलं, किळस आणणारे फोटो
संभाजीनगरमधील डेअरीवर एफडीएची धाड, ड्रममध्ये भरलेलं पनीर अन् तूप सापडलं, किळस आणणारे फोटो
वाल्मिक कराडला नागपूर कारागृहात पाठवा, पोलिसांवरही गुन्हे दाखल करा; सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
वाल्मिक कराडला नागपूर कारागृहात पाठवा, पोलिसांवरही गुन्हे दाखल करा; सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
Rahul Gandhi on Amit Shah: विद्यार्थ्यांचे गुन्हेगार असल्यानेच अमित शाह तोंड लपवत आहेत; गृहमंत्री संसदेत येत नसल्याने राहुल गांधींचा हल्लाबोल
विद्यार्थ्यांचे गुन्हेगार असल्यानेच अमित शाह तोंड लपवत आहेत; गृहमंत्री संसदेत येत नसल्याने राहुल गांधींचा हल्लाबोल
Embed widget