Upcoming IPO: या वर्षी अनेक आयपीओंना चांगला प्रतिसाद मिळाला आहे. बहुसंख्या आयपीओंनी आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. बजाज हाऊसिंग फायनान्स (Bajaj Housing Finance) ओला इलेक्ट्रिक (Ola Electric), पु. ना. गाडगीळ यासारख्या आयपीओंनीतर आपल्या गुंतवणूकदारांना छप्परफाड रिटर्न्स दिले आहेत. मात्र तगडे रिटर्न्स देणारे दमदार आयपीओ यायचे बाकी आहेत. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या महिन्यांत अनेक महत्त्वाचे आयपीओ येणार आहेत.
हे आयपीओ साधारण 60 हजार कोटी रुपयांचे असणार आहेत. आगामी महिन्यात येणाऱ्या आयपीओंमध्ये ह्युंदाई मोटर इंडिया (Hyundai Motor India), स्विगी (Swiggy) एनटीपीसी ग्रीन एनर्जी (NTPC Green Energy) आदी तगड्या कंपन्यांचा समावेश आहे.
या दिग्गज कंपन्यांचीही एन्ट्री होण्याची शक्यता
लवकरच स्टॉक मार्केटवर दिग्गज कंपन्या सूचिबद्ध होणार आहेत. त्याआधी या कंपन्या आपले आयपीओ घेऊन येणार आहेत. यामध्ये एफकॉन्स इंफ्रास्ट्रक्चर (Afcons Infrastructure), वारी एनर्जीस (Waaree Energies), निवा बूपा हेल्थ इन्शुरन्स (Niva Bupa Health Insurance), मोबीक्विक (Mobikwik) आणि गरुड कंस्ट्रक्शन (Garuda Construction) आदी दिग्गज कंपन्यांचा समावेश आहे. हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टननुसार डिसेंबर महिन्यापर्यंत वेगवेगळ्या क्षेत्रातील जवळपास 30 आयपीओ गुंतवणुकीसाठी खुले होणार आहेत.
एलआयसीचा रेकॉर्ड मोडण्याची शक्ता
भविष्यात येणाऱ्या आयपीओंपैकी ह्युंदाई मोटर इंडियाचा आयपीओ सर्वांत मोठा असणार आहे. ही कंपनी आयपीओच्या माध्यमातून जवळपास 25 हजार कोटी रुपये उभे करणार आहे. त्यामुळेच हा आयपीओ आतापर्यंतचा देशातील सर्वांत मोठा आयपीओ ठरण्याची शक्यता आहे. याआधी एलआयसी या शासकीय कंपनीने आपला आयपीओ आणला होता. या कंपनीने आयपीओच्या माध्यमातून जवळपास 21 हजार कोटी रुपये उभारले होते. ह्यूंदाईचा हा आयपीओ ऑफर फॉर सेल असणार आहे. दुसरीकडे स्विगीच्या आयपीओकडेही सर्वांचे लक्ष आहे. हा आयपीओ एकूण 10 हजार कोटी रुपयांचा असणार आहे.
एकूण 62 कंपन्यानी जमा केले 64 हजार कोटी रुपये
आगामी काळात एनटीपीसी ग्रीन एनर्जी या कंपनीचाही आयपीओ येणार आहे. ही कंपनी आयपीओच्या मदतीने साधारण 10 हजार कोटी रुपये जमवणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा आयपीओ नोव्हेंबर महिन्यात येणार आहे. शपूरजी पलोनजी ग्रुपचा एफकॉन्स इंफ्रास्ट्रक्चर हा आयपीओ साधारण 7000 कोटी रुपयांचा आहे. तर वारी एनर्जीज हा आयपीओ 3000 कोटी रुपयांचा असेल. निवा भुपा हेल्थ इन्सुरन्स हा आयपीओ 3000 कोटी रुपये तर मोबीक्विक हा आयपीओ 700 कोटी रुपयांचा असेल. या वर्षी आतापर्यंत 62 कंपन्यांनी 64,000 कोटी रुपयांचे आयपीओ आणले आहेत. 2023 या साली एकूण 57 कंपन्यांनी 49,436 कोटी रुपये उभे केले होते. 2025 साली हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
हेही वाचा :
आधारावर खाडखोड, लोकांचे अंगठे घेऊन पैसे लाटले, लाडकी बहीण योजनेत हजारोंची फसवणूक!
अंबानी, अदाणी, टाटांपेक्षा हजार पटीने श्रीमंत, जिच्या पायाशी ऐश्वर्य लोळण घ्यायचं 'ती' महाराणी कोण?