मुंबई : नोकरी लागल्यानंतर संबंधित व्यक्तीला प्रत्येक महिन्याला एक निश्चित पगार मिळतो. या पगारासोबतच त्या व्यक्तीला ईपीएफ, जीवन विमा, आरोग्य विमा, ग्रॅच्यूईटी आदी सुविधाही मिळतात. प्रत्येक सुविधेचा आपला-आपला वेगळा फायदा आहे. मात्र निवृत्तीनंतर ग्रॅच्यूईटीतून मिळणारी रक्क्म खूप कामाला येते. याच पार्श्वभूमीवर ग्रॅच्यूईटीबाबत काय कायद आहे? ग्रॅच्यूईटी कोणाला मिळते? हे जाणून घेऊ या... 


कर्मचारी निवृत्त झाल्यानंतर संबंधित कंपनी त्या कर्मचाऱ्याला ग्रॅच्यूईटीच्या रुपात मोठी रक्कम देते. नोकरी सोडतानादेखील कंपनी तुम्हाला ही रक्कम देते. मात्र त्यासाठी तुम्ही संबंधित कंपनीत कमीत कमी पाच वर्षे काम करणे गरेजेचे आहे. शासकीय कर्मचाऱ्यांनादेखील (Central government employees gratuity) ग्रॅच्यूईटीचा लाभ मिळतो. एखाद्या कंपनीत तुम्ही दीर्घकाळ काम केल्यावर कंपनी तुम्हाला ग्रॅच्यूईटीच्या रुपात काही रक्कम देते.  


Gratuity चा नेमका फायदा काय? 


एखाद्या खासगी कंपनीत 10 पेक्षा अधिक लोक राहात असतील तर अशा कंपनी संबंधित मालकाला सर्व कर्मचाऱ्यांना ग्रॅच्यूईटीचा लाभ देणे बंधनकारक असते. हा नियम दुकान, खाण, एखादी कंपनी अशा सर्वच ठिकाणी लागू होतो. निवृत्तीनंतर भविष्यात आर्थिक अडचण येऊ नये यासाठी सरकारने ग्रॅच्यूईटीचा नियम आणलेला आहे.   


....तर ग्रॅच्यूईटी नॉमिनीला मिळते 


नोकरी करताना संबंधित कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास मिळणारी ग्रॅच्यूईटी, त्या कर्मचाऱ्याच्या नॉमिनीला मिळते. अशा स्थितीत कमीत कमी पाच वर्षे सेवा देण्याचा अट शिथील केली जाते.


ग्रॅच्यूईटी कायदा काय सांगतो?


ग्रॅच्यूईटी अॅक्ट 1972 (Gratuity payment act 1972) या कायद्यानुसार कर्मचाऱ्यांना ग्रॅच्यूईटीचा अधिकार मिळतो. नोकरी करताना मिळणाऱ्या अनेक लाभांपैकी हा एक महत्त्वाचा लाभ आहे. मात्र लवकर-लवकर नोकरी बदलल्यामुळे अनेक कर्मचारी ग्रॅच्यूईटीकडे दुर्लक्ष देतात.   है.


सरकारने बदलला नियम


खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ग्रॅच्यूईटीची सीमा ही 20 लाख रुपये करण्यात आली आहे. यावर त्यांना कोणताही कर द्यावा लागत नाही. शासकीय कर्मचाऱ्यांन तर मिळणाऱ्या ग्रॅच्यूईटीवर अगोदरपासूनच कर नाही.


Gratuity मिळवण्यासाठी नेमकी पात्रता काय?  


तुम्ही एखाद्या कंपनीत जेवढा जास्त काळ काम केले, मिळणारी ग्रॅच्यूईटीही तेवढीच जास्त असते. सजमा एखाद्या कर्मचाऱ्याला कंपनीत काम करून 6 वर्षे 9 महीने झाले आहेत, तर ग्रॅच्यूईटीचा काळ हा 7 वर्षे पकडला जातो. तसेच एखाद्या कर्मचाऱ्या पाच वर्षे 4 महिने नोकरी केली असेल तर त्याचा ग्रॅच्यूईटीचा काळ पाच वर्षे मानला जातो. 


हेही वाचा :


'या' पाच स्टॉक्समध्ये गुंतवा अन् एका वर्षासाठी विसरून जा; मिळू शकतात पैसेच पैसे!


NTPC, स्विगी ते ह्युंदाई, पुढच्या तीन महिन्यांत तब्बल 60000 कोटींचे आयपीओ, पैसे ठेवा तयार!


दिवाळीपूर्वीच झटका! ऐन सणासुदीच्या काळात व्यावसायिक गॅस सिलिंडर महागले; नवे दर लागू!