Gondia News गोंदियाराज्यात सध्या सर्वत्र पावसाच्या सरी कोसळल्याने खरीप हंगामात शेतकरी पेरणीच्या तयारीला लागले आहेत. अशातच राज्यात बोगस बियाणांचा (Prohibited Seeds) सुळसुळाट असल्याचे देखील बघायला मिळाले आहे. नुकतेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांना शेतकऱ्यांना खते, बियाणे उपलब्ध करून देण्यासह बोगस बियाणे विक्रेत्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. असे असतांना खरीप हंगामाच्या तोंडावर गोंदिया (Gondia News) जिल्ह्यात बियाणांचा काळाबाजार सुरूच असल्याचे चित्र आहे. परिणामी कृषी विभागाच्या भरारी पथकाने धडक कारवाई करत गोंदिया जिल्ह्यात 14 कृषि केंद्राचे परवाने निलंबित केले आहे. तर 8 परवाने कायमचे रद्द केले आहे. कृषी विभागाच्या या कारवाईमुळे इतर कृषि केंद्राचे धाबे दणाणले आहेत.

  


14 कृषी केंद्रांचे परवाने निलंबित, तर 8 परवाने कायमचे रद्द


गोंदिया जिल्ह्यातील खरीप हंगामाच्या पार्श्वभुमीवर बोगस बि-बियाणे, खते आणि किटकनाशकाच्या विक्रीस आळा घालण्यासाठी कृषि विभागाने 9 भरारी पथक स्थापन केली आहेत. या भरारी पथकामार्फत अचानक तपासणी धडक मोहिम जिल्ह्यात राबविली जात आहे. कृषि केंद्राच्या तपासणीवेळी विक्री परवान्यामध्ये उगम प्रमाणपत्राचा समावेश नसणे, नोंदणी प्रमाणपत्र विहीत मुदतीत नुतणीकरण न करणे, शिल्लक साठा आणि दरपत्रक दर्शनी भागात न लावणे, साठा आणि विक्री रजिस्टर न ठेवणे, रजिस्टरवरील व प्रत्यक्ष साठा न जुळणे, विक्री करीत असलेल्या कृषि निविष्ठांचे खरेदी बिल न ठेवणे, ग्राहकास देण्यात येणाऱ्या खरेदी पावतीवर ग्राहकाची सही न घेणे, परवाना घेऊन सुध्दा आर्थिक वर्षात एकदाही व्यवहार न करणे आदी कारणामुळे 14 निविष्ठाधारकांचे परवाने दोन महिन्याकरीता निलंबित करण्यात आले असून 8 निविष्ठाधारकांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले आहेत.


207 कृषी केंद्रांवर निर्बंध, 65 चे परवाने रद्द, चार निलंबित


खरीपाच्या पेरण्या तोंडावर बियाणे आणि खतांचा काळाबाजार ही नित्याचीच बाब झाली आहे. मागील वर्षी बुलडाणा जिल्ह्यातील काही कृषी केंद्रांमध्ये बोगस खते विक्रीचे प्रकार आढळले होते. काही ठिकाणी सक्तीही केल्या जात होती. यावर्षी असा कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कृषी विभागाने तत्पर पावले उचलले आहेत. नियमानुसार जे कृषी केंद्र खते व बियांण्याची विक्री करीत नसतील अशावर् कारवाई करण्याचे काम कृषी विभागाने सुरू केले असून जिल्ह्यातील 65 दुकानांचे परवाने रद्द करण्यात आले आहे. तर चार कृषी केंद्रांना तात्पुरते निलंबित करण्यात आले असून 207 कृषी केंद्रवर खते बियाण्यांच्या विक्रीस बंदी घातली आहे. या कारवाईने कृषी केंद्र चालकांचे धाबे दणाणले आहे.


इतर महत्वाच्या बातम्या