एक्स्प्लोर

महिलेसह दोन अधिकाऱ्यास अटक, 50 हजारांची मागितली लाच; एसीबीने सापळा रचून पडकलं रंगेहाथ

तक्रारदाराने नवीन पेट्रोलपंप उघडायचा असल्याने वनविभागाकडे ना हरकत प्रमाणपत्राची मागणी केली होती.

मुंबई: सरकारी कार्यालयातील भ्रष्टाचार कमी होताना काही दिसून येत नाही, सर्वसामान्य नागरिकांना आजही आपल्या हक्काच्या कामासाठी लाल फितीत अडकलेल्या कागदपत्रांसाठी पैसे मोजावे लागतात. त्यामुळेच, गेल्या काही महिन्यांत लाच लुचपत विभागाने धाडी टाकून अनेक अधिकाऱ्यांना बेड्या ठोकल्या आहेत. आता, पुन्हा एकदा ठाणे जिल्ह्यात एसीबीने (ACB) कारवाई करत दोघांना अटक केली आहे. ना हरकरत प्रमाणपत्रासाठी 50 हजार रुपयांची लाच (Bribe) मागणाऱ्या वनपाल आणि वनसंरक्षकास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. विलास सानप आणि रेखा गायकवाड अशी लाचखोर दोघांची नावे आहेत. दरम्यान, गेल्याच आठवड्यात परभणी जिल्ह्यात दोन लाचखोर सरकारी अधिकाऱ्यांनी अटक करण्यात आली होती. 

तक्रारदाराने नवीन पेट्रोलपंप उघडायचा असल्याने वनविभागाकडे ना हरकत प्रमाणपत्राची मागणी केली होती. त्यावेळी, ना हरकत प्रमाणपत्रासाठी विलास सानप यांनी 50 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. मात्र, लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक ठाणे विभागाकडे तक्रार केली होती. तक्रारदाराने केलेल्या तक्रारीनंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. तक्रारदार आणि आरोपींमध्ये चर्चेअंती 25 हजारांच्या लाचेची रक्कम ठरवण्यात आली, बुधवारी लाच देण्यासाठी तक्रारदार वन परिक्षेत्रीय अधिकारी वन परिमंडळ अधिकारी येथे गेले असता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी देखील सापळ रचून होते. त्यामुळे, वन विभागातील अधिकारी विलास सानप आणि रेखा गायकवाड यांना लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. या प्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग अधिक तपास करत असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

शासकीय कार्यालयात सीसीटीव्ही बसवा

लोकाभिमुख प्रशासन निर्माण करायचं असेल तर, अधिकाऱ्यांनी लोकाभिमुख वागणं महत्त्वाचं आहे. प्रशासकीय इमारत झाली पण, टेबलाच्या खालून जर कोणी पैसे घेणार असेल तर तहसीलदार आणि एसडीएमच्या प्रत्येक कॅबीनला सीसीटीव्ही कॅमेरे लावा आणि ते कलेक्टरच्या चेंबरला सर्विलेन्सनं जोडा, अशा सूचना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्या आहेत. लोकाभिमुख प्रशासन केवळ भाषणांनी नाही, तर प्रत्यक्ष कृतीतून दिसले पाहिजे, असे स्पष्ट शब्दांत सांगत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले. गेल्याच आठवड्यात भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर येथे 22 कोटी रुपयांच्या खर्चातून उभारण्यात आलेल्या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलले होते.

हेही वाचा

विधान परिषदेसाठी सोलापूरच्या नेत्यांच्या जोर बैठका, राजेंद्र राऊत, राजन पाटील, राम सातपुते यांची चढाओढ

महत्त्वाच्या बातम्या

मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
Pune Junnar Crime news: मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
Pune Junnar Crime News : पिंपळवंडीतील चिमुकलीसोबत नेमकं काय घडलं अन् नराधमाचं बिंग कसं फुटलं? वाचा स्टार्ट टू एंड घटनाक्रम
पिंपळवंडीतील चिमुकलीसोबत नेमकं काय घडलं अन् नराधमाचं बिंग कसं फुटलं? वाचा स्टार्ट टू एंड घटनाक्रम
मुलीसोबत बोलताना व्हिडीओ काढल्याचा राग आला, डोक्यात कोयता घालून दुसऱ्या मजल्यावरुन ढकललं, नाशिकमधील धक्कादायक घटना
मुलीसोबत बोलताना व्हिडीओ काढल्याचा राग आला, डोक्यात कोयता घालून दुसऱ्या मजल्यावरुन ढकललं, नाशिकमधील धक्कादायक घटना

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना

Embed widget