Abu Salem : बॉम्बस्फोट प्रकरणात दोषी असलेल्या अबू सालेमला 25 वर्षांची शिक्षा भोगावीच लागेल, टाडा कोर्टाचं महत्त्वपूर्ण निरिक्षण
Abu Salem : मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटामध्ये दोषी असलेल्या अबू सालेमला 25 वर्षांची शिक्षा भोगावीच लागेल, असं निरिक्षण टाडा कोर्टाने नोंदवलं आहे.
Abu Salem : मुंबईतील 1993 च्या साखळी बॉम्बस्फोटातील (1993 Mumbai serial blast) सहभागासाठी अबू सालेमला (Abu Salem) 25 वर्षांची शिक्षा भोगावीच लागेल, असं महत्त्वपूर्ण निरिक्षण टाडा कोर्टाने (Tada Court) नोंदवलं आहे. साल 1993 च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील (1993 Mumbai serial blast) सहभागासाठी अबू सालेमला (Abu Salem) 25 वर्षांची शिक्षा झाली होती. यातून लवकर सुटका करण्याची मागणी करत सालेमनं दाखल केलेली याचिका विशेष टाडा कोर्टानं फेटाळली आहे. त्यामुळे 55 वर्षीय सालेमला 25 वर्षांची शिक्षा पूर्ण करावीच लागणार आहे.
अबू सालेम अब्दुल कय्युम अन्सारी याला दहशतवादी आणि विघटनकारी क्रियाकलाप (प्रतिबंध) कायद्यांतर्गत दोषी ठरवण्यात आलंय. या गुन्ह्याच्या गंभीर स्वरूपामुळे त्याची शिक्षा कमी करण्यासाठी कोणतेही विशेषाधिकार त्याला मिळत नाहीत. विशेष सत्र न्यायाधीश व्ही. डी. केदार यांनी 11 जुलै 2022 च्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा हवाला देत महत्त्वपूर्ण निकाल दिला होता.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशात असं म्हटलेलं आहे, 'अर्जदार ज्या गुन्ह्यात गुंतला होता त्या गुन्ह्याची गंभीरता पाहता, या न्यायालयाने अर्जदाराच्या शिक्षेचा कालावधी मर्यादित करण्याचा किंवा प्रवास करण्यासाठी कोणत्याही विशेष विशेषाधिकारांचा वापर करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.'
अबू सालेमला बॉम्बस्फोटांसह अन्य दोन टाडा खटल्यांमध्ये जन्मठेपेची शिक्षा
सालेमच्या याचिकेत असा युक्तिवाद करण्यात आला की, त्याच्या शिक्षेत 2 वर्षे आणि 10 महिन्यांची माफी ही चांगली वागणूक आणि विशेष बाब म्हणून मंजूर केली गेली पाहिजे. 11 नोव्हेंबर 2005 रोजी पोर्तुगालमधून प्रत्यार्पण केलेल्या, सालेमला खटल्याच्या सुनावणीनंतर 93 च्या बॉम्बस्फोटांसह अन्य दोन टाडा खटल्यांमध्ये जन्मठेपेची शिक्षा झालीय.
अबू सालेमला 25 वर्षांची शिक्षा भोगावीच लागेल, टाडा कोर्टाचं निरिक्षण
साल 1993 च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील सहभागासाठी अबू सालेमला 25 वर्षांची शिक्षा झालीय
यातून लवकर सुटका करण्याची मागणी करत सालेमनं दाखल केलेली याचिका विशेष टाडा कोर्टानं फेटाळली
त्यामुळे 55 वर्षीय सालेमला 25 वर्षांची शिक्षा पूर्ण करावीच लागेल
अबू सालेम अब्दुल कय्युम अन्सारी याला दहशतवादी आणि विघटनकारी क्रियाकलाप (प्रतिबंध) कायद्यांतर्गत दोषी ठरवण्यात आलंय
या गुन्ह्याच्या गंभीर स्वरूपामुळे त्याची शिक्षा कमी करण्यासाठी कोणतेही विशेषाधिकार त्याला मिळत नाहीत
विशेष सत्र न्यायाधीश व्ही. डी. केदार यांनी 11 जुलै 2022 च्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा हवाला देत दिला निकाल
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशात असं म्हटलेलं आहे, 'अर्जदार ज्या गुन्ह्यात गुंतला होता त्या गुन्ह्याची गंभीरता पाहता, या न्यायालयाने अर्जदाराच्या शिक्षेचा कालावधी मर्यादित करण्याचा किंवा प्रवास करण्यासाठी कोणत्याही विशेष विशेषाधिकारांचा वापर करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही'
सालेमच्या याचिकेत असा युक्तिवाद करण्यात आला की त्याच्या शिक्षेत 2 वर्षे आणि 10 महिन्यांची माफी ही चांगली वागणूक आणि विशेष बाब म्हणून मंजूर केली गेली पाहिजे
11 नोव्हेंबर 2005 रोजी पोर्तुगालमधून प्रत्यार्पण केलेल्या, सालेमला खटल्याच्या सुनावणीनंतर 93 च्या बॉम्बस्फोटांसह अन्य दोन टाडा खटल्यांमध्ये जन्मठेपेची शिक्षा झालीय
इतर महत्त्वाच्या बातम्या