Health : बदलत्या जीवनशैलीनुसार लोकांच्या सवयीही बदलल्या आहेत. अनेक जण पाश्चात्य संस्कृतीचे अनुसरण करण्याचा प्रयत्न करतात. काही जण अन्न खाताना चमचे आणि काट्याचा वापर करतात. पण तुम्हाला माहित आहे का? तुमचाच हात तुमच्या आरोग्यासाठी खरा जगन्नाथ आहे. कारण आयुर्वेदानुसार हाताने अन्न खाण्याचे अनेक फायदे सांगितले आहे. हाताने अन्न खाल्ल्याने वजन आणि लठ्ठपणाही नियंत्रणात ठेवता येतो. यासंदर्भात आयुर्वेदात काय म्हटलंय? जाणून घ्या...
आयुर्वेदानाही 'हे' मान्य केलंय की...
प्राचीन काळी लोक हाताने अन्न खात असत. हाताने अन्न खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. हाताने जेवणे ही केवळ एक परंपरा नाही तर या परंपरेमुळे आरोग्यासाठी अनेक फायदे होतात. आयुर्वेदानेही हे मान्य केले आहे की आयुर्वेदानुसार हाताने खाल्ल्याने पचनाच्या समस्या दूर होतात. त्यामुळे अनेक आजारांचा धोका टळतो. याशिवाय हाताने अन्न खाल्ल्याने वजन आणि लठ्ठपणाही नियंत्रणात ठेवता येतो.. गरज आणि वातावरणाचा विचार करून लोकांनी आता चमच्याने जेवायला सुरुवात केली असली तरी जेव्हा जेव्हा हाताने खाण्याची संधी मिळेल तेव्हा ही संधी सोडता कामा नये. आयुर्वेद आपल्याला निसर्गाशी जोडून ठेवण्याचे काम करतो. आयुर्वेदिक डॉक्टर दीक्षा भावसार सावलिया यांनी हाताने खाण्याचे फायदे आपल्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्या अनेकदा आरोग्याशी संबंधित अशा टिप्स शेअर करतात आणि लोकांना आरोग्याबाबत जागरूक करण्याचे काम करतात. चला जाणून घेऊया या फायद्यांबद्दल...
आयुर्वेदानुसार हाताने अन्न खाल्ल्याने नेमके काय होते?
आयुर्वेदानुसार हाताने अन्न खाल्ल्याने पचनक्रिया चांगली राहते. पोटाशी संबंधित अनेक समस्या दूर होतात.
आयुर्वेदानुसार, हाताची पाच बोटे आकाश (अंगठा), वायु (तर्जनी), अग्नि (मधली बोट), पाणी (अनाठी), पृथ्वी (करंगळी) दर्शवतात. हाताने खाल्ल्याने शरीरातील या पाच घटकांचे संतुलन राखून शरीराला ऊर्जाही मिळते.
याशिवाय जेव्हा आपण आपल्या हातांनी अन्नाला स्पर्श करतो तेव्हा मेंदूला एक सिग्नल पाठवला जातो की आपण खाण्यासाठी तयार आहोत, ज्यामुळे मेंदू आवश्यक पाचक एन्झाइम्स सोडतो, जे अन्न सहज पचण्यास मदत करते.
हाताने जेवताना आपण किती खावे, काय खावे आणि कोणत्या वेगाने खावे हे समजू शकतो, ज्यामुळे पचनाचे काम सोपे होण्यास मदत होते.
पचनसंस्था निरोगी ठेवायची असेल, तर चमचा सोडून हाताने खाण्याची सवय लावा, पण हाताने खाताना एका गोष्टीची विशेष काळजी घ्या. जेवण्यापूर्वी आणि नंतर हात साबणाने धुवावे लागतात.
हेही वाचा>>>
World Digestive Health Day 2024: पचनक्रियेचे 'हे' 5 कर्करोग ठरतील प्राणघातक! निरोगी जीवनाचं रहस्य जाणून घ्यायचंय? तज्ज्ञ सांगतात...
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )