एक्स्प्लोर

सणांचा उत्साह, प्रत्येक सेंकदाला होणार 'चार' लाखांची उलाढाल; 85 दिवसात होणार एवढ्या कोटींचा व्यवसाय

सध्या सणांचा हंगाम सुरु झाला आहे. या सणांच्या काळात प्रत्येक सेकंदाला 'चार' लाखांची उलाढाल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

Festive Season : सध्या सणांचा हंगाम सुरु झाला आहे. यावर्षीचा सणाचा हंगाम रक्षाबंधनाने सुरू झाला आहे. हा सणांचा उत्साह 23 नोव्हेंबर म्हणजे तुळशी विवाह दिवसापर्यंत सुरू राहणार आहे. या काळात नवरात्री, दसरा, दुर्गा पूजा, करवा चौथ, धनत्रयोदशी, दिवाळी, छठपूजा आणि शेवटी तुळशीविवाह असे अनेक महत्त्वाचे सण साजरे केले जाणार आहेत. दरम्यान, या सणांच्या काळात प्रत्येक सेकंदाला 'चार' लाखांची उलाढाल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

या सणासुदीच्या काळात बाजारपेठेत आणि खरेदीदारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. कोरोनाच्या संकटानंतर हे असे वर्ष आहे ज्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या आजाराची भीती नाही. या कारणामुळं चालू सणासुदीच्या 85 दिवसांमध्ये प्रत्येक सेकंदाला 4 लाख रुपयांचा म्हणजेच एकूण 3 लाख कोटी रुपयांचा व्यवसाय केला जाऊ शकतो. गेल्या वर्षी सणासुदीच्या काळात 2.50 लाख कोटी रुपयांचा व्यवसाय झाला होता. कंफेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने याबाबतचा अंदाज वर्तवला आहे. 

सीएआयटीचे राष्ट्रीय अध्यक्ष बीसी भरतिया यांनी सांगितले की, यावर्षी सणांचा हंगाम रक्षाबंधनाने सुरु झाला आहे. हा सणांचा उत्साह 23 नोव्हेंबर म्हणजे तुलसी विवाहाच्या दिवसापर्यंत सुरु राहील. या काळात नवरात्री, दसरा, दुर्गा पूजा, करवा चौथ, धनत्रयोदशी, दिवाळी, भाईदूज, छठपूजा आणि शेवटी तुळशीविवाह असे अनेक महत्त्वाचे सण साजरे केले जातील. भारतीय ग्राहक या सणासुदीच्या हंगामात अंदाजे 3 लाख कोटी रुपये खर्च करण्याची शक्यता कंफेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने वर्तवली आहे. 

दर सेकंदाला चार लाख रुपयांचा व्यवहार 

कॅटचे ​​सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल म्हणाले की, देशात मेनलाइन रिटेल व्यवसायासाठी अंदाजे 60 कोटी ग्राहक आहेत. जर प्रत्येक ग्राहकाने 5000 रुपये खर्च केले तर व्यवसाय आपोआप 3 लाख कोटी रुपयांचा होईल. हा व्यवसाय दर तासाला 147 कोटी रुपयांहून अधिक असल्याचा अंदाज आहे. दर मिनिटाला 2.45 कोटी रुपयांहून अधिक आणि प्रत्येक सेकंदाला 4 लाख रुपयांहून अधिक उलाढाल होईल, असा अंदाज आहे.

हे सर्व खरेदी केले जाईल

CAT च्या अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार आता कोरोनाचे संकट पूर्णपणे गेलं आहे. त्यामुळं लोक यावर्षी सण-उत्सव आनंदाने आणि समृद्धीने साजरा करतील. या सणांच्या काळात लोक घरगुती वस्तू, उपकरणे, भेटवस्तू, कपडे, दागिने, नकली दागिने, भांडी, सजावटीच्या वस्तू, फर्निचर आणि फिक्स्चर, किचनवेअर, कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोबाईल्स, मोबाईल, लॅपटॉप, कॉम्प्युटर, इलेक्ट्रिकल वस्तू, मिठाई मोठ्या प्रमाणात खरेदी करतील. या खर्च वस्तूंवर लोक मोठा खर्च करण्याची शक्यता आहे. 

महत्त्वाच्या बातम्या:

भारत-पाकिस्तानचा व्यापार किती? प्रत्येक भारतीयांच्या घरात 'या' आहेत पाकिस्तानी वस्तू

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Gold Silver Price Today: आज सोने-चांदी स्वस्त की महाग? खरेदीसाठी किती पैसे मोजावे लागणार? जाणून घ्या दर
आज सोने-चांदी स्वस्त की महाग? खरेदीसाठी किती पैसे मोजावे लