एक्स्प्लोर

Shivsena UBT Pradeep Purnekar Death Case: ठाण्यातील ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकरांना 5 जणांनी संपवलं; आदित्य ठाकरे संतापले, म्हणाले...

Shivsena UBT Pradeep Purnekar Death Case: प्रदीप पूर्णेकरांच्या हत्येने ठाण्यासह महाराष्ट्रातील राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.

Shivsena UBT Pradeep Purnekar Death Case: ठाण्यातील मानपाड्यात ठाकरेंच्या शिवसेनेचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर (Shivsena UBT Pradeep Purnekar) यांची 29 सप्टेंबर रोजी गोळ्या झाडून आणि धारदार शस्त्राचे वार करून हत्या करण्यात आली. प्रदीप पूर्णेकरांच्या हत्येने ठाण्यासह महाराष्ट्रातील राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. सदर प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत एकाला अटक केली असून 2 जणांना ताब्यात घेऊन चौकशी सुरु केली आहे. प्रदीप पूर्णेकरांच्या हत्याप्रकरणात एकूण 5 आरोपी असून इतर 4 आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती आहे. प्रदीप पूर्णेकरांच्या हत्या प्रकरणावर आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी संताप व्यक्त करत पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

आमच्या पक्षाचे ठाण्यातील विभागप्रमुख प्रदीप पुर्णेकर यांची काल रात्री ठाणे परिसरात काही अज्ञातांकडून हत्या करण्यात आली. ही घटना अतिशय चीड आणणारी आणि घृणास्पद आहे. या राज्यात कायदा सुव्यवस्थेच्या चिंधड्या झालेल्या आहेत हे पुन्हा पुन्हा सिद्ध होतंय. सामान्य माणसाचं सुरक्षित जगणं कठीण होत चाललंय, असा संताप आदित्य ठाकरेंनी व्यक्त केला. 

पोलीस त्यांचं काम करण्याचा प्रयत्न करतील, पण राजकीय पक्षांकडूनच गुन्हेगारीला खतपाणी मिळणारं वातावरण तयार होत असेल तर पोलीस विभाग तरी काय करणार?, असा सवालही आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला. या हत्येतील गुन्हेगारांना आणि त्यामागील शक्तीला ताबडतोब अटक होईल अशी अपेक्षा करतो. तसंच, पुर्णेकरांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या कुटुंबीयांना व आप्तांना ह्या कठीण प्रसंगाला सामोरं जाण्याचं बळ मिळो अशी प्रार्थना करतो, असं आदित्य ठाकरे म्हणाले. 

नेमकं प्रकरण काय? (Shivsena UBT Pradeep Purnekar Death Case)

ठाण्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विभागप्रमुख प्रदीप (बाळा) पूर्णेकर यांच्यावर काल रात्री साधारण साडेनऊच्या सुमारास पाच हल्लेखोरांनी शिरुन पिस्तुलमधून सात राऊंड फायर केले. त्यापैकी चार गोळ्या प्रदीप पूर्णेकर यांच्या शरीरात घुसल्या. पूर्णेकर यांचे कार्यकर्ते कार्यालयात पोहोचले तेव्हा ते रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्यांचा तातडीने नजीकच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. प्रदीप पूर्णेकर यांच्या कुटुंबीयांनी ठाण्याच्या माजी महापौर मिनाक्षी शिंदे आणि त्यांच्या पतीवर हत्येचा कट रचल्याचा आरोप केला आहे. तसेच जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोवर प्रदीप पूर्णेकरांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करणार नसल्याची भूमिका पूर्णेकर कुटुंबानं घेतली आहे. 

संबंधित बातमी:

Thane Shivsena UBT Pradeep Purnekar Death Case: आधी रेकी, मग एकाकडून सिग्नल, तोंडावर रुमाल बांधले...; ठाण्यातील प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील हादरवणारा सीसीटीव्ही फुटेज

Thane Crime Pradeep Purnekar Death Case: प्रदीप पूर्णेकरांच्या मृतदेहाचा CT स्कॅन रिपोर्ट समोर, एक मानेतून आरपार, दुसरी गोळी छातीत अडकली; थरकाप उडवणारा रिपोर्ट

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Plane Hijack: विमानात वाद अन् दाबला गेला हायजॅकिंगचा कोड! अलर्टने इस्रायल-सौदीत उडाली धावपळ, फ्लाय दुबईच्या विमानात नेमकं काय घडलं? तासाभराच्या थरारानंतर अखेर सत्य समोर
विमानात वाद अन् दाबला गेला हायजॅकिंगचा कोड! अलर्टने इस्रायल-सौदीत उडाली धावपळ, फ्लाय दुबईच्या विमानात नेमकं काय घडलं? तासाभराच्या थरारानंतर अखेर सत्य समोर
Sachin Vaze : सचिन वाझेचा कारागृहातील मुक्काम वाढला; जामीन अर्जावर स्थगिती, पुढची सुनावणी 7 ऑक्टोबरला
सचिन वाझेचा कारागृहातील मुक्काम वाढला; जामीन अर्जावर स्थगिती, पुढची सुनावणी 7 ऑक्टोबरला
Thane Crime Pradeep Purnekar Death Case: प्रदीप पूर्णेकरांच्या मृतदेहाचा CT स्कॅन रिपोर्ट समोर, एक मानेतून आरपार, दुसरी गोळी छातीत अडकली; थरकाप उडवणारा रिपोर्ट
प्रदीप पूर्णेकरांच्या मृतदेहाचा CT स्कॅन रिपोर्ट समोर, एक मानेतून आरपार, दुसरी गोळी छातीत अडकली; थरकाप उडवणारा रिपोर्ट
Thane Crime Shivsena UBT Pradeep Purnekar Death Case: प्रदीप पूर्णेकरांची शेवटची इन्स्टाग्राम पोस्ट, म्हणाले, 'एक तर आपला अध्याय संपेल किंवा नवीन अध्याय सुरू होईल'
प्रदीप पूर्णेकरांची शेवटची इन्स्टाग्राम पोस्ट, म्हणाले, 'एक तर आपला अध्याय संपेल किंवा नवीन अध्याय सुरू होईल'
Advertisement

