भेंडी उत्पादनात आघाडीवर असणारी 5 राज्ये कोणती? सविस्तर माहिती एका क्लिकवर
Okra production : देशातील 5 राज्यांमध्ये भेंडीचं 65 टक्के उत्पादन (Okra production) घेतं जातं. पण देशात सर्वात जास्त भेंडीचं उत्पादन कोणत्या राज्यात होतं? हे तुम्हाला माहिती आहे का?
Okra production : देशात उन्हाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात भेंडीची (Okra) लागवड केली जाते. भेंडीत असणाऱ्या पोषक घटकांमुळं भेंडीला मोठी मागणी असते. आरोग्याच्या दृष्टीनं भेंडी फायदेशीर आहे. दरम्यान, देशातील 5 राज्यांमध्ये भेंडीचं 65 टक्के उत्पादन (Okra production) घेतं जातं. पण देशात सर्वात जास्त भेंडीचं उत्पादन कोणत्या राज्यात होतं? हे तुम्हाला माहिती आहे का? पाहुयात देशातील भेंडी उत्पादनाबाबत सविस्तर माहिती.
भेंडी उत्पादनात गुजरात प्रथम क्रमांकावर
भाज्यांमध्ये भेंडीला स्वतःचे एक वेगळे स्थान आहे. देशात मोठ्या प्रमाणात भाजीसाठी भेंडीचा वापर केला जातो.भारतात गुजरातमध्ये (Gujarat) सर्वाधिक भेंडीचं उत्पादन घेतलं जातं. म्हणजे भेंडी उत्पादनात गुजरात हे राज्य पहिले आहे. येथील शेतकरी दरवर्षी मोठ्या प्रमाणात भेंडीचं उत्पादन घेतलं जातं. देशातील एकूण भेंडी उत्पादनात गुजरातचा वाटा 15.89 टक्के आहे.
उन्हाळ्यात लोक मोठ्या प्रमाणात भेंडीची भाजी मोठ्या प्रमाणात खातात. भेंडीमध्ये मोठ्या प्रमाणात पोषक घटक आढळतात. त्यामुळं आरोग्यासाठी भेंडी खूप फायदेशीर ठरु शकते.
भेंडी उत्पादनात आघाडीवर असणारी 5 राज्ये
- भारतात गुजरातमध्ये सर्वाधिक भेंडीचं उत्पादन घेतलं जातं. येथील शेतकरी दरवर्षी मोठ्या प्रमाणात भेंडीचं उत्पादन घेतलं जातं. देशातील एकूण भेंडी उत्पादनात गुजरातचा वाटा 15.89 टक्के आहे.
- भेंडी उत्पादनात गुजरातनंतर पश्चिम बंगालचा बंगाल दुसऱ्या क्रमांकावर आहे. पश्चिम बंगालमध्ये भेंडीचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतलं जातं. भेंडी उत्पादनात या राज्याचा वाटा हा 13.93 टक्के आहे.
- भेंडी उत्पादनाच्या बाबतीत भारतातील पहिल्या तीन राज्यांमध्ये बिहारचा तिसरा क्रमांक लागतो. बिहारमध्ये 12.38 टक्के भेंडीचे उत्पादन घेतले जाते.
- भेंडी उत्पादनात मध्य प्रदेशचा चौथा क्रमांक लागतो. या राज्यातील शेतकरी दरवर्षी 11.75 टक्के भेंडीचं उत्पादन घेतात.
- राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाच्या आकडेवारीनुसार, ओडिशा हे राज्य भेंडी उत्पादनात पाचव्या क्रमांकावर आहे.ओडिशातील शेतकरी दरवर्षी 10.33 टक्के भेंडीचं उत्पादन घेतात.
भारतात भेंडीच्या वेगवेगळ्या अनेक प्रजाती उपलब्ध आहेत. भारत हा सर्वाधिक उत्पादन घेणाऱ्या देशांमध्ये अग्रेसर आहे. भेंडीमध्ये आरोग्याच्या दृष्टीनं अत्यंत आवश्यक विविध जीवनसत्वे, लोह तसेच खनिजे मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. त्यामुळं वर्षभर भेंडी पिकाला चांगली मागणी असते. विशेषत: उन्हाळ्यात भेंडी पिकाला मोठी मागणी असते. त्यामुळं या काळात ज्या शेतकऱ्यांकडे (Farmers) भेंडीचं पिकं आहे, त्या शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होतो.
महत्वाच्या बातम्या: