मुंबई : आजपासून ऑक्टोबर महिन्याला सुरुवात झाली आहे. त्यामुळे बँकिंग तसेच इतरही अनेक क्षेत्रातील नियमांत बदल झालेला आहे. दरम्यान, प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला गॅस सिलिंडरचा दरातही बदल होतो. मार्च महिन्यापासून घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात बदल झालेला नाही. मात्र व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. आता व्यावसायिक गॅस सिलिंडरच दार 1900 रुपयांपर्यंत गेला आहे. याआधी ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यातदेखील गॅस सिलिंडरच्या या दरात वाढ झालेली होती. या महिन्यात व्यावसायिक गॅस सिलिंडरमध्ये 94 रुपयांची वाढ झालेली आहे.


घरगुती गॅस सिलिंडरचा दर नेमका काय? 


घरुगुती गॅस सिलिंडरच्या दरात मार्च महिन्यापासून कोणताही बदल झालेला नाही. मिळालेल्या माहितीनुसार राजधानी दिल्लीमध्ये घरगुती गॅस सिलिंडरचा दर 803 रुपये आहे. तर कोलकाता शहरात गॅस सिलिंडरचा दर 829 रुपये आहे. मुंबईत घरगुती गॅस सिलिंडरचा दर 802.50 रुपये आहे. चेन्नईमध्ये घरगुती गॅस सिलिंडरचा दर 818.50 रुपयांवर गेला आहे. मार्च महिन्यात घरगुती गॅस सिलंडरच्या दरात 100 रुपयांनी घट केली होती. तर 30 ऑगस्ट 2023 रोजी सरकारने सांगितल्यानुसार ऑईल कंपन्यांनी घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात 200 रुपयांनी घट झालेली आहे. म्हणजेच आतापर्यंत घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात आतापर्यंत 300 रुपयांची घट करण्यात आलेली आहे.


1900 रुपयांवर पोहोचला व्यवसायिक सिलिंडर


चेन्नईमध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडरचा दर 1900 रुपयांवर पोहोचला आहे. चेन्नई आणि कोलकाता या शहरात व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात ऑक्टोबर महिन्याच्या तुलनेत 48 रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे. चेन्नईमध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडरचा दर 1903 रुपये तर कोलकाता शहरात हाच गॅस सिलिंडर 1850.50 रुपयांवर पोहोचला आहे. दुसरीकडे दिल्ली आणि मुंबईमध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात 48.5 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. या दोन्ही महानगरांत व्यावसायिक गॅस सिलिंडर अनुक्रमे 1740 रुपये आणि 1692.50 रुपये झाली आहे. या चारही महानगरांच्या तुलनेत सर्वांत स्वस्त व्यावसायिक गॅस सिलिंडर मुंबई शहरात मिळतोय.


तीन महिन्यांत गॅस सिलिंडरच्या दरात किती वाढ झाली 


वर उल्लेख केलेल्या देशातील चारही महानगरांत गेल्या तीन महिन्यांपासून व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात सलग वाढ झालेली आहे. या चारही महानगरांत गॅस सिलिंडरच्या दरात सरासरी 94 रुपयांची वाढ झालेली आहे. दिल्लीमध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात सरासरी 94 रुपयांची वाढ झालेली आङे. तर कोलकाता आणि मुंबईमध्ये हीच वाढ 94.5 रुपये झाली आहे. चेन्नईमध्ये गेल्या तीन महिन्यातं व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात 93.5 रुपयांनी वाढ झालेली आहे.


हेही वाचा :


आधारावर खाडखोड, लोकांचे अंगठे घेऊन पैसे लाटले, आता थेट जिल्हाधिकाऱ्यांकडून तपास करण्याचा आदेश!


NTPC, स्विगी ते ह्युंदाई, पुढच्या तीन महिन्यांत तब्बल 60000 कोटींचे आयपीओ, पैसे ठेवा तयार!


अंबानी, अदाणी, टाटांपेक्षा हजार पटीने श्रीमंत, जिच्या पायाशी ऐश्वर्य लोळण घ्यायचं 'ती' महाराणी कोण?