मुंबई : तुम्ही अनेकदा अग्रिम कराबद्दल (Advance Tax) ऐकलेलं असेल. अग्रिम कर हा सर्वसामान्य कराप्रमाणेच असतो. मात्र यातील प्रमुख फरक म्हणजे अग्रिम कर वर्षातून चार वेळा भरावा लागतो. प्राप्तिकर अधिनियमाच्या कलम 208 नुसार जे करदाते 10 हजार रुपयांपेक्षा अधिक कर देतात (उद्गम कर वजा करून) त्यांना अग्रिम कर भरावा लागतो. याच पार्श्वभूमीवर अग्रिम कराबद्दल अतिरिक्त माहिती जाणून घेऊ या.
वर्षात कधी भरावा लागतो अग्रिम कर
अग्रिम कर वर्षात एकूण चार टप्प्यांत भरावा लागतो. प्रत्येक तीन महिन्यांना हा कर भरावा लागतो. नोकरदार, व्यापारी किंवा अन्य मार्गाने पैसे कमवणाऱ्या सामान्य माणसालादेखील हा कर भरावा लागू शकतो. हा कर भरण्यासाठीच्या तारखा आयकर विभागाकडून ठरवल्या जातात. सामान्यत: या तारखा 15 जून, 15 सप्टेंबर, 15 डिसेंबर आणि 15 मार्च अशा ठरवल्या जातात.
अग्रिम कर कसा काढला जातो?
अग्रिम कर वर्षात चार टप्प्यांत भरावा लागत असला तर एखाद्या करदात्याने किती कर भरावा याचा हिशोब संपूर्ण एका वर्षासाठी केला जातो. टॅक्स स्लॅबनुसार तुम्हाला किती कर द्यावा लागेल हे ठरवले जाते. वर्षात चार वेळा खालीलप्रमाणे कर भरावा लागतो.
15 जून - एकूण कराच्या 15 टक्के कर भरावा लागतो.
15 सप्टेंबर- एकूण 45 टक्के कर भरावा लागतो. (वरील 15 टक्के कर धरून)
15 डिसेंबर- एकूण 75 टक्के कर भरावा लागतो. (वरील 75 टक्के कर धरून)
15 मार्च- 100 प्रतिशत टक्के कर भरावा लागतो. (वरील 75 टक्के कर धरून)
अग्रिम कर कसा भरता येतो?
अग्रिम कर ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने भरता येतो. तुम्हाला अग्रिम कर ऑफलाईन भरायचा असेल तर बँकेत जावे लागेल. ऑनलाईन कर भरायचा असेल तर प्राप्तिकर विभागाच्या संकेतस्थळावर जाऊन हा कर भरता येतो. अग्रिम कर भरण्यासाठी incometax.gov.in हे अधिकृत संकेतस्थळ आहे.
असा भरा अग्रिम कर
वर नमूद केलेल्या संकेतस्थळावर जाऊन 'ई-पे टॅक्स' पर्यायाला सिलेक्ट करा
तुमचे पॅन कार्ड आणि पासवर्ड टाका.
अग्रिम कराच्या पर्यायावर क्लीक करा, तुमचे पेमेंट मोड सिलेक्ट करा
पेमेंवर क्लीक करून पे नाऊवर क्लीक करा
कर भरल्यानंतर तुम्हाला तसा मेसेज येईल, तसेच तुम्हाला पावतीही दिली जाईल.
हेही वाचा :
मंगळवारी सुस्साट, बुधवारीही मुसंडी मारणार? हे 'पाच' पेनी स्टॉक्स पाडणार पैशांचा पाऊस
सरकारच्या तिजोरीत पैसेच पैसे! आरबीआयनंतर आता एलआयसी देणार 3662 कोटींचा लाभांश!