सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजारात मोठे चढउतार पाहायला मिळतायत. देशात आता कोणाचे सरकार येणार? या एका प्रश्नाच्या उत्तरावर सध्या शेअर बाजाराची दिशा ठरत आहे. दरम्यान, शेअर बाजारात सध्या काहीशी अस्थिरता असली तरी, काही शेअर्स मात्र चांगली कामगिरी करताना दिसतायत. यात काही पेनी स्टॉक्सचाही समावेश आहे. मंगळवारी या पेनी स्टॉक्सने चांगली कामगिरी केली. विशेष म्हणजे काही पेनी स्टॉक्सला तर अपर सर्किट लागले. याच कारणामुळे बुधवारीदेखील हे शेअर्स चांगली कामगिरी करण्याची शक्यता आहे. हे शेअर्स कोणते आहेत? हे जाणून घेऊ या...
Angel Fibers Ltd
पेनी स्टॉक्समध्ये मंगळवारी चांगली कामगिरी करणाऱ्या स्टॉक्समध्ये पहिल्या क्रमांकावर एंजल फायबर्स लिमिटेड या शेअरचे नाव आहे. मंगळवारी या अनेकांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी केली. सत्राच्या शेवटी हा शेअर 26.40 रुपयांवर बंद झाला. मंगळवारी या शेअरमध्ये 20 टक्क्यांची तेजी राहिली. त्यामुळे बुधवारीदेखील या शेअरचा आलेख चढाच राहण्याची शक्यता आहे.
Odyssey Tech
या कंपनीचा स्टॉक गेल्या काही ट्रेडिंग सत्रांत अपट्रेंड आहे. मंगळवारी या शेअरमध्ये 20 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली. मंगळवारी या शेअरला अपर सर्किट लागले. सत्राच्या शेवटी हा शेअर 156.97 रुपयांवर बंद झाला. त्यामुळे बुधवारीदेखील खरेदीदार या शेअरकडे आकर्षित होऊ शकतात.
Galaxy Cloud
गॅलेक्सी क्लाउड या कंपनीच्या स्टॉकमध्ये मंगळवारी साधारण 20 टक्क्यांची तेजी पाहायला मिळाली. मंगळवारी हा शेअर 24.31 रुपयांवर बंद झाला. मंगळवारी अनेकांनी हा शेअर खरेदी केला. त्यामुळे बुधवारीदेखील हा शेअर खरेदी करण्याकडे गुंतवणूकदारांचा कल असू शकतो.
Yash Manage
मंगळवारी भांडवली बाजार चालू असताना या शेअरमध्ये एकूण 20 टक्क्यांची तेजी पाहायला मिळाली. सत्राच्या शेवटी हा शेअर 15.94 रुपयांवर बंद झाला. मंगळवारी हा शेअर खरेदी करण्याकडे गुंतवणूकदारांचा कल होता. हाच ट्रेण्ड बुधवारीदेखील कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे या शेअरचे मूल्य बुधवारी वाढण्याची शक्यता आहे.
Ashima
मंगळवारच्या सत्रात हा शेअर 15 टक्क्यांनी वाढला. दिवसाच्या अखेरीस हा शेअर 33.90 रुपयांवर बंद झाला. बुधवारीदेखील या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळू शकते.
हेही वाचा :
कधी सोन्याचा दर गगनाला, तर कधी घसरण; चार दिवसांत 2500 रुपयांनी स्वस्त; जाणून घ्या नेमकं कारण काय?
कोलकाता जिंकली, पण IPL मधून शाहरुखला किती प्रॉफिट होतो? जाणून घ्या कमाईचं गणित
महागड्या गाड्या, आलिशान घर! कोलकाताला IPLची ट्रॉफी मिळवून देणारा, श्रेयस अय्यर किती कोटींचा मालक?