मुंबई : सध्या मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (Megha Engineering) ही कंपनी चांगलीच चर्चेत आहे. या कंपनीच्या मालकांचं नाव पामीरेड्डी पीची रेड्डी (Pamireddy Pitchi Reddy) असे आहे. त्यांचा जन्म एका शेतकरी कुटंबात झाला. मात्र याच शेतकऱ्याच्या पुत्राने तब्बल 67 हजार 500 कोटी रुपयांचं साम्राज्य निर्माण केलं आहे. त्यांनी हे नेमकं कसं साध्य केलं? हे जाणून घेऊ या...
हिऱ्याच्या आकाराचं आहे घर
पीमीरेड्डी हे मूळचे आंध्र प्रदेशमधील कृष्णा जिल्ह्यातील रहिवासी आहेत. त्यांचा जन्म एका शेतकरी कुटुंबात झाला. त्यांनी सुरुवातीला व्यवसाय उभारण्यासाठी अवघ्या पाच लाख रुपयांत हैदराबमधील बालानगर येते मेघा इंजिनिअरिंगचा एक प्लन्ट उभा केला होता. सुरुवातीला ते महानरपालिकेला पाईप पुरवायचे. आता याच हैदराबादमध्ये हिऱ्याच्या आकाराचे त्यांचे आलिशान घर आहे. त्यांचे एक फार्म हाऊस असून त्यात त्यांचे स्वत:चे असे गोल्फ कोर्सदेखील आहे. सध्या त्यांच्या कंपनीचे बाजारभांडवल हे 67,500 रुपये आहे. फोर्ब्सनुसार त्यांची स्वत:ची संपत्ती ही 19,230 कोटी रुपये आहे.
20 राज्ये आणि अनेक देशात कंपनीचा विस्तार
मेघा इंजिनिअरिंगचा विस्तार सध्या 20 राज्ये आणि अनेक देशांत झालेला आहे. पामीरेड्डी यांच्यासोबत त्यांचे भाचे पीव्ही कृष्णारेड्डी यांनीदेखील या कंपनीत काम करायला सुरुवात केली होती. कालांतराने मेघा इंजिनिअरिंगचे रस्ते निर्मिती आणि इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स करणाऱ्या कंपनीत रुपांतर करण्यात आले. या क्षेत्रात तगडी स्पर्धा असूनही त्यांना मोठे प्रोजेक्ट्स मिळाले. सध्या या कंपनीचा विस्तार बांगलादेश, कुवैत या देशांत झाला असून तिथे या कंपनीकडून महामार्गनिर्मिती आणि पॉवर प्लान्टची निर्मिती केली जात आहे.
आतापर्यंत केले आहेत मोठी कामे!
मेघा इंजनिअरिंगने आतापर्यंत अनेक मोठी कामे केलेली आहेत. या कंपनीनेच झोजिला टनलची निर्मिती केलेली आहे. ही कंपनी आता तेलंगानातील कालेश्वरम लिफ्ट इरिगेशन प्रोजेक्ट तसेच मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रोजेक्टच्या वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स स्टेशनची निर्मिती करत आहे.
हेही वाचा :
सोन्याचा दर कमी होईना! 'या' कारणामुळे लवकरच होणार 1 लाख रुपये तोळा!
दिवसाची रात्र अन् रात्रीचा केला दिवस, पठ्ठ्या वडापाव विकून झाला कोट्यधीश, वाचा संघर्षमय कहाणी!