मुंबई : एक काळ असा होता, जेव्हा कोट्यधीश होणं हे फार कठीण काम वाटायचं. मात्र सध्या असे काही सेव्हिंग प्लॅन्स आहेत, ज्यांच्या मदतीने आपण काही निश्चित वर्षांत कोट्यधीश होऊ शकतो. म्यूच्यूअल फंडमध्ये (Mutual Fund) एसआयपीच्या (SIP) माध्यमातून गुंतवणूक केल्यास तर कोट्यधीश होण्याची शक्यता वाढते. म्यूच्यूअल फंडात एसआयपी आणि लम्पसम अशा दोन्ही माध्यमातून गुंतवणूक करू शकता. दरम्यान, एसआयपीच्या मदतीने फक्त 15 वर्षात तुम्हाला कोट्यधीश कसे होता येईल, हे जाणून घेऊ या.. 


एसआयपीवर मिळतात 12 टक्के रिटर्न्स


एसआयपीच्या मदतीने दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक केल्यास जास्त फायदा होतो. एसआयपीमध्ये चक्रवाढ व्याजाचाही फायदा मिळतो. त्यामुळे एसआयपी हा गुंतवणुकीचा चांगला पर्याय आहे. एसआयपीच्या माध्यमातून गुंतवलेल्या पैशांत सरासरी 12 टक्क्यांनी रिटर्न्स मिळतात, असे गृहित धरले जाते. हेच रिटर्न्स गृहित धरून अगदी पंधरा वर्षांत कोट्यधीश होता येते. त्यासाठी एक खास फॉर्म्यूला आहे. 


12-15-20 चा फॉर्म्यूला तुम्हाला करणार कोट्यधीश 


तुम्हाला कोट्यधीश व्हायचे असेल तर 12-15-20 या फॉर्म्यूल्याचे पालन करावे लागेल. 12-15-20 या फॉर्म्यूल्याचा अर्थ अगदी सोपा आहे. या फॉर्म्यूल्यातील 12 म्हणजे तुमच्या एसआयपीवर सरासरी 12 टक्के रिटर्न्स मिळणे. 15 म्हणजे एसआयपीची ही गुंतवणूक 15 वर्षांसाठी करायची. तर 20 याचा अर्थ तुम्हाला एसआयपीमध्ये महिन्याला 20,000 रुपये जमा करावे लागतील. 30 वर्षांचे असताना ही सेव्हिंग केली असती तर या फॉर्म्यूल्याच्या मदतीने वयाच्या 45 वर्षांपर्यंत तुम्ही कोट्यधीश झाले असते. 


असे व्हा कोट्यधीश 


तुम्ही जर प्रत्येक वर्षी 20,000 रुपयांची एसआयपी केली तर 15 वर्षांत तुमचे एकूण 36,00,000 रुपये जमा होतील. SIP Calculator नुसार तुम्हाला 12 टक्के रिटर्न्स मिळाले असे गृहित धरले तर या जमा केलेल्या रकमेवर तुम्हाला 64,91,520 रुपये व्याज मिळेल. म्हणजेच 15 वर्षांनंतर तुम्हाला एकूण 1,00,91,520 रुपये मिळतील. याच एसआयपीवर 15 टक्के रिटर्न्स मिळाले तर तुम्हाला एकूण 1,35,37,262 टक्के रिटर्न्स मिळतील.


(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. आम्ही या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा या लेखामागचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)


हेही वाचा :


SIP करताना 'ही' एक काळजी घ्या, अन्यथा मोठं नुकसान झालंच म्हणून समजा!


तुमच्याकडे 'हे' Android स्मार्टफोन असतील तर त्यात Google Wallet चालणार नाही, सुरक्षेच्या मुद्द्यावरून गुगलचा मोठा निर्णय


अनंत-राधिकाच्या दुसऱ्या प्री-वेडिंगची लगबग; कधी, कुठे आणि कसा पार पडणार पुन्हा एक भव्य दिव्य सोहळा? संपूर्ण माहिती एका क्लिकवर