Turmeric Price : हळद उत्पादक शेतकऱ्यांसाठी (Turmeric Farmers) एक आनंदाची बातमी आहे. हळदीच्या दरात (Turmeric Price) वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. सध्या हळदीच्या मागणीत वाढ झाल्यानं किंमतीत सुधारणा झाल्याचं दिसून येत आहे. तामिळनाडूच्या इरोड जिल्ह्यात हळदीचा दर प्रतिक्विंटल 21369 क्विंटलवर पोहोचला आहे. हळदीचा आवक सुरु झाल्यानंतर सुरुवातीला 15000 रुपये क्विंटलच्या आसपास हळदीला दर होता. आता मात्र, त्यामध्ये तेजी दिसून येत आहे. 


हळदीच्या दरात का होतेय वाढ?


हळद उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी आहे. हळदीच्या दरात चांगली वाढ होत आहे. याचा चांगला फायदा शेतकऱ्यांना होतोय. सध्या हळदीला  21369 रुपयांचा प्रतिक्विंटलला दर मिळत आहे. भविष्यात यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केलीय. दरम्यान, सध्या हळदीच्या दरात एवढी वाढ का होतेय? हा सर्वांनाच प्रश्न पडला असेल. तर सध्या हळदीच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. मात्र, मागणी ज्या प्रमाणात होतेय, त्या प्रमाणात हळदीचा पुरवठा होत नाही. त्यामुळं दरात तेजी पाहायला मिळत आहे.   


दरामध्ये झाली 200 टक्क्यांहून अधिक वाढ


दरम्यान, ज्या भागातून दरवर्षी हळीदची हळदीची आवक आहे, त्या भागातून हळदीची आवक देखील कमी राहीली आहे. बदलत्या वातावरणाचा अनेक ठिकाणी पिकावर परिणाम झाल्यानं उत्पादनात देखील काही प्रमाणात घट झालीय. सध्या जागतिक बाजारात देखील हळदीला मोठी मागणी आहे. त्यामुळं दर वाढताना दित आहे. मिळालेल्या माहितीनुसार एप्रिल 2023 मध्ये हळदीचे दर हे प्रतिक्विंटल 6452 एवढ्या निचांकी पातळीवर पोहोचले होते. मात्र, आता यामध्ये 200 टक्क्यांहून अधिक वाढ झाल्याचे दिसून येत आहे. 


उत्पादन कमी मागणी जास्त, लागवडीत 30 टक्क्यांची घट


मिळालेल्या माहितीनुसार यावर्षी हळदीच्या लागवडीत देखील घट झालीय. जवळपास 30 टक्क्यांहून अधिक हळदीच्या लागवडीखालील क्षेत्रात घट झालीय. त्यामुळं प्रति हेक्टर उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळं उत्पादन कमी आणि मागणी जास्त अशी स्थिती निर्माण झाली आहे. याचा परिणाम दरावर होत असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिलीय. 


हळदीचे दर आणखी वाढणार का?


दरम्यान, सध्या अनेक ठिकाणचे शेतकरी हळदीचे पीक काढत आहेत. सध्या जरी हळदीचा दर वाढत असला तरी पुढे काय होणार? असा प्रश्न हळद उत्पादक शेतकऱ्यांच्या मनात येत असेलच. पण पुढच्या काळात म्हणजे एप्रिल ते मे आणि जून महिन्यात हळदीच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तली आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना पुढच्या काळात अधिक मिळण्याचा अंदाज आहे.


महत्वाच्या बातम्या:


Hingoli : मराठवाड्यात हळदीची सुवर्णक्रांती, हिंगोलीतील हळद संशोधन केंद्रामुळे शेतकऱ्यांचे भाग्य बदलणार