Sharekhan 5 top Stocks to Buy: शेअर बाजारात सध्या चढ-उताराची मालिका चालू आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच सोमवारी मुंबई शेअर बाजाराच निर्देशांक सेन्सेक्स दिवसाअखेर 1,272.07 अंकांनी घसरून 84299.78  अंकांवर स्थिरावला. तर राष्ट्रीय शेअर बाजारात कोणताही चढउतार दिसला नाही. दिवसाअखेर राष्ट्रीय शेअर बजाराचा निर्देशांक निफ्टी 25810.85 अंकांवर स्थिरावला. दरम्यान, सध्या जागतिक पटलावर मोठ्या घडामोडी घडत आहेत. तसेच भारतातही काही शेअर्सना उभारी मिळाली आहे, तर काही शेअर्स गडगडले आहेत. अशा स्थितीत योग्य कंपनीत पैसे गुंतवणं गरजेचं आहे. दीर्घकालीन गुंतवणूक नेमहीच फायदेशीर ठरत आलेली आहे. त्यामुळे ब्रोकरेज फर्म शेअरखानने (Sharekhan) चांगले फंडामेंटल असलेले 5 शेअर्स सुचवले आहेत. या शेअर्समध्ये पुढच्या एका वर्षासाठी गुंतवणूक करता येईल, असे शेअरखानने सांगितले आहे.


शेअरखानने सुचवलेल्या या पाच शेअर्समध्ये Larsen & Toubro, TCS, HAL, Zydus Wellness, SBI या शेअर्सचा समावेश आहे. शेअरखानने सांगितल्यानुसार हे शेअर्स एका वर्षांत साधारण 50 टक्क्यांपर्यंत रिटर्न्स देऊ शकतात. 


लार्सन अँड टर्बो (Larsen & Toubro)


Larsen & Toubro हा शेअर खरेदी करण्याचा सल्ला Sharekhan या ब्रोकरेज फर्मने दिला आहे. या शेअरमध्ये गुंतवणूक करायची असेल तर 4550 रुपये प्रति शेअरचे टार्गेट ठेवावे, असे मम म्हटलंय. 30 सप्टेंबर 2024 रोज या शेअरचे मूल्य 3680 रुपये होते. भविष्यात हा शेअर साधारण 24 टक्क्यांनी रिटर्न्स देण्याची शक्यता आहे.  


TCS 


शेअरखान या ब्रोकरेज फर्मने TCS या कंपनीत गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. त्यासाठी 5230 रुपयांचे टार्गेट ठेवायला हवे. 30 सप्टेंबर 2024 रोजी या शेअरचे मूल्य 4271 रुपये होते. हा स्टॉक भविष्यात साधारण 22 टक्क्यांनी रिटर्न्स देण्याची शक्यता आहे. 


HAL


शेअरखान या ब्रोकरेज फर्मने HAL या शेरमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. त्यासाठी टार्गेट 5485 रुपये असावे असा सल्ला शेअरखानने दिला आहे. या शेअरचे मूल्य 30 सप्टेंबर 2024 रोजी 4420 रुपये होते. भविष्यात एका वर्षात हा शेअर 24 टक्क्यांनी रिटर्न्स देण्याची शक्यता आहे. 


Zydus Wellness


शेअरखान या कंपनीने  Zydus Wellness या कंपनीत गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. त्यासाठी टार्गेट प्राईज 3000 रुपये प्रति शेअर असे ठेवायला हवे, असं या कंपनीने म्हटलंय. हा शेअर 30 सप्टेंबर 2024 रोजी या शेअरचे मूल्य 2012 रुपये होते. हा शेअर भविष्यात साधारण 50 टक्क्यांनी रिटर्न्स देण्याची शक्यता आहे. 


SBI


शेअरखान या ब्रोकरेज फर्मने SBI या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. त्यासाठी टार्गेट प्राईज 975 रुपये प्रति शेअर ठेवायला हवी, असे शेअरखानने सुचवले आहे. 30 सप्टेंबर 2024 रोजी या शेअरचे मूल्य 788 रुपये होते. सध्याच्या मूल्यानुसार हा स्टॉक भविष्यात 24 टक्क्यांनी रिटर्न्स मिळण्याची शक्यता आहे.


(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)


हेही वाचा :


NTPC, स्विगी ते ह्युंदाई, पुढच्या तीन महिन्यांत तब्बल 60000 कोटींचे आयपीओ, पैसे ठेवा तयार!