एक्स्प्लोर

Warren Buffett : 40000 शेअरधारकांच्या बैठकीत वॉरेन बफेंची अचानक मोठी घोषणा, म्हणाले आता वेळ आलीय....

Warren Buffett : जगभरातील टॉप 10 अब्जाधीशांच्या यादीत पाचव्या स्थानावर असलेल्या वॉरेन बफे यांनी 40 हजार शेअरधारकांच्या वार्षिक बैठकीत मोठी घोषणा केली आहे.

न्यूयॉर्क : जगातील पाचवे श्रीमंत व्यक्त आणि दिग्गज गुंतवणूकदार वॉरेन बफे यांनी सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. वॉरेन बफे यांनी बर्कशायर हॅथवे ब्रेक्झ.एन कंपनीच्या सीईओ पदावरुन पायउतार होण्याची घोषणा केली. वयाच्या 94 व्या वर्षी वॉरेन बफे यांनी कंपनीची जबाबदारी दुसऱ्या व्यक्तीकडे सोपवण्याचा निर्णय घेतला. ते म्हणाले की आता वेळ आलीय की ते या वर्षाच्या अखेरीस या पदावरुन निवृत्त होतील. 

वॉरेन बफे यांनी सीईओ पदावरुन पाय उतार होण्याची घोषणा ओमाहामध्ये बर्कशायरच्या वार्षिक बैठकीत केली. ते म्हणाले की, मला वाटतंय की कंपनीला नवा मुख्य कार्यकारी अधिकारी मिळायला हवा, आता वेळ आलीय की या वर्षाच्या अखेरीस या पदावरुन निवृत्त होईल.म्हणजेच वॉरेन बफे 2025 च्या शेवटी बर्कशायर हॅथवे सोडतील. वॉरेन बफे यांनी अचानक घोषणा करुन 40 हजार शेअरधारकांना आश्चर्याचा धक्का दिला. मात्र, गुंतवणूकदारांनी बफे यांच्या निर्णयाचं उभं राहून टाळ्या वाजवत स्वागत केलं. 

वॉरेन बफे यांनी बर्कशायर हॅथवे  मधून निवृत्ती जाहीर केलेली आहे, त्याचवेळी त्यांनी उत्तराधिकारी कोण असेल याचा सस्पेन्स देखील संपवला आहे. 2025 च्या अखेरीस ग्रेग एबेल यानं जबाबदारी स्वीकारायला हवी, असं ते म्हणाले. ग्रेग एबेल सध्या या कंपनीत उपाध्यक्ष पदावर कार्यरत आहेत. वॉरेन बफेनंतर ते सीईओ होतील.  ग्रेग एबेल यांचं वय 62 वर्ष असून ते 2018 पासून बर्कशायरचे उपाध्यक्ष असून नॉन विमा व्यवसायाचं नेतृत्व करत आहेत. 2021 पासूनच वॉरेन बफे यांनी उत्तराधिकारी म्हणून ग्रेग एबेल यांना नामांकन दिलं होतं. 

बर्कशायर हॅथवेचं बाजारमूल्य 1.16 ट्रिलियन डॉलर आहे. वॉरेन बफे यांनी बर्कशायरमध्ये शेअरधारक राहणार असल्याचं सांगितलं. सर्व निर्णय ग्रेग एबेल घेणार असले तरी त्याला सल्लागार म्हणून काम करणार असल्याच वॉरेन बफेंनी म्हटलं. वॉरेन बफे यांनी त्यांच्याकडे असलेल्या शेअरची विक्री करणार नाही तर ते शेवटी दान करणार असल्याचं सांगितलं. 

वॉरेन बफे यांनी वयाच्या 94 व्या वर्षी निवृत्ती घेणं हे एका युगाचा शेवट मानला जात आहे. त्यांनी जवळपास 60 वर्षाच्या कार्यकाळानंतर निवृत्तीची घोषणा केली. त्यांच्या नेतृ्त्त्वात बर्कशायर हॅथवे एका अयशस्वी कापड कंपनीपासून 1.16 ट्रिलियन डॉलर्सच्या ग्रुपमध्ये बदलली असून त्याचा विस्तार संपूर्ण अमेरिकेत आहे.

दरम्यान, शेअरधारकांच्या बैठकीत वॉरेन बफे यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्यापार विषयक धोरणांवर टीका देखील केली. जागतिक व्यापार सहकार्याच्या महत्त्वावर त्यांनी जोर दिला.

