Kalyan: कल्याणात 12 गुन्हेगारांविरोधात मोक्का अंतर्गत कारवाई, आठ आरोपीना अटक
Kalyan Dombivli News: मागील काही दिवसापासून कल्याण-डोंबिवलीत वाढलेल्या सामूहिक गुंडगिरी विरोधात कल्याण परिमंडळ तीनचे पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ यांनी महत्वपूर्ण कारवाईचे निर्देश दिले आहेत.

Kalyan Dombivli News: मागील काही दिवसापासून कल्याण-डोंबिवलीत वाढलेल्या सामूहिक गुंडगिरी विरोधात कल्याण परिमंडळ तीनचे पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ यांनी महत्वपूर्ण कारवाईचे निर्देश दिले आहेत. वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सराईत गुन्हेगारांविरोधात एमपीडीए अंतर्गत कारवाई केल्यानंतर आता कल्याण कोळसेवाडी पोलिसांनी एका खंडणीच्या गुन्ह्यात अटक केलेल्या आणि सहभागी असलेल्या अशा 12 आरोपी विरोधात मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. एकाचवेळी 12 आरोपींवर मोक्का लावण्याची कल्याणमधील ही पहिलीच घटना आहे.
कल्याण-डोंबिवलीत चोरी, घरफोडी, मारहाण, रात्रीच्या सुमारास दंगल करणे, वाहनांची तोडफोड, आदी प्रकारच्या गुन्ह्यांत वाढ झाली आहे. विशेषत: कल्याण पूर्व भागात तर गेल्या काही दिवसांपासून स्थानिक गावगुंडांनी दहशत माजविण्याचा प्रयत्न केला आहे. रस्त्यावर तलवारी, लोखंडी सळई, दांडके घेऊन फिरणे, बर्थडे पार्टी दरम्यान फायरिंग करणे, आदी अनेक प्रकार घडले आहेत. या पार्श्वभूमीवर डीसीपी सचिन गुंजाळ यांनी या गुन्हेगारीला आळा घालण्याकरिता कल्याणचे एसीपी उमेश माने-पाटील आणि डोंबिवलीचे एसीपी जय मोरे यांना गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या नुसार 14 एप्रिल रोजी कल्याण पूर्वेत पडलेल्या दरोडा आणि मारहाणीच्या गुन्ह्यात पोलिसांनी 12 आरोपी विरोधात गुन्हा दाखल करत यातील 8 आरोपीना अटक केली आहे.
यातील एक आरोपी अल्पवयीन आहे, तर उर्वरित आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत. असून या सर्व आरोपी विरोधात हत्या, अपहरण, खंडणी, जबरी चोरी, धमकवण्या सारखे गुन्हे दाखल आऊन प्रत्येक आरोपी विरोधात 12 ते 17 गुन्हे दाखल असल्याने हे सर्व आरोपी सराईत गुन्हेगार असल्याचे स्पष्ट होत आहे. या सर्व आरोपी विरोधात सामूहिक गुन्हेगारी विरोधी कायद्या अंतर्गत ( मोक्का ) अंतर्गत कारवाई करण्यात आल्याचे एसीपी उमेश माने पाटील यांनी सांगितले. यातील आठ आरोपिना पोलीसानी अटक केली आऊन उर्वरित चार आरोपीचा शोध सुरू आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Bhiwandi Crime : तबेल्यात घुसून सपासप वार करत जनावरांची हत्या करणाऱ्या आरोपीला बेड्या
- 'साली आधी घर..!' करामती मेहुण्याने चक्क मेहुणीलाच पळविले; सासरवाडीतील मंडळी हैराण
Before You Go
Zero Hour : नसरापुरातील प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा, निकालानं गुन्हेगारांवर वचक बसेल असं वाटतं का?





















