IPL 2024
क्रिकेट
निवडणूक
अयोध्या राम मंदिर
बातम्या
करमणूक
महाराष्ट्र
क्रीडा
फोटो
राशीभविष्य
वेब स्टोरी
वर वधू
इतर
By: एबीपी माझा वेब टीम | Updated at : 10 Jul 2020 02:14 PM (IST)
नवी दिल्ली : सीबीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावी परीक्षांच्या निकालाची तारीख जवळ आली आहे. 15 जुलै रोजी निकाल जाहीर होतील, असं म्हटलं जात आहेत. यासाठी बोर्डाची तयारी सुरु आहे. सोबतच बोर्डाकडून विद्यार्थ्यांना एक विशेष एसएमएस पाठवला जात असून त्यांना निकाल पाहण्यासाठी डिजिलॉकर (Digilocker) हे मोबाईल अॅप डाऊनलोड करण्यास सांगितलं आहे. विद्यार्थी याच अॅपवर आपली गुणपत्रिका पाहू शकतात.
डिजिलॉकर अॅपमध्ये गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र मिळणार कोरोना विषाणूमुळे आलेल्या महामारीमुळे सीबीएसई बोर्डाची परीक्षा स्थगित करण्यात आळी. त्यानंतर जूनअखेरीस बोर्डाने या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. जेवढ्या विषयांची परीक्षा झाली, त्याच्या आधारावर गुण देणार असल्याचं जाहीर केलं होतं.
आता बोर्डाने सर्व विद्यार्थ्यांना मेसेज पाठवून गुणपत्रिका पाहण्यासाठी आणि डाऊनलोड करण्यासाठी डिजिलॉकर अॅप मोबाईल फोनमध्ये इन्स्टॉल करण्याचं आवाहन केलं आहे. डिजिलॉकर हे केंद्र सरकारचं अॅप आहे, ज्यात भारतीय नागरिक आपले सर्व महत्त्वाचे दस्तऐवज डिजिटल स्वरुपात सुरक्षित ठेवू शकतात आणि गरज असेल तेव्हा कोणत्याही ऑनलाईन अर्जासाठी त्याचा सहजरित्या वापर करु शकतात.
सीबीएसईने आपल्या मेसेजमध्ये सांगितलं आहे की गुणपत्रिका पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना अॅप डाऊनलोड करावं लागेलं. यामध्ये लॉग इन करण्यासाठी सीबीएसईकडे नोंद असलेला मोबाईल क्रमांक टाईप करावा लागेल, त्यानंतर मोबाईलवर एक ओटीपी येईल.
यानंतर विद्यार्थ्यांना परीक्षा नंबरचे अखेरचे सह अंक टाईप करावे लागतील, जो त्यांचा सिक्युरिटी पिन असेल. मग डॅशबोर्ड सुरु होईल आणि तिथून विद्यार्थी आपली गुणपत्रिका डाऊनलोड करु शकतात.
विशेष बाब म्हणजे दहावीसाठी यंदा बोर्डाची गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र याचा एकच दस्तऐवज असेल. मात्र बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी नेहमीप्रमाणे गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र वेगवेगळे मिळतील आणि ते अशाच प्रकारे डाऊनलोड करता येऊ शकतात.
अॅप डाऊनलोड करणं अनिवार्य नाही टाईम्स नाऊच्या वृत्तानुसार, बोर्डाने मेसेज पाठवला असला तरी हे अॅप डाऊनलोड करणं विद्यार्थ्यांसाठी अनिवार्य नाही. ज्या विद्यार्थ्यांना अॅप डाऊनलोड करायचं नसेल ते digilocker.gov.in या वेबसाईटवर लॉग इन करुनही आपली गुणपत्रिका डाऊनलोड करु शकतात.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI
Patanjali Ayurveda: पतंजली महाविद्यालयात चार दिवसांचा क्रीडा महोत्सव 'ओजस'ची सांगता; आचार्य बालकृष्ण यांनी विद्यार्थ्यांना दिला यशाचा मंत्र
MPSC च्या उमेदवारांसाठी शरद पवार मैदानात; गृहमंत्रालयाकडे मागणी, PSI भरतीसाठी महत्त्वाचं
Solapur News: UPSC परीक्षेत करमाळ्यातील शेतकऱ्याच्या लेकाची यशाला गवसणी, देशात 25वे स्थान, तर सांगोल्यातील सौरभची पाहिल्याच प्रयत्नात चमकदार कामगिरी
Dharashiv News: धाराशिवमध्ये ठाकरे गटाचा पराभव; राणा जगजितसिंहांनी ओमराजे निंबाळकरांच्या जखमेवर मीठ चोळलं, म्हणाले, 'बाळा नाद करायचा नाही'
नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्र आणि कतार म्युझियम्समध्ये 5 वर्षांचा करार, शालेय शिक्षणासाठी मोठं पाऊल
तर त्याला टायरीत घालतो म्हणणाऱ्या 'पालकमंत्री' अजितदादांकडून पुण्यात अट्टल गुन्हेगारांना रेड कार्पेट सुरुच! आंदेकर, गजा मारणेच्या बायकोनंतर आणखी एक गुन्हेगार शोधत उमेदवारीची 'बक्षिसी'
पुण्यात नऱ्हेजवळ भुमकर चौकात भयंकर ट्रॅफिक; नववर्षानिमित्त येणाऱ्या पर्यटकामुळे पुणेकर अडकले
BMC Election: ठाकरेंच्या शिवसेनेतही बंडाची लागण! थेट पक्षप्रमुखांसमोर अनिल परबांनी ताकद लावलेल्या उमेदवारानं सुद्धा बंडाची मशाल पेटवली, वरुण सरदेसाईंना तगडा झटका?
पहिल्यांदा नाशिकमध्ये भाजपचे AB फॉर्म घेऊन जाणाऱ्या गाड्यांचा चक्क पाठलाग, आता थेट आमदार सीमा हिरे आणि उमेदवाराच्या वादाचा व्हिडिओ व्हायरल!