मुंबई : उद्योजक होऊन बक्कळ पैसा कमवण्यासाठी रोज अनेकजण झगडतात. मात्र उद्योगाच्या माध्यमातून कोट्यधीश होण्यात मोजक्याच लोकांना यश येतं. यातच उद्योजक व्यंकटेश अय्यर (venkatesh Iyer) यांचा समावेश आहे. त्यांनी फक्त वडापाव विकून कोट्यवधीचा व्यवसाय उभा केला आहे. सुरुवातीच्या काळात हा व्यवसाय उभारताना त्यांच्यापुढे अनेक संकटं आली. पण हार न मानता संकटांना तोंड देत त्यांनी आजघडीला 350 कोटी रुपयांचा व्यवसाय उभा केला आहे. 


वडापाव विकण्याची कल्पना सूचली


आज आपण ठिकठिकाणी गोली वडापावचे (Goli VadaPav) स्टोअर्स पाहतो. ते याच व्यंकटेश अय्यर (Venkatesh Iyer) यांच्या मालकीची आहेत. त्यांनी  रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करून वडापाव विकून कोट्यवधी रुपये कमवले आहेत. व्यंकटेश अय्यर यांना खाद्यक्षेत्रात स्वत:चा व्यवसाय उभा करायचा होता. किफायतशीर, स्वच्छ आणि गुणवत्तापूर्ण जेवण लोकांना मिळावे यासाठी ते प्रयत्न करत होते. यातून त्यांना वडापाव विकण्याची कल्पना सूचली. हा व्यवसाय उभारताना सुरुवातीच्या काळात त्यांना अनेक अडचणी आल्या. अनेकवेळा अपयशही आलं.


तोटा कमी करण्याचे आव्हान


सुरुवातीला अय्यर यांच्या गोली वडापाव या ब्रँडला टीकेचा सामना करावा लागला. हाताने तयार केलेल्या वडापावची सेल्फलाईफ फारच कमी असते. त्यामुळे आर्थिक तोट्याची शक्यता जास्त असते. हा तोटा कमी कसा करायचा, हा प्रश्न अय्यर यांच्यापुढे होता. तसेच 2004 साली कच्च्या मालाचे दर वाढले होते. अशा स्थितीत त्यांच्या महागाई त्यांच्या व्यवसायासाठी एक आव्हानच ठरले होते. मात्र त्यांनी या सर्व आव्हानांवर मात केली. 


संटकांवर केली मात


गोली वडापावमध्ये तयार होणाऱ्या वडापावची सेल्फ लाईफ वाढावी यासाठी त्यांनी स्वयंचलित मशीन्सचा वापर चालू केला. ते या मशिनींच्या माध्यमातूनच वडापाव तयार करू लागले. अय्यर यांचा एख मित्र फ्रोझम व्हेजिटेबल्स विकायचा. वडापाव तयार करण्यासाठी ते याच फळभाज्यांचा वापर करू लागले. ज्यामुळे वडापावची सेल्फ लाईफ वाढली आणि तोट्यात घट झाली. या प्रमुख अडचणीवर मात केल्यानंतर अय्यर यांचा आता चांगला काळ चालू झाला होता. त्यांच्या या व्यवसायाचा आता विस्तार होऊ लागला.


देशभरात 350 पेक्षा अधिक स्टोअर्स


व्यंकटेश अय्यर यांचा गोली वडापावचा व्यवसाय एकदा प्रस्थापित झाल्यानंतर त्याचा हळूहळू विस्तार होऊ लगला. लोकांना त्यांनी तयार केलेल्या वडापावची चव आवडू लागली. ग्राहकांची संख्या वाढू लागली. त्यामुळे गोली वडापावच्या वेगवेगळ्या प्रोडक्टसची मागणी वाढू लागली. आता गोली वडापावचे स्टोअर्स भारतभरात पाहायला मिळतात. सध्या अय्यर यांच्या कंपनीचे मूल्य हे 350 कोटी रुपये झाले आहे. या कंपनीचे देशातील 100 पेक्षा शहरांत स्टोअर्स आहेत. आमचे या शहरांत 350 पेक्षा अधिक स्टोअर्स आहेत, असा दावा या कंपनीकडून केला जातो. सध्या गोली वडापाव एका ब्रँड झाला आहे. यामागे व्यंकटेश अय्यर यांची कठोर मेहनत आहे. आजघडीला या कंपनीचे मूल्य 350 कोटी रुपये आहे. 


हेही वाचा :


तयारीला लागा! या आठवड्यात येणार 'हे' दोन जबरदस्त IPO, मालामाल होण्याची नामी संधी!


2 बुलेट ट्रेन, 20 लाखांपर्यंत कर्ज, 3 कोटी नवी घरं; भाजपचे आश्वासन, अर्थव्यवस्थेला उभारी मिळणार का?


कोट्यधीश उद्योगपतीने हे काय केलं? संपूर्ण संपत्ती दान करून घेतला धक्कादायक निर्णय!