एक्स्प्लोर

गणेशोत्सव मंडळाच्या मंडपात मुलीसोबत अश्लील चाळे; 59 वर्षीय आरोपीवर गुन्हा दाखल, मुंबईतील धक्कादायक घटना

Mumbai Crime News: मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी विनयभंग, पोक्सोअंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

Mumbai Crime News: सध्या मुंबईसह राज्यभरात गणेशोत्सव (Ganesh Utsav) मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. मुंबईत भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. मात्र याचदरम्यान एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

मुंबईतील गिरगावमधील एका गणेशोत्सव मंडळाच्या मंडपात 13 वर्षीय मुलीचा विनयभंग झाल्याची घटना (Mumbai Crime News) घडली आहे. याप्रकरणी सोमवारी आरोपीला व्ही. पी. रोड पोलिसांनी अटक केली आहे. मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी विनयभंग, पोक्सोअंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

गणेशोत्सव मंडळाच्या मंडपात लपंडाव खेळत असलेल्या 13 वर्षीय मुलीसोबत 59 वर्षीय व्यक्तीने अश्लील चाळे केले. रविवारी दुपारी अडीचच्या सुमारास ही घटना घडली. मुलगी भाऊ आणि मित्र-मैत्रिणीसोबत लपंडावचा खेळ खेळताना लपण्यासाठी ती मंडपात गेली. यादरम्यान आरोपीने तिच्यासोबत अश्लील चाळे केले. मुलीने घडलेला प्रकार आईला सांगताच त्यांनी तत्काळ पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा नोंदवत अटकेची कारवाई केली.

चिमुरडीवर अत्याचार करून दगडाने ठेचत संपवलं-

बारा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याची संतापजनक घटना जळगाव जिल्ह्यात चोपडा तालुक्यात घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका संशयितास ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे जळगाव जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की,  जळगाव जिल्ह्याच्या चोपडा तालुक्यातील विरवाडे परिसरात दोघी बहिणी शेतात कामाला गेल्या होत्या. कामावरून मालापूरकडून दोघी घरी परतताना बारा वर्षीय चिमुरडीला 25 वर्षीय संशयिताने विरवाडे शिवारातील शेतात ओढून नेले. तिथे तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर तिचा दगडाने ठेचून निघृण खून केला. खुनानंतर संशयिताने विवस्त्र अल्पवयीन मुलीला घटनास्थळावरून शंभर फूट ओढत नेत कापसाच्या शेतात फेकून दिले. मुलगी घरी परतली नसल्याने तिचा शोध घेत असताना, कापसाच्या पिकात तिचा अर्धनग्न अवस्थेत असलेला मृतदेह आढळून आला. याबाबत गावकऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. 

संशयिताला अटक-

घटनेची माहिती मिळताच चोपडा उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे, पोलीस निरीक्षक मधुकर साळवे, पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे यांच्यासह शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तपासचक्रे वेगाने फिरविली. जळगावहून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयिताला अटक केली आहे. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.  

संबंधित बातमी:

एकाच कुटुंबातील आई-वडील आणि आठ वर्षाच्या मुलाला संपवलं, कर्जतमध्ये तिहेरी हत्याकांड प्रकरण

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मतदान केंद्रावर कोब्रा सापाचा थरार; पोलीस धावला, मतदारांच्या भुवया उंचावल्या, गर्दीतून सुखरूप पकडला
मतदान केंद्रावर कोब्रा सापाचा थरार; पोलीस धावला, मतदारांच्या भुवया उंचावल्या, गर्दीतून सुखरूप पकडला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जानेवारी 2026 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जानेवारी 2026 | गुरुवार 
BMC Election 2026: थेट निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदान केंद्रावर मतदारांची नावे शोधण्यासाठी चक्क भाजपच्या अॅपचा वापर! ठाकरे गटाच्या नेत्याचा व्हिडिओ बाॅम्ब
Video: थेट निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदान केंद्रावर मतदारांची नावे शोधण्यासाठी चक्क भाजपच्या अॅपचा वापर! ठाकरे गटाच्या नेत्याचा व्हिडिओ बाॅम्ब
मुंबईत 41 टक्के, कोल्हापुरी, मतदानात सर्वात भारी; राज्यातील 29 महापालिकांमध्ये कुठं, किती टक्के मतदान?
मुंबईत 41 टक्के, कोल्हापुरी, मतदानात सर्वात भारी; राज्यातील 29 महापालिकांमध्ये कुठं, किती टक्के मतदान?

व्हिडीओ

BMC Election Exit Poll : मुंबईत भाजप आणि शिवसेनेला 138 जागा मिळणार- एक्झिट पोलचा अंदाज
Uddhav Thackeray Full PC : बाईचं नाव रविंद्र असतं का? लोकशाही पुसली जातेय; मतदानानंतर ठाकरेंचा घणाघात
Akola Voting : अकोल्यात बुरखाधारी महिलांची तपासणी न करता सोडलं जातंय
Election Commission PC :पाडू यंत्र हे 2004 पासून हे यंत्र आम्ही नवीन आणलेलं नाही, आयोगाचं स्पष्टीकरण
Geeta Gawali Mumbai : अरुण गवळीची लेक निवडणुकीच्या रिंगणात, गीता गवळींनी व्यक्त केला विजयाचा विश्वास

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मतदान केंद्रावर कोब्रा सापाचा थरार; पोलीस धावला, मतदारांच्या भुवया उंचावल्या, गर्दीतून सुखरूप पकडला
मतदान केंद्रावर कोब्रा सापाचा थरार; पोलीस धावला, मतदारांच्या भुवया उंचावल्या, गर्दीतून सुखरूप पकडला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जानेवारी 2026 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जानेवारी 2026 | गुरुवार 
BMC Election 2026: थेट निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदान केंद्रावर मतदारांची नावे शोधण्यासाठी चक्क भाजपच्या अॅपचा वापर! ठाकरे गटाच्या नेत्याचा व्हिडिओ बाॅम्ब
Video: थेट निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदान केंद्रावर मतदारांची नावे शोधण्यासाठी चक्क भाजपच्या अॅपचा वापर! ठाकरे गटाच्या नेत्याचा व्हिडिओ बाॅम्ब
मुंबईत 41 टक्के, कोल्हापुरी, मतदानात सर्वात भारी; राज्यातील 29 महापालिकांमध्ये कुठं, किती टक्के मतदान?
मुंबईत 41 टक्के, कोल्हापुरी, मतदानात सर्वात भारी; राज्यातील 29 महापालिकांमध्ये कुठं, किती टक्के मतदान?
Kolhapur Municipal Corporation Election: राज्यात दुपारी साडे तीनपर्यंत कोल्हापुरात उच्चांकी मतदान; 'या' दोन प्रभागात सर्वात चुरशीने मतदान!
राज्यात दुपारी साडे तीनपर्यंत कोल्हापुरात उच्चांकी मतदान; 'या' दोन प्रभागात सर्वात चुरशीने मतदान!
BMC Election : बोगस मतदानाची एक तक्रार, शाई पुसून व्हिडीओ केल्यास कारवाई करणार; निवडणूक आयोगाचा इशारा
बोगस मतदानाची एक तक्रार, शाई पुसून व्हिडीओ केल्यास कारवाई करणार; निवडणूक आयोगाचा इशारा
पुण्यात भाजप निवडणूक प्रमुखाच्या वार्डात बोगसगिरी; आरोपी तरुंगात, इकडे केंद्रावर झालं बोगस मतदान
पुण्यात भाजप निवडणूक प्रमुखाच्या वार्डात बोगसगिरी; आरोपी तरुंगात, इकडे केंद्रावर झालं बोगस मतदान
PADU यंत्र 2004 पासून, मार्कर 2011 पासून मार्कर वापरला जात आहे, 2 टक्के ईव्हीएम खराब आहेत मान्य करतो, 10 वर्षात बदलली नाहीत: दिनेश वाघमारे, मुख्य निवडणूक आयुक्त
PADU यंत्र 2004 पासून, मार्कर 2011 पासून मार्कर वापरला जात आहे, 2 टक्के ईव्हीएम खराब आहेत मान्य करतो, 10 वर्षात बदलली नाहीत: दिनेश वाघमारे, मुख्य निवडणूक आयुक्त
Embed widget