एक्स्प्लोर

रेल्वेनं बाईक घरी पाठवायचीय, किती खर्च येईल? नेमकी काय आहे प्रक्रिया?

तुम्ही तुमची बाईक एका शहरातून दुसऱ्या शहरात कशी न्याल? तर रेल्वेतून (Railway) तुम्ही तुमची बाईक एका शहरातून दुसऱ्या शहरात नेऊ शकता. ही नेमकी काय आहे प्रकिया, जाणून घ्या सविस्तर माहिती.

Indian Railway News : जेव्हा तुम्ही एखादं शहर सोडून दुसऱ्या शहरात जाता, त्यावेळी तुम्हाला तुमच्या सर्व साहित्यासह बाईक (bike) देखील न्यावी लागते. पण जर तुम्ही जाणाऱ्या ठिकाणचे अंतर जर खूप असेल तर बाईकवर जाणं शक्य होत नाही. मग अशावेळेस नेमकं काय कराल? तुम्ही तुमची बाईक एका शहरातून दुसऱ्या शहरात कशी न्याल? तर रेल्वेतून (Railway) तुम्ही तुमची बाईक एका शहरातून दुसऱ्या शहरात नेऊ शकता. ही नेमकी प्रकिया कशी करावी लागेल? याबद्दल सविस्तर माहिती पाहुयात.

तुमच्याकडे 'ही' आवश्यक कागदपत्र हवीत

अनेकांना ट्रेनमध्ये सामान किंवा पार्सल म्हणून त्यांची बाईक कशी नेऊ शकतो याबद्दल माहिती नसते. तुम्हीही तुमची बाईक एका ठिकाणाहून दुसरीकडे नेण्याचा विचार करत असाल तर ती नेऊ शकता. तुम्हाला तुमची बाईक दुसऱ्या ठिकाणी पाठवायची असेल, तर त्यासाठी तुमच्याकडं दुचाकीच्या नोंदणी प्रमाणपत्राच्या छायाप्रतीसह पार्सल कार्यालयात जावं लागेल. बाईक वाहतूक करण्यापूर्वी, तुमच्या वाहनाची सर्व कागदपत्रे तयार करा. यामध्ये दुचाकीशी संबंधित विमा आणि आरसी असणे आवश्यक आहे.

वाहनाच्या किंमतीसह सर्व माहिती द्यावी लागणार 

महच्वाचे म्हणजे बाईकची वाहतूक करताना तिची पेट्रोल टाकी काळजीपूर्वक रिकामी करणं गरजेचं आहे. कार्डबोर्डवर निर्गमन आणि आगमन स्टेशनचे नाव स्पष्टपणे लिहणं गरजेचं आहे. त्यानंतर ते दुचाकीला बांधा. मोटारसायकल पॅक करण्यापूर्वी, त्याचे क्लच आणि ब्रेक सैल करा, जेणेकरून ते सुरक्षित राहतील आणि पॅकिंग करणे देखील सोपे होईल. तुम्हाला पार्सल ऑफिसमध्ये एक फॉर्म दिला जाईल. यामध्ये पार्सल कुठून कुठे जाणार? पोस्टल पत्ता, वाहन कंपनी, नोंदणी क्रमांक, वाहनाचे वजन, वाहनाची किंमत अशी सर्व माहिती भरावी लागणार आहे.

बाईक पॅक करण्याची किंमत किती?

बाईक पॅक करण्याची किंमत सुमारे 300 रुपये असणार आहे. अंतरानुसार ते कमी-अधिक असू शकते. अनेक वेळा ती किंमत 1 हजार रुपयांपर्यंत जाते. पॅक केल्यानंतर तुमची बाईक निघून जाईल. पार्सल फॉर्म भरताना तुम्हाला बाईकचा इंजिन नंबर आणि चेसिस नंबर भरावा लागेल. प्राप्तकर्त्याचे नाव भरणे देखील आवश्यक आहे. ज्यासाठी तुम्हाला पावती दिली जाईल. तुम्ही बाईक घेण्यासाठी जाता तेव्हा त्याची गरज असते. लक्षात ठेवा की तुमच्याकडे पावतीची मूळ प्रत असावी.

महत्वाच्या बातम्या:

रेल्वेच्या 6 मल्टी-ट्रॅकिंग प्रकल्पांना मंजुरी, 12343 कोटी रुपयांचा खर्च होणार; प्रकल्पात 'या' 6 राज्यांचा समावेश

महत्त्वाच्या बातम्या

RBI on UCB : नव्या नागरी सहकारी बँकांना परवाने मिळणार, आरबीआयनं 24 वर्षानंतर धोरण बदललं, पतसंस्थांचं बँकेत रुपांतर होण्यासाठी कोणते निकष?
मोठी बातमी, नव्या नागरी सहकारी बँकांना परवाने मिळणार, आरबीआयनं 24 वर्षानंतर धोरण बदललं
Russia Sanctions 100 Percent Tariff On India: भारतासह 5 देशांवर अमेरिका 100% टॅरिफ लावणार; रशियावर निर्बंध लादणारे विधेयक सिनेटकडून मंजूर
भारतासह 5 देशांवर अमेरिका 100% टॅरिफ लावणार; रशियावर निर्बंध लादणारे विधेयक सिनेटकडून मंजूर
Multibagger Stock : संरक्षण क्षेत्रातील मल्टीबॅगर स्टॉकमध्ये घसरण, कंपनी लाभांश देणार, रेकॉर्ड डेट घोषित
संरक्षण क्षेत्रातील मल्टीबॅगर स्टॉकमध्ये घसरण, कंपनी लाभांश देणार, रेकॉर्ड डेट घोषित
सणासुदीच्या काळात साखरेनं दिला दराचा चटका, महिनाभरातच तब्बल 15 टक्क्यांची वाढ, दर वाढण्याचं नेमकं कारण काय?
सणासुदीच्या काळात साखरेनं दिला दराचा चटका, महिनाभरातच तब्बल 15 टक्क्यांची वाढ, दर वाढण्याचं नेमकं कारण काय?

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
Tukaram Mundhe: हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
Rahul Gandhi Fitness Mantra: राहुल गांधींनी रिलमधून Gen Z ला फिटनेस मंत्रा सांगितला, बाॅलिवूड फिटनेस मॅन ऋतिक रोशनकडून सुद्धा व्हिडिओ लाईक
Video: राहुल गांधींनी रिलमधून Gen Z ला फिटनेस मंत्रा सांगितला, बाॅलिवूड फिटनेस मॅन ऋतिक रोशनकडून सुद्धा व्हिडिओ लाईक
Dhananjay Mahadik: राजकीय हाडवैर बाजूला ठेवत खासदार धनंजय महाडिकांनी घेतली सतेज पाटलांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट
Video: राजकीय हाडवैर बाजूला ठेवत खासदार धनंजय महाडिकांनी घेतली सतेज पाटलांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट
Supriya Sule: काँग्रेसने सुनेत्रा पवारांना गुंगी गुडिया म्हटलं; सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, त्यांनी सांगितलं, पुढे काय केलं
काँग्रेसने सुनेत्रा पवारांना गुंगी गुडिया म्हटलं; सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, त्यांनी सांगितलं, पुढे काय केलं
Uddhav Thackeray: गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनात सुनील तटकरेंचं काम चांगलं; प्रशांत किशोर भेटीनंतर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया
सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनात सुनील तटकरेंचं काम चांगलं; प्रशांत किशोर भेटीनंतर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
Embed widget