मुंबई : एसआयपीच्या (SIP) माध्यमातून म्यूच्यअल फंडात गुंतवणूक करणे फायद्याचे आहे. अशा प्रकारच्या गुंतवणुकीमुळे दीर्घकालीन गुंतवणुकीमुळे गुंतवणूकदारांना चांगला फायदा होतो. दरम्यान, एसआयपी करताना दरवर्षी चांगली कामगिरी करणाऱ्या इंडेक्समध्ये स्वीच केल्यास तुम्हाला नुकसान होऊ शकते. त्यामुळे तुम्ही सुरुवातीपासून ज्या फंडात गुंतवणूक करत आहात, तो न बदलता त्याच फंडात गुंतवणूक चालू ठेवणे हे फायद्याचे ठरू शकते.  


19 वर्षांच्या एसआयपीच्या रिटर्न्सची तुलना 


व्हाइटओक कॅपिटल म्यूच्यूअल फंडाने ( WhiteOak Capital Mutual Fund) एक मोठा अभ्यास केला आहे. व्हाइटओक कॅपिटलने आर्थिक वर्ष 2005-06 पासून आर्थिक वर्ष 2023-24 या 19  वर्षात करण्यात आलेल्या एसआयपीची तुलना केली आहे. या तुलनेतून अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. एक इंडेक्समध्ये एसआयपी (SIP) चालू ठेवून मिळालेले रिटर्न्स आणि गेल्या वर्षी चांगली कामगिरी करणाऱ्या इंडेक्समध्ये एसआयपपी स्वीच करून मिळवलेले रिटर्न्स याची या अभ्यासात तुलना करण्यात आली आहे. गेल्या 19 वर्षांत 1 एप्रिल 2024 पर्यंत स्मॉलकॅप इंडेक्स आणि मिडकॅप इंडेक्समध्ये केलेल्या एसआयपीने लार्ज कॅप इंडेक्सच्या तुलनेत चांगले रिटर्न्स दिले आहेत. या 19 वर्षांच्या काळात लार्जकॅप सेगमेंटच्या एसआयपीने सात वेळा आउटपरफॉर्म कामगिरी केलेली आहे.  तर स्मॉलकॅप आणि मिडकॅप इंडेक्सच्या एसआयपीने 6 वेळा आऊटपरफॉम कामगिरी केली आहे. 


एकाच इंडेक्समध्ये एसआयपी करणे फायद्याचे


व्हाइटओक कॅपिटल म्यूच्यूअल फंडाच्या म्हणण्यानुसार वित्त वर्ष 2005-06 पासून मिडकॅप आणि स्मॉलकॅप इंडेक्समध्ये दीर्घ काळासाठी गुंतवणुकीतून मिळवलेले रिटर्न्स हे बेस्ट परफॉर्म करणाऱ्या इंडेक्समध्ये स्वीच करून मिळवलेल्या रिटर्नपेक्षा अधिक आहेत. व्हाइटओक कॅपिटल म्यूच्यूअल फंडाच्या म्हणण्यानुसार गेल्या वर्षी बेस्ट परफॉर्म करणाऱ्या इंडेक्समध्ये एसआयपी स्वीच न करता मीडकॅप इंडिकेसमध्ये एसआयपी चालू ठेवल्यास त्यावर 1 एप्रिल 2024 पर्यंत 18.8 टक्के रिटर्न्स मिळाले आहेत. दुसरीकडे इंडेक्समध्ये बदल केल्यास मिळणारे रिटर्न्स हे 15.5 टक्के आहेत. या काळात एखाद्या गुंतवणूकदाराने स्मॉलकॅप फंडात गुंतवणूक केल्यास त्याला वर्षाला 16  टक्के रिटर्न्स मिळालेले आहेत. इंडेक्समध्ये बदल केल्यास मिळणारे रिटर्न्स हे 15.1 टक्क्यांवर पोहोचतात. त्यामुळे इंडेक्स न बदलता एसआयपी चालू ठेवणे हे फायद्याचे ठरू शकते.


(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. आम्ही या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा या लेखामागचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)


हेही वाचा :


अनंत-राधिकाच्या दुसऱ्या प्री-वेडिंगची लगबग; कधी, कुठे आणि कसा पार पडणार पुन्हा एक भव्य दिव्य सोहळा? संपूर्ण माहिती एका क्लिकवर 


तुमच्याकडे 'हे' Android स्मार्टफोन असतील तर त्यात Google Wallet चालणार नाही, सुरक्षेच्या मुद्द्यावरून गुगलचा मोठा निर्णय


अँटिबायोटिक्स, मल्टीव्हिटामीनसह डायबिटीजसारख्या आजारांवरील 41 औषधं स्वस्त; NPPA चा दिलासादायक निर्णय