मुंबई : आरोग्य विमा (Health Insurance) हा सध्या आवश्यक बाब बनली आहे. एखादा आजार उद्भवल्यास ऐनवेळी धावपळ होऊ नये म्हणून आता अनेकजण आरोग्य विमा काढून ठेवत आहेत. सध्या आरोग्य विम्याबाबत लोकांमध्ये जागृती निर्माण झालेली आहे. त्याचाच परिपाक म्हणून 2023 या एका आर्थिक वर्षात भारतात एकूण 55 कोटी लोकांनी आरोग्य विमा काढलेला आहे. भारतात एकूण 57 आरोग्य विमा देणाऱ्या कंपन्या आहेत. याच पार्श्वभमीवर मॅटर्निटी इन्शुरन्स (Maternity Insurance) नावाची संकल्पना काय आहे? महिलांना या विम्याचा काय फायदा होतो? हे जाणून घेऊ या..
मॅटर्निटी इन्शुरन्स काय असतो?
मातृत्त्व विमा म्हणजेच मॅटर्निटी इन्शुरन्स अनेक अर्थांनी महत्त्वाचा आहे. हा एका प्रकारचा आरोग्य विमाच आहे. अनेक विमा कंपन्या मॅटर्निटी इन्शुरन्स अंतर्गत प्रसूदिच्या अगोदरचा तसेच प्रसूतीनंतरचा खर्च देतात. अनेक कॉर्पोरेट कंपन्यादेखील आरोग्य विमा योजनेअंतर्गत आपल्या महिला कर्मचाऱ्यांचा प्रसूती काळातील खर्च करतात. मॅटर्निटी इन्शुरसन एक अॅड-ऑन इन्शुरन्स आहे, ज्याला सामान्य आरोग्य विम्यासोबत घेता येते. या अॅड-ऑन इन्शुरन्स अंतर्गत प्रसूतीचा सर्व खर्च अंतर्भूत असतो.
या विम्याचे काय फायदे मिळतात?
मॅटर्निटी इन्शुरन्सचे अनेक फायदे आहेत. प्रसूतीच्या काळात आपला खर्च वाचावा यासाठी हा अॅड-ऑन इन्शुरन्स घेतला जातो. या इन्शुरन्सअंतर्गत विमा कंपनी रुग्णालयाची फी देते, तसेच लसीकरण, वंध्यत्त्व उपचार, तसेच काही प्रसंगी मूल दत्तक घेण्यासाठीचा खर्चदेखील विमा कंपन्या उचलतात. काही काही मॅटर्निटी इन्शुरन्समध्ये सरोगसीचा खर्चदेखील दिला जातो. कोणताही आरोग्य विमा घेतल्यानंतर मॅटर्निटी इन्शुरन्स कव्हरेजसाठी दोन ते चार वर्षांचा वेटिंग पिरियड असायचा. पण आता हा काळ 9 महिन्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे.
कॅशलेश खर्चाची सुविधा
मॅटर्निटी इन्शुरन्स अंतर्गत तुम्ही महिलेला रुग्णालयात दाखल केल्यास कॅशलेस उपचार होतात. म्हणजेच संबंधित महिलेला प्रसूतीसाठी कोठेही रोख पैसे देण्याची गरज नसते. रुग्णालयात जाऊन फक्त विमा कंपनीला प्रसूतीबाबत माहिती द्यायची. त्यानंतर आवश्यक असलेली कागदपत्रे जमा करून प्रसूतीचा सर्व उपचार हा कॅशलेश हतो. तुम्हाला पैसे देण्याची गरज नसते. यासह काही मॅटर्निटी इन्शुरन्समध्ये नवजात बाळ 1 ते 90 दिवसांचे होईपर्यंत त्याच्या खर्चाचीही सुविधा असते.
(टीप- अनेक विमा कंपन्यांच्या अटी, सुविधा वेगवेगळ्या असतात. त्यामुळे कोणताही विमा काढताना विमा एजंटशी सखोल चर्चा करावी आणि नंतरच विमा खरेदी करावा.)
हेही वाचा :
मोदींनी 9 लाख गुंतवले, आता मिळणार 13 लाख रुपये, पोस्टाची 'ती' योजना आहे तरी काय?
SIP करताना 'ही' एक काळजी घ्या, अन्यथा मोठं नुकसान झालंच म्हणून समजा!
रॉकेटच्या वेगाने पैसे वाढणार, फक्त 15 वर्षांत व्हा करोडपती; जाणून घ्या 12-15-20 चा फॉर्म्यूला काय?
श्रीमंत व्हायचंय? मग फक्त 'या' पाच गोष्टी पाळा; संपत्ती वाढलीच म्हणून समजा!