Kiran Mane : मराठी सिनेसृष्टीत लॉबी, गटबाजी असल्याचा नेहमी आरोप-दावा केला जातो. काही कलाकार दबक्या आवाजात या गटबाजीची कबुली देतात. तर, काही कलाकार नकार देतात. आपल्या परखड वक्तव्यासाठी प्रसिद्ध असलेला अभिनेता किरण माने (Kiran Mane) याने मराठी सिनेसृष्टीतील लॉबीबद्दल मत व्यक्त केले आहे. मराठीत लॉबी नाही तर छोट्या-छोट्या गटांचे डबकं असल्याचे वक्तव्य किरण माने यांनी एका मुलाखतीत केले.
किरण माने यांनी कॉकटेल स्टुडिओ या युट्युब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत मराठी सिनेसृष्टीतील गटबाजी भाष्य केले. किरण मानेने सांगितले की, मराठी इंडस्ट्रीमध्ये खूप छोटे छोटे गट आहे. त्याला मी रागाने डबके म्हणतो. यातील लोक हे एकमेकांनाच हे लोक काम देतात. एखाद्या दिग्दर्शकाच्या चित्रपटात तेच-तेच कलाकार दिसतात. मुलाखतींमध्ये एकमेकांना मोठं करतात. एकमेकांना उचलून धरत असल्याचे किरण माने यांनी दावा केला.
मराठी सिनेसृष्टीत कामे देताना योग्य कलाकारापेक्षा आपल्या जवळच्या मित्राला, अभिनेता-अभिनेत्रींना काम दिले जाते. त्यामुळे गुणवत्ता असूनही उपयोग झाला नाही.
म्हणून सकस कलाकृती होत नाहीत...
किरण माने यांनी आपल्या मुलाखतीत पुढे म्हटले की, मराठीत सकस कलाकृती फार कमी होतात असे म्हटले जाते, त्याची चर्चा होते. जागतिक दर्जाच्या कलाकृती मराठीत का होत नाही? चित्रपट म्हणा, नाटके म्हणा काहीही दर्जेदार का होत नाही. बाहेरच्या देशातील कलाकृतींवर इकडे चित्रपट होतात. आपलं म्हणून का दर्जेदार कलाकृती तयार होत नाही असा प्रश्नही किरण मान याने विचारला.
आपल्याकडे नितळ मनाने व्यापकदृष्टीकोणाने काही केले जात नाही. त्यामुळे या मागील सात-आठ वर्षात किती मराठी चित्रपट चालले? तर, त्यांची संख्या खूप कमी चित्रपट चालले असे याकडे किरण माने यांनी लक्ष वेधले.
तेच तेच कलाकार
मराठी सिनेसृष्टीत ज्यांच्या नावावर चित्रपटगृहात गर्दी होईल असे एकही अभिनेता, अभिनेत्री नाही. तरीदेखील तेच-तेच कलाकार चित्रपटात दिसत असतात. इतर कलाकारांना संधीच दिले जात नसल्याचे किरण माने सांगितले.
काही बायोपिकची माती...
मराठी चित्रपटसृष्टीत मागील काही वर्षात चरित्रपट (बायोपिक) आले. यावरही भाष्य करताना किरण मानेने सांगितले की, मराठीत आलेल्या बायोपिकमध्ये काही कलाकारांनी माती केली आहे. योग्य कलाकारांची निवड न केल्याने चित्रपटाची माती झाली असल्याचा आरोप किरण मानेने केला. त्या बायोपिकमध्ये कलाकाराची भूमिका लोकांना आवडली नाही. पण, काही गोष्टी मॅनेज करून कलाकाराचे कौतुक केले जात होते असेही किरण मानेने म्हटले.