Bhandara News भंडाराउधारीवर घेतलेल्या पैशांच्या वादातून दोन मित्रांमध्ये वाद झाला. कालांतराने त्यांच्यातील हा वाद विकोपाला गेल्यानं त्यातील एकाने दुसऱ्या मित्रावर धारदार शस्त्रानं (Bhandara Crime News) हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. हा धक्कादायक प्रकार काल सायंकाळी भंडारा शहरातील मुख्य वर्दळीच्या गांधी चौकात झालाय. आश्चर्यकारक बाब म्हणजे हा प्राणघातक हल्ला अवघ्या दहा रुपयांसाठी झाल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. या हल्ल्यानंतर यातील मारेकरी फरार झाला असून सध्या भंडारा पोलीस (Bhandara Police) या मारेकऱ्याचा शोध घेत आहे. मात्र, भंडाऱ्याच्या कायम वर्दळीच्या गांधी चौकात आणि भरदिवसा ही घटना घडल्याने परिसरात एकच दहशत निर्माण झाली आहे.    


अवघ्या दहा रुपयांसाठी मित्रानेच केला मित्रावर चाकूने वार 


भंडारा शहरातील याच गांधी चौकात मागील वर्षी किरकोळ वादातून एका लस्सी विक्रेत्यावर चाकुनं प्राणघातक हल्ला झाला होता. त्या घटनेत दोघांचा मृत्यूही झाला होता. काल घडलेल्या या घटनेनं भंडारा शहरात एकच खळबळ उडाली आहे. गंभीर जखमी असलेला सचिन रंगारी (वय 30 वर्ष) यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असून प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, हल्लेखोर फरार आरोपीच्या विरोधात भंडारा पोलीसात कलम 326 अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पोलीस त्याचा शोध सध्या पोलीस घेत आहेत. 


मद्यधुंद अवस्थेत तरुण चढला थेट मोबाईल टॉवरवर


दारूच्या मद्यधुंद अवस्थेत मनुष्य काहीही करू शकतो, जणू याचीच प्रचिती भंडारा जिल्ह्यात बघायला मिळाली. भंडाऱ्याच्या लाखांदूर तालुक्यातील ओपारा या गावातील सोमेश्वर देशमुख या तरुणांनं शनिवारी सायंकाळी यथेच्छ मद्यप्राशन केलं. त्यानंतर मद्यधुंद अवस्थेत गावालगत असलेल्या मोबाईलच्या उंच टॉवरवर चढून तिथेच बस्तान मांडलं. मोबाईल टॉवरवर चढल्यानंतर त्यानं तिथून शोले फिल्म स्टाईल ग्रामस्थांना आवाज दिल्यानं ही बाब लक्षात आली. यावेळी गावातील राहुल राऊत यांच्यासह काही तरुण मंडळी मोबाईल टॉवरवर चढलेत. यावेळी टॉवरवर चढलेला सोमेश्वर हा मद्यधुंद असल्याचं लक्षात आल्यानं त्याची मनधरणी करून तब्बल तीन तासानंतर त्याला मोबाईल टॉवरवरून खाली उतरविले.


इतर महत्वाच्या बातम्या