एक्स्प्लोर

कार खरेदी कधी करावी? कर्ज किती घ्यावे; जाणून घ्या 20-4 -10 फॉर्म्युला नेमका काय आहे?

प्रत्येकालाच आपल्या घरासमोर कार असावी असे वाटते. पण कार खरेदी करताना काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. अन्यथा तुम्हाला भविष्यात मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागू शकते.

मुंबई : माझ्या घरासमोर एक कार उभी असावी, असे प्रत्येकालाच वाटते. प्रत्येकाची एक तरी ड्रीम कार असतेच. ती कार खरेदी करण्यासाठी अनेकजण दिवसरात्र मेहनत करतात. पण कार खरेदी करताना काही बाबी लक्षात घेणे गरजेचे आहे. कार खरेदी केल्यास आपली आर्थिक ओढाताण होणार नाही ना? हा कार खरेदी करतानाचा सर्वांत मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे. ही ओढातान होऊ नये यासाठी 20-4-10 हा फॉर्म्यूला पाळणे गरजेचे आहे. या फॉर्म्यूल्यानुसार कार खरेदी केल्यास तुम्हाला भविष्यात आर्थिक अडचण येणार नाही. 

किती रुपयांची कार खरेदी करावी? 

आज घडीला एकापेक्षा कार बाजारात उपलब्ध आहेत. काही लाखांपासून ते कित्येक कोटींपर्यंतच्या कार तुम्हाला पाहायला मिळतील. तुमची ड्रीम कारदेखील कित्येक लाख किंवा कोटी रुपयांची असू शकते. पण तुम्ही प्रत्यक्षात कोणती कार खरेदी करू शकता, हे समजून घेणे गरजेचे आहे. तुमचा वार्षिक पगार जेवढा आहे, त्या पगाराच्या अर्ध्या किमतीहून कमी रकमेची कार खरेदी करायला हवी. उदाहरणासह सांगायचं झाल्यास समजा तुमचा वार्षिक पगार हा 10 लाख रुपये आहे. असे असेल तर तुम्ही 5 लाख रुपयांच्या आत किंमत असलेलीच कार खरेदी केली पाहिजे. तसे न केल्यास तुमचे आर्थिक गणित बिघडू शकते. 

कार नेमकी कधी खरेदी करावी? 

तुमचा पगार किती आहे? यावरून तुम्ही कार कधी खरेदी करावी, हे ठरवायला हवे. जेव्हा तुमचा पगार तुमच्या आवडत्या कारच्या किमतीपेक्षा दुप्पट होईल तेव्हा तुम्ही आरामात कार लोन घेऊ शकता. कर्ज घेऊनच कार खरेदी करायची आहे? त्यामुळे ईएमआयची चिंता कशाला. प्रत्येक महिन्याला ईएमआय भरता येईल, असा विचार अनेकजण करतात आणि कार खरेदी करतात. पण तसे केल्यास तुम्ही भविष्यात आर्थिकदृष्ट्या अडचणीत येऊ शकता.  

कार खरेदीचा 20-4-10 फॉर्म्यूला नेमका काय आहे? 

तुम्ही 20-4-10 या फॉर्म्यूल्याचे पालन केल्यास कार खरेदी करताना तुम्हाला अडचण येणार नाही. या फॉर्म्यूल्यातील 20 चा अर्थ म्हणजे तुम्ही कार खरेदी करताना कमीत कमी 20 टक्के डाऊन पेमेंट दिले पाहिजे. 4 आकड्याचा अर्थ हा तुमच्या कार लोनचा कालावधी हा चार वर्षांपेक्षा अधिक नसावा. 10 चा अर्थ हा तुमच्या कार लोनचा ईएमआय हा तुमच्या पगाराच्या 10 व्या भागापेक्षा अधिक नसावा. हे सूत्र पाळल्यास तुम्हाला कार खरेदी करताना अडचण येणार नाही. 