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Gold Silver Rate: सोने-चांदीच्या दरात मोठी वाढ; 24 तासांत सोन्यात 4500, तर चांदीमध्ये 11000 रुपयांची उडी, भाववाढीचं कारणंही समोर
सोने-चांदीच्या दरात मोठी वाढ; 24 तासांत सोन्यात 4500, तर चांदीमध्ये 11000 रुपयांची उडी, भाववाढीचं कारणंही समोर
Sugar Prices News : साखरेच्या दरात गेल्या 24 तासात पुन्हा ऐतिहासिक वाढ; ऐन सणासुदीच्या काळात गोडवा कमी होण्याची शक्यता, आजचे दर किती?
साखरेच्या दरात गेल्या 24 तासात पुन्हा ऐतिहासिक वाढ; ऐन सणासुदीच्या काळात गोडवा कमी होण्याची शक्यता, आजचे दर किती?
ऑटोचालकाच्या घरात सापडले 3 कोटी रुपये, दोन दिवस झाले तरी कोणीच केला नाही दावा, नेमके पैसे कोणाचे?  
ऑटोचालकाच्या घरात सापडले 3 कोटी रुपये, दोन दिवस झाले तरी कोणीच केला नाही दावा, नेमके पैसे कोणाचे?  
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लाचेसाठी पार 'लाज' सोडली! कैद्याकडून 40 हजार घेत महिला पोलिस अधिकाऱ्याचा खाकी वर्दीतच चक्क नग्न काॅल; बेळगावात सेवा बजावलेल्या आणि सध्या बंगळुरात असलेल्या महिला अधिकाऱ्याचा कारनामा
लाचेसाठी पार 'लाज' सोडली! कैद्याकडून 40 हजार घेत महिला पोलिस अधिकाऱ्याचा खाकी वर्दीतच चक्क नग्न काॅल; बेळगावात सेवा बजावलेल्या आणि सध्या बंगळुरात असलेल्या महिला अधिकाऱ्याचा कारनामा
Nashik Crime News: नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
Bus Fire Accident: सकाळी सव्वा दहाची वेळ; गाडीत बिघाड झाल्याचं चालकाच्या लक्षात आलं अन्..., पिंपरी चिंचवडमध्ये स्कुल बस जळून खाक
सकाळी सव्वा दहाची वेळ; गाडीत बिघाड झाल्याचं चालकाच्या लक्षात आलं अन्..., पिंपरी चिंचवडमध्ये स्कुल बस जळून खाक
Pune Crime News: राजगडावरून फिरून आले; मध्यरात्री वेताळ टेकडीवर गेले अन्... अल्पवयीन मित्रांनीच मित्राला हातोडी डोक्यात घालून संपवलं
राजगडावरून फिरून आले; मध्यरात्री वेताळ टेकडीवर गेले अन्... अल्पवयीन मित्रांनीच मित्राला हातोडी डोक्यात घालून संपवलं
लग्नासाठी चढवली होती वर्दी, प्रवासी अन् पोलिसांना धूळ चारली; अखेर रेल्वे स्टेशनवरील तोतया महिला अटकेत
लग्नासाठी चढवली होती वर्दी, प्रवासी अन् पोलिसांना धूळ चारली; अखेर रेल्वे स्टेशनवरील तोतया महिला अटकेत
Sajjan Kumar: काँग्रेस नेते सज्जन कुमार यांचे तिहार तुरुंगात निधन, शीखविरोधी दंगली प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असतानाच अखेरचा श्वास घेतला
काँग्रेस नेते सज्जन कुमार यांचे तिहार तुरुंगात निधन, शीखविरोधी दंगली प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असतानाच अखेरचा श्वास घेतला
Video: धक्कादायक! झेडपी शाळेत चक्क खासगी शाळेतील विद्यार्थी बसवले; अभिजीत दिपकेंसमोरच मुलांची कबुली
Video: धक्कादायक! झेडपी शाळेत चक्क खासगी शाळेतील विद्यार्थी बसवले; अभिजीत दिपकेंसमोरच मुलांची कबुली
दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयाच्या दारात बुलडोझर फिरवला; बॅरिकेड्स आणि कुंपण हटवलं, इस्लामाबादमधील कारवाईनंतर जोरदार प्रत्युत्तर
दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयाच्या दारात बुलडोझर फिरवला; बॅरिकेड्स आणि कुंपण हटवलं, इस्लामाबादमधील कारवाईनंतर जोरदार प्रत्युत्तर
Embed widget