व्हिडीओ

Thackeray Congress on EC : आयोगाविरोधात थोपटले दंड, विरोधकांची तयारी प्रचंड | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case : टॅटू, चॅटिंग, मर्डर; आरोपांचा डोंगर | Special Report ABP Majha
Raj Thackeray Rahul Gandhi : राज-राहुल संपर्क? चर्चेत राऊतांचा तर्क Special Report
Chakan MIDC : चाकणला 1400 कोटी मिळाले, उद्योजकांनी आभार मानले
Sanjay Raut on FDA Tukaram Mundhe : धाड मुंढेंची, कमाई अधिकाऱ्यांची?राऊतांच्या पत्राने खळबळ
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Asian Games 2026 : आईनं सोनं गहाण ठेऊन धनुष्यबाण घेऊन दिला; लेकानं गोल्ड जिंकत सुवर्णक्षण कमावला, वडिलांना आनंदाश्रू
आईनं सोनं गहाण ठेऊन धनुष्यबाण घेऊन दिला; लेकानं गोल्ड जिंकत सुवर्णक्षण कमावला, वडिलांना आनंदाश्रू
Plane Hijack: विमानात वाद अन् दाबला गेला हायजॅकिंगचा कोड! अलर्टने इस्रायल-सौदीत उडाली धावपळ, फ्लाय दुबईच्या विमानात नेमकं काय घडलं? तासाभराच्या थरारानंतर अखेर सत्य समोर
विमानात वाद अन् दाबला गेला हायजॅकिंगचा कोड! अलर्टने इस्रायल-सौदीत उडाली धावपळ, फ्लाय दुबईच्या विमानात नेमकं काय घडलं? तासाभराच्या थरारानंतर अखेर सत्य समोर
Maharashtra Goverment On Agniveer: ना परीक्षा, ना ट्रेनिंग, कुठलीही अट नाही; अग्निवीरांना पोलिसांच्या पदावर घेणार, महाराष्ट्र सरकारचा सगळ्यात मोठा निर्णय
ना परीक्षा, ना ट्रेनिंग, कुठलीही अट नाही; अग्निवीरांना पोलिसांच्या पदावर घेणार, महाराष्ट्र सरकारचा सगळ्यात मोठा निर्णय
Manoj Jarange Defender Car : मनोज जरांगेंनी वापरलेली 'ती' वादग्रस्त डिफेंडर गाडी सोलापूर जिल्ह्यात परतली; गावोगावी गाडीची पूजा, नागरिक म्हणाले, 'गाडीमध्ये ज्या सिटावरती हे आमचं दैवत बसलं होतं....'
मनोज जरांगेंनी वापरलेली 'ती' वादग्रस्त डिफेंडर गाडी सोलापूर जिल्ह्यात परतली; गावोगावी गाडीची पूजा, नागरिक म्हणाले, 'गाडीमध्ये ज्या सिटावरती हे आमचं दैवत बसलं होतं....'
Thane Crime Shivsena UBT Pradeep Purnekar Death Case: प्रदीप पूर्णेकरांची शेवटची इन्स्टाग्राम पोस्ट, म्हणाले, 'एक तर आपला अध्याय संपेल किंवा नवीन अध्याय सुरू होईल'
प्रदीप पूर्णेकरांची शेवटची इन्स्टाग्राम पोस्ट, म्हणाले, 'एक तर आपला अध्याय संपेल किंवा नवीन अध्याय सुरू होईल'
Thane Crime Pradeep Purnekar Death Case: प्रदीप पूर्णेकरांच्या मृतदेहाचा CT स्कॅन रिपोर्ट समोर, एक मानेतून आरपार, दुसरी गोळी छातीत अडकली; थरकाप उडवणारा रिपोर्ट
प्रदीप पूर्णेकरांच्या मृतदेहाचा CT स्कॅन रिपोर्ट समोर, एक मानेतून आरपार, दुसरी गोळी छातीत अडकली; थरकाप उडवणारा रिपोर्ट
Sanjay Raut on Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकरांना का संपवलं? संजय राऊतांनी सगळंचं काढलं, अमली पदार्थ, बिल्डर अन् वाद, पोलिस आयुक्तासह गृहविभागावर व्यक्त केला संताप
प्रदीप पूर्णेकरांना का संपवलं? संजय राऊतांनी सगळंचं काढलं, अमली पदार्थ, बिल्डर अन् वाद, पोलिस आयुक्तासह गृहविभागावर व्यक्त केला संताप
Thane Shivsena UBT Pradeep Purnekar Death Case: आरोपी एकत्र उभे होते आणि मला बघून ते दचकले; वडील प्रदीप पूर्णेकर यांच्या मृत्यूनंतर मुलाची धक्कादायक माहिती
आरोपी एकत्र उभे होते आणि मला बघून ते दचकले; वडील प्रदीप पूर्णेकर यांच्या मृत्यूनंतर मुलाची धक्कादायक माहिती
Embed widget