एक्स्प्लोर

Bihar Crime News: तरुणपणी गोळी झाडली, म्हातारपणी शिक्षा झाली, 85 वर्षीय वृद्धाला 34 वर्षांनी जेल, नेमकं प्रकरण काय?

Bihar Crime News: बिहारमधील वैशाली येथे एका न्यायालयाने १९९२ सालच्या ३४ वर्षे जुन्या प्रकरणात एका ८५ वर्षीय वृद्धाला तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली.

बिहार : "कायद्याचे हात लांब असतात" याचा प्रत्यय देणारा निर्णय बिहारमधील वैशाली जिल्ह्यातील (Bihar Crime News)न्यायालयाने दिला आहे. तब्बल ३४ वर्षे जुन्या जीवघेण्या हल्ल्याच्या (Bihar Crime News) प्रकरणात न्यायालयाने ८५ वर्षीय वृद्धाला दोषी ठरवत तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.  बिहारमधी वैशाली येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज कुमार तिवारी यांच्या न्यायालयाने या जुन्या प्रकरणाचा (Bihar Crime News) निकाल दिला. न्यायालयाने १ जून रोजी सुनावणी पूर्ण करून निकाल राखून ठेवला होता. त्यानंतर २ जून रोजी आरोपी दीप राय उर्फ जीसा राय याला शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत (आर्म्स अॅक्ट) दोषी ठरवत तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली.(Bihar Crime News)

बिहारमधील वैशाली जिल्हा न्यायालयाने मंगळवारी २  जून रोजी एका ऐतिहासिक निकालात तब्बल ३४ वर्षे जुन्या प्राणघातक हल्ल्याच्या प्रकरणात एका ८५ वर्षीय वृद्धाला दोषी ठरवत तुरुंगात पाठवले. वैशालीचे अप्पर जिल्हा आणि सत्र न्यायाधीश मनोज कुमार तिवारी यांच्या न्यायालयाने १ जून रोजी या खटल्याची सुनावणी पूर्ण केली होती आणि २ जून रोजी या अत्यंत जुन्या प्रकरणात आपला निकाल सुनावला. न्यायालयाने आरोपी वृद्ध दीप राय याला आर्म्स ॲक्टच्या गंभीर कलमांखाली दोषी ठरवले असून तीन वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.(Bihar Crime News)

Bihar News:  नेमकं काय आहे प्रकरण?

हे प्रकरण १९९२ सालातील आहे. परस्पर वादातून एका दाम्पत्यावर जीवघेणा हल्ला आणि गोळीबार केल्याप्रकरणी एकाच कुटुंबातील नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सुनावणीदरम्यान या नऊ आरोपींपैकी चौघांचा मृत्यू झाला, तर पाच आरोपी अद्याप जिवंत आहेत. त्यामध्ये दीप राय याचाही समावेश आहे.(Bihar Crime News)

पोलीस नोंदी आणि न्यायालयात सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांनुसार, १० मे १९९२ रोजी पीडित कुटुंबाने पोलिसांत तक्रार दाखल केली होती. तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, पीडित व्यक्ती आपल्या पत्नीसोबत घराच्या दारात बसलेली असताना आरोपींनी धारदार शस्त्रांसह त्यांच्यावर हल्ला केला. तसेच दहशत निर्माण करण्याच्या आणि जीव घेण्याच्या उद्देशाने गोळीबारही करण्यात आला होता. या हल्ल्यात दाम्पत्याचा जीव थोडक्यात बचावला होता, मात्र दोघेही गंभीर जखमी झाले होते. या घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरू केला आणि १९९३ मध्ये या प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यात आले.

Bihar News:  ३४ वर्षांनंतर आता लागला निकाल

या प्रकरणातील सुनावणी अनेक वर्षे सुरू राहिली. अखेर ३४ वर्षांनंतर न्यायालयाने या खटल्याचा निकाल देत दीप राय याला दोषी ठरवले. न्यायालयाच्या निर्णयामुळे दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या या प्रकरणाला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. या निकालामुळे कितीही वर्षे लोटली तरी गुन्ह्याचा पाठपुरावा थांबत नाही आणि न्याय मिळण्यास विलंब झाला तरी तो नाकारला जात नाही, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Rent Homes: पुणे पोलिसांची मोठी कारवाई, भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या 170 घरमालकांवर थेट गुन्हे दाखल, गुन्हेगार, दहशतवाद्यांमुळे महत्त्वाचं पाऊल
पुणे पोलिसांची मोठी कारवाई, भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या 170 घरमालकांवर थेट गुन्हे दाखल, गुन्हेगार, दहशतवाद्यांमुळे महत्त्वाचं पाऊल
Pune Crime News: टीव्ही बघताना नराधमाने चिमुरडीला घराबाहेर बोलावलं, शेतात नको ते कृत्य करुन संपवलं, जुन्नरच्या पिंपळवंडीत काय घडलं?
टीव्ही बघताना नराधमाने चिमुरडीला घराबाहेर बोलावलं, शेतात नको ते कृत्य करुन संपवलं, जुन्नरच्या पिंपळवंडीत काय घडलं?
Wardha Crime News: प्रेमसंबंधात पतीचा अडसर; पत्नीनं प्रियकरासह तिघांच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, मृतदेह शेतात फेकला अन्... चक्रावणारी माहिती समोर
प्रेमसंबंधात पतीचा अडसर; पत्नीनं प्रियकरासह तिघांच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, मृतदेह शेतात फेकला अन्... चक्रावणारी माहिती समोर
Nagpur Crime: नागपूरच्या हॉटेलमध्ये भयंकर घटना, रुममधून मुलीच्या किंचाळण्याचा आवाज, स्टाफने धावत जाऊन दार उघडताच दिसलं हादरवणारं दृश्य
नागपूरच्या हॉटेलमध्ये भयंकर घटना, रुममधून मुलीच्या किंचाळण्याचा आवाज, स्टाफने धावत जाऊन दार उघडताच दिसलं हादरवणारं दृश्य
Advertisement

