Taurus Weekly Horoscope 20 to 26 May 2024 : हिंदू कॅलेंडरनुसार, मे महिन्यातला नवीन आठवडा लवकरच सुरु होणार आहे. हा नवीन आठवडा वृषभ राशीसाठी नेमका कसा असणार आहे? वृषभ राशीचं करिअर, शिक्षण, लव्ह लाईफ आणि आरोग्याच्या दृष्टीने नवीन आठवडा वृषभ राशीसाठी लाभदायी असणार आहे की नाही? हे जाणून घेण्यासाठी वषभ राशीचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या. 


वृषभ राशीचे करिअर (Taurus Career Horoscope)  


वृषभ राशीच्या लोकांसाठी येणारा आठवडा खेळीमेळीचा असणार आहे. या आठवड्यात तुम्हाला करिअरमध्ये काही समस्यांचा सामना करावा लागणार आहे.तुमचा फोकस आर्थिक बाबींवर जास्त असणार आहे. करिअरशी संबंधित तुमच्या डोक्यात नवनवीन कल्पना सुचतील. नवीन प्रोजेक्ट्स, बिझनेस प्लॅनसाठी चांगली सुरुवात असेल. 


वृषभ राशीचे आरोग्य (Taurus Health Horoscope)


आरोग्याबद्दल बोलायचं झाल्यास, महिलांनी व्यायामाकडे जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. तुमच्याबरोबरच तुमच्या कुटुंबियांची देखील काळजी घ्या. बाहेरचं खाणं बंद करा. तसेच, घरच्या घरी चविष्ट पदार्थ बनवा. 


वृषभ राशीची आर्थिक स्थिती (Taurus Money Wealth Horoscope)


या आठवड्यात तुम्ही पैशांचे मोठे व्यवहार अजिबात करू नका. तसेच, व्यापारी वर्गाने कोणताही मोठा खर्च करण्याआधी योग्य खबरदारी घ्या. त्यानंतरच पैसे खर्च करा. 


वृषभ राशीचे विद्यार्थी (Taurus Students Horoscope)


वृषभ राशीच्या विद्यार्थ्यांना या आठवड्यात चांगलं यश मिळणार आहे. विद्यार्थी मन लावून अभ्यास करतील. तसेच, आपल्या ध्येयाच्या दिशेने एक पाऊल तुम्ही आणखी पुढे जाल. तुम्हाला जर परदेशात जायची इच्छा असेल तर तीदेखील या आठवड्यात पूर्ण होण्याची शक्यता आहे. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा: 


Aries Weekly Horoscope 20 to 26 May 2024 : मेष राशीसाठी नवीन आठवडा अनेक आव्हानांचा, पैशांची गुंतवणूक करण्यासाठी हीच ती योग्य वेळ; वाचा साप्ताहिक राशीभविष्य