लेटेस्ट मॉडेलच्या प्रेमात पडू नका

कार खरेदी करताना तुम्ही जेवढे जास्त डाऊन पेमेंट द्याल, तेवढाच तुम्हाला ईएमआय कमी येईल. तसेच कार खरेदी करताना लेटेस्ट मॉडेलच्या प्रेमात पडू नका. लेटेस्ट मॉडेल असेल तर कार करेदी करताना तुम्हाला डिस्काउंट मिळत नाही. त्यामुळे उगीचच लेटेस्ट मॉडेलच्या मोहात पडून कर्जबाराजारी होऊ नये. 

हेही वाचा :

50 कोटींचा बंगला, आलिशान गाड्या अन् 20 लाखांचा बूट; शार्क टँकच्या जज नमिता थापर यांची थक्क करणारी लाईफस्टाईल!

प्रतिमहिना जमा करा 3000 अन् मिळवा 10000000 रुपये; जाणून घ्या एसआयपीचा जबरदस्त फॉर्म्यूला!

प्रज्वल ढगे हे 'एबीपी माझा ऑनलाईन'टीममध्ये 'कॉपी एडिटर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकारण, मनोरंजन, क्रीडाविषयक बातम्यांमध्ये विशेष रस आहे. त्यांनी याआधी 'लोकसत्ता', 'टीव्ही ९ मराठी' या माध्यमांत काम केलेले आहे.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

ऊसाला 5 हजार 500 रुपयांचा दर मिळावा, अन्यथा ऊस तोडू देणार नाही, राजू शेट्टींचा एल्गार, नेमक्या काय आहेत मागण्या?
ऊसाला 5 हजार 500 रुपयांचा दर मिळावा, अन्यथा ऊस तोडू देणार नाही, राजू शेट्टींचा एल्गार, नेमक्या काय आहेत मागण्या?
Home Loan : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं रेपो रेट वाढवला, ऑक्टोबरमध्ये सर्वात कमी व्याज दरावर गृहकर्ज कोणती बँक देते?  
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं रेपो रेट वाढवला, ऑक्टोबरमध्ये सर्वात कमी व्याज दरावर गृहकर्ज कोणती बँक देते?  
RBI :रुपया सावरण्यासाठी आरबीआयचा मोठा निर्णय, थेट डॉलर विक्री करणार, नियम कठोर करण्याचा निर्णय
रुपया सावरण्यासाठी आरबीआयचा मोठा निर्णय, थेट डॉलर विक्री करणार, नियम कठोर करण्याचा निर्णय
लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होणार, त्याआधी करावं लागणार 'हे' महत्वाचं काम, अन्यथा लाभापासून राहालं वंचित
लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होणार, त्याआधी करावं लागणार 'हे' महत्वाचं काम, अन्यथा लाभापासून राहालं वंचित

व्हिडीओ

Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha
Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CJP Protest Delhi: अजिंक्य शिंदेंच्या नेतृत्त्वात सीजेपीचे आंदोलक पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, मेट्रो सेवा सुरु, दिल्लीत नेमकं काय घडलं?
अजिंक्य शिंदेंच्या नेतृत्त्वात सीजेपीचे आंदोलक पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, मेट्रो सेवा सुरु, दिल्लीत नेमकं काय घडलं?
Delhi CJP Protest LIVE Updates: सीजेपी आज पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, अजिंक्य शिंदे करणार नेतृत्त्व
Delhi CJP Protest LIVE Updates: सीजेपी आज पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, अजिंक्य शिंदे करणार नेतृत्त्व
Rahul Gandhi: 'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
Neha Bora CJP Protest Delhi: दिल्ली पोलिसांचं लाजीरवाणं कृत्य, नेहा बोराला पकडताना पोलीस कर्मचाऱ्याने काय केलं? व्हिडीओ व्हायरल
दिल्ली पोलिसांचं लाजीरवाणं कृत्य, नेहा बोराला पकडताना पोलीस कर्मचाऱ्याने काय केलं? व्हिडीओ व्हायरल
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
Kolhapur News: प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं
Embed widget