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Rent Homes: पुणे पोलिसांची मोठी कारवाई, भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या 170 घरमालकांवर थेट गुन्हे दाखल, गुन्हेगार, दहशतवाद्यांमुळे महत्त्वाचं पाऊल
पुणे पोलिसांची मोठी कारवाई, भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या 170 घरमालकांवर थेट गुन्हे दाखल, गुन्हेगार, दहशतवाद्यांमुळे महत्त्वाचं पाऊल
हाॅटेलवर हाॅटेल असलेल्या पाच मजली इमारतीच्या भीषण अग्नितांडवात चार वर्षाच्या चिमुरड्यासह 9 जण जिवंत जळाले; आतापर्यंत 80 जणांना वाचवलं, अग्निकांडानंतर इमारतीचा मालक फरार
हाॅटेलवर हाॅटेल असलेल्या पाच मजली इमारतीच्या भीषण अग्नितांडवात चार वर्षाच्या चिमुरड्यासह 9 जण जिवंत जळाले; आतापर्यंत 80 जणांना वाचवलं, अग्निकांडानंतर इमारतीचा मालक फरार
Pune Crime News: टीव्ही बघताना नराधमाने चिमुरडीला घराबाहेर बोलावलं, शेतात नको ते कृत्य करुन संपवलं, जुन्नरच्या पिंपळवंडीत काय घडलं?
टीव्ही बघताना नराधमाने चिमुरडीला घराबाहेर बोलावलं, शेतात नको ते कृत्य करुन संपवलं, जुन्नरच्या पिंपळवंडीत काय घडलं?
David Warner News : कोर्टाने सुनावली शिक्षा, अन् मीडियाने डेव्हिड वॉर्नरला घेरलं! पण पुढच्याच क्षणी अनर्थ टळला; कोर्टाबाहेर ऑस्ट्रेलियन खेळाडूसोबत काय घडलं?, VIDEO
कोर्टाने सुनावली शिक्षा, अन् मीडियाने डेव्हिड वॉर्नरला घेरलं! पण पुढच्याच क्षणी अनर्थ टळला; कोर्टाबाहेर ऑस्ट्रेलियन खेळाडूसोबत काय घडलं?, VIDEO
Wardha Crime News: प्रेमसंबंधात पतीचा अडसर; पत्नीनं प्रियकरासह तिघांच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, मृतदेह शेतात फेकला अन्... चक्रावणारी माहिती समोर
प्रेमसंबंधात पतीचा अडसर; पत्नीनं प्रियकरासह तिघांच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, मृतदेह शेतात फेकला अन्... चक्रावणारी माहिती समोर
Devendra Fadnavis and Sergio Gor: महाराष्ट्र दोन कारणांमुळे जगाच्या नकाशावर, एक म्हणजे मुंबई अन् दुसरं म्हणजे देवेंद्र फडणवीस... अमेरिकेच्या राजदूतांकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक
महाराष्ट्र दोन कारणांमुळे जगाच्या नकाशावर, एक म्हणजे मुंबई अन् दुसरं म्हणजे देवेंद्र फडणवीस... अमेरिकेच्या राजदूतांकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक
Chhatrapati Sambhajinagar FDA: तुकाराम मुंढेंच्या एफडीएचा ब्लिंकइटच्या गोडाऊनवर छापा; खराब फ्रोझन चिकन, सिगरेटची थोटकं अन् उंदीर पाहताच...
तुकाराम मुंढेंच्या एफडीएचा ब्लिंकइटच्या गोडाऊनवर छापा; खराब फ्रोझन चिकन, सिगरेटची थोटकं अन् उंदीर पाहताच...
Dombivli Crime news: डोंबिवलीत फेरीवाल्यांची दादागिरी, थेट पोलिसांना नडले, बायका अंगावर धावून गेल्या अन्...
डोंबिवलीत फेरीवाल्यांची दादागिरी, थेट पोलिसांना नडले, बायका अंगावर धावून गेल्या अन्...
Embed widget