Astrology : मे महिन्याची सुरुवात पंचकपासून (Panchak) झाली आणि आता शेवटही पंचक असेल. पंचक हा पाच दिवसांचा अशुभ काळ आहे ज्यामध्ये कोणतेही शुभ कार्य करण्यास मनाई करण्यात येते. यामुळेच पंचक किंवा भद्राकाळ इत्यादींची सावली राहू नये यासाठी कोणतेही काम करण्यापूर्वी शुभ काळ ठरवला जातो. जर तुम्ही कोणतेही शुभ कार्य, घराचे बांधकाम करण्याचं नियोजन करत असाल तर या महिन्याच्या पंचक कालावधीची तारीख नेमकी कोणती? हा काळ कधीपासून सुरु होतोय? तसेच, तो किती काळ असणार आहे? आणि कोणत्या राशींवर (Zodiac Sign) याचा परिणाम पडणार आहे या संदर्भात अधिक माहिती जाणून घ्या. 


पंचक काळ कधीपासून? 


मे महिन्यात दुसऱ्यांदा येणारा पंचक योग 29 मे 2024 रोजी रात्री 08.06 पासून (म्हणजेच आज रात्रीपासून) सुरू होईल. हा पंचक काळ आजपासून पाच दिवस म्हणजेच सोमवार, 3 जून 2024 रोजी दुपारी 01.40 वाजेपर्यंत असणार आहे. अशा प्रकारे जून महिना पंचकमध्येच सुरू होईल. अशा स्थितीत जर तुम्ही कोणतेही शुभ कार्य करण्याची योजना आखत असाल तर पंचक सुरू होण्यापूर्वी करा. वास्तविक हे पंचक 29 मे, बुधवारपासून सुरू होत असून बुधवारपासून सुरू होणारे पंचक अशुभ मानले जात नाही. पण तरीही अनेक गोष्टी आहेत ज्या पंचक काळात करू नयेत. 


पंचकमध्ये चुकूनही 'हे' काम करू नका 


पंचक काळात जर तुम्ही खालीलपैकी कोणतेही कामे केल्यास चोरी, धनहानी, आजारपण किंवा मृत्यूसारखे संकटं ओढावण्याची शक्यता असते असे धार्मिक शास्त्रात सांगितले आहे. त्यामुळे पंचकातील 5 दिवसात निषिद्ध कार्य करू नये. 



  • पंचक काळात विवाह, मुंडन, पवित्र धागा इत्यादी शुभ कार्ये करण्यास मनाई आहे.

  • पंचक काळात नवीन घराचे बांधकाम सुरू करणे, छत, दरवाजाची चौकट बसवणे आणि घरात प्रवेश करणे अत्यंत अशुभ मानलं जातं. पंचकमध्ये बांधलेल्या घरात सुख-समृद्धी कधीच येत नाही. या लोकांना गरिबी आणि आजारांना सामोरे जावे लागते. 

  • पंचकमध्ये नवीन व्यवसाय सुरू करू नका, यश मिळण्यात शंका आहे. 

  • याशिवाय पंचांगात पलंग किंवा खाट बनवणे आणि लाकूड गोळा करणे देखील अशुभ आहे.

  • पंचक काळात दक्षिण दिशेला प्रवास करू नये. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा: 


Astrology : आज सिद्धी योगासह जुळून आले अनेक शुभ योग; तूळसह 'या' राशींना मिळणार नशिबाची साथ, धन-संपत्तीत होणार वाढ