मुंबई : आपल्या प्रत्येकालाच श्रीमंत व्हावसं वाटतं. जगातील सर्व ऐश्वर्य आपल्या पायापाशी असावं, असे अनेकांचे स्वप्न असते. मात्र प्रत्येकालाच श्रीमंत होणं शक्य होत नाही. विशेष म्हणजे श्रीमंत व्हायचं असेल तर प्रचंड मेहनत घ्यावी लागते. दिवसरात्र कष्ट करावे लागतात. कष्टासह तुमच्याकडे असलेल्या पैशांची योग्य ठिकाणी गुंतवणूक केल्यास तुम्ही लवकर श्रीमंत होऊ शकता. दरम्यान, श्रीमंत होण्यासाठी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी, नेमके काय करावे? स्वत:ला कोणत्या सवयी लावून घ्याव्यात हे जाणून घेऊ या...
गोल सेट करा
तुम्ही कोणतेही एखादे ध्येय निश्चित केल्यावर त्यानुसार पैसे वाचवणे तसेच जमा केलेले पैसे वाढवणे सोपे होईल. विशेष म्हणजे तुम्ही पैसे कमवण्यासंदर्भात एखादे ध्येय निश्चित केल्यानंतर हे ध्येय किती दिवसांत पूर्ण करायचे, हेदेखील निश्चित करा. म्हणजे त्यानुसार तुम्हाला नेमकं काय करायचं आहे, हे समजेल.
बेजट तयार करा, खर्चाची नोंद ठेवा
तुम्हाला तुमच्याकडचे पैसे वाढवायचे असतील तर अगोदर जवळ असलेले पैसे वाचवणे गरजेचे आहे. त्यासाठी तुम्ही खर्च करत असेलेल्या पैशांचा हिशोब ठेवा. घराचे भाडे, वीजबील, बाहेर जेवणासाठी गेलेले पैसे अशा सर्व खर्चाच हिशोब ठेवा. महिन्याला किती खर्च झाला पाहिजे हे ठरवून घ्या. त्यानुसारच महिन्याला पैसे खर्च झाले पाहिजे, यासाठी प्रयत्न करा. ठरवलेल्या खर्चाच्या अधिक खर्च होऊ नये यासाठी प्रयत्न करा.
फक्त पैसे वाचवू नका, ते योग्य ठिकाणी गुंतवा
पैसे वाचवणे हे चांगलेच आहे. मात्र पैशांचे मूल्य दिवसेंदिवस घटत असते. त्यामुळे तुमच्याकडे असलेल्या पैशांचे मूल्य वाढावे यासाठी ते योग्य ठिकाणी गुंतवले पाहिजेत. तुम्ही हे पैसे दीर्घकाळासाठी गुंतवले तर अधिक फायदा होतो. तुमच्या पैशाचे मूल्य वाढते. तुम्ही जेवढ्या लवकर आणि दीर्घ काळासाठी गुंतवणूक कराल, तेवढेच तुमच्या पैशांचे मूल्य वाढेल.
योग्य ठिकाणी गुंतवणूक करणे गरजेचे
तुम्ही तुमच्याकडे असलेल्या पैशांना गुंतवायचा निर्णय घेतला असला तरी ते योग्य ठिकाणी गुंतवणे गरजेचे आहे. ज्या ठिकाणी जास्त रिटर्न्स मिळतात, अशा ठिकाणी पैसे गुंतवले पाहिजेत. विशेष म्हणजे हे पैसे गुंतवताना ते बुडणार नाहीत, याचीही काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी पूर्ण अभ्यास करूनच पैसे गुंतवले पाहिजेत. तुम्ही एफडी, गोल्ड बॉन्ड, बॉन्ड्स अशा ठिकाणी गुंतवणूक केल्यावर पैसे बुडण्याचा धोका नसतो. पण या ठिकाणी रिटर्न्सदेखील कमी मिळतात. दुसरीकडे इक्विटी मार्केटमध्ये पैसे गुंतवल्यास येथे रिटर्न्स जास्त मिळतात पण पैसे बुडण्याचाही येथे धोका असतो. त्यामुळे योग्य अभ्यास करूनच पैसे गुंतवले पाहिजेत.
इमर्जन्सी फंड उभा करा
घरी आपत्कालीन स्थिती कधीही निर्माण होऊ शकते. त्यामुळे इमर्जन्सी फंड तयार करा. अशा प्रकारच्या इमर्जन्सी फंडमुळे तुम्ही इतर ठिकाणी करत असलेल्या गुंतवणुकीवर परिणाम पडत नाही. तसेच आपत्कालीन स्थितीत इमर्जन्सी फडंमध्ये असलेला पैसे कामाला येतो. नोकरी गेल्यावर, आरोग्यविषयक समस्या उभी राहिल्यास हा इमर्जन्सी फंड कामी येतो. हा इमर्जन्सी फंड नसेल तर आपत्कालीन स्थितीत आपण गुंतवणूक केलेले पैसे काढून घेतो. अशी वेळ येऊ नये म्हणून इमर्जन्सी फंड जरूर तयार करा.
हेही वाचा :
SIP करताना 'ही' एक काळजी घ्या, अन्यथा मोठं नुकसान झालंच म्हणून समजा!
रॉकेटच्या वेगाने पैसे वाढणार, फक्त 15 वर्षांत व्हा करोडपती; जाणून घ्या 12-15-20 चा फॉर्म्यूला काय?