Qualcomm : जगातील सर्वात लोकप्रिय चिप उत्पादकांपैकी एक असलेल्या क्वालकॉमने (Qualcomm) गुरुवारी भारतातील चेन्नई येथे नवीन चिप डिझाईन सेंटरचं उद्घाटन केलं. या नवीन चिप डिझाईन सेंटरसाठी एकूण 177.27 कोटी रुपयांची गुंतवणूक (Investment) करण्यात आली आहे. भारतात (India) वायरलेस कनेक्टिव्हिटी वाढवणं आणि नवीन वाय-फाय टेक्नॉलॉजी (Technology) विकसित करणे हे या केंद्राचं काम असणार आहे. 


याशिवाय, चिप निर्माता कंपनी क्वालकॉमने चेन्नईमध्ये सुरुवात झालेल्या या केंद्रामुळे टेक्नॉलॉजीतील तज्ज्ञ लोकांना साधारण 1600 नवीन नोकऱ्या निर्माण होतील. याशिवाय भारत सरकारच्या मेक इन इंडिया व्हिजनद्वारे क्वालकॉमला सेमीकंडक्टर डिझाईनमध्ये मदत मिळेल. याशिवाय, ही कंपनी आणि तिची नवीन केंद्रे मजबूत स्वदेशी डिझाईन इकोसिस्टम वाढविण्यात मदत करतील.


या सर्व गोष्टींव्यतिरिक्त, हे सेंटर सुरु केल्यानंतर, Qualcomm ने भारत सरकारच्या 6G व्हिजन अंतर्गत भारताच्या 6G विद्यापीठ संशोधनाला आपला पाठिंबा जाहीर केला आहे. भारतात सुरु झालेले हे क्वालकॉमचे नवीन केंद्र नेमकं कोणतं काम करणार आहे या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.  


क्वालकॉमचे फायदे


Qualcomm चे चेन्नई केंद्र भारतात वायरलेस कनेक्टिव्हिटी विकसित करण्यासाठी काम करेल.


क्वालकॉम चे चेन्नई केंद्र भारतात चांगले वाय-फाय तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी काम करेल.


Qualcomm चे चेन्नई केंद्र भारताच्या 6G विद्यापीठाच्या संशोधनात मदत करेल.


Qualcomm चे चेन्नई केंद्र भारतातील सुमारे 1600 लोकांना नोकऱ्या देऊ शकते.


केंद्रीय मंत्री काय म्हणाले?


केंद्रीय दळणवळण, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री, अश्विनी वैष्णव यांनी डिजिटली सशक्त भारतासाठी आपले विचार व्यक्त केले. ते म्हणाले, 'भारताची तांत्रिक क्षमता सतत वाढत आहे, ज्यामुळे आपण नाविन्यपूर्णतेच्या बाबतीत जागतिक आघाडीवर आहोत. डिजीटल प्रगती स्वीकारण्यासाठी आपल्या देशाची दृढ वचनबद्धता आहे. डिजीटली सशक्त समाजाच्या दिशेने आमच्या प्रवासाचे प्रतीक आहे." केंद्रीय मंत्री पुढे म्हणाले, "भारताच्या डिजिटल प्रवासाला गती देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या क्वालकॉमला आमचा पाठिंबा देताना आम्हाला आनंद होत आहे आणि लाखो भारतीयांना 5G कनेक्टिव्हिटीद्वारे जोडण्याचे आमचे ध्येय आहे."


महत्त्वाच्या बातम्या : 


भाजीविक्रेत्यापासून ते महागड्या दुकानांत वापरात येणाऱ्या Paytm Soundbox ची किंमत नेमकी किती? आकडा ऐकून तुम्हीही चकित व्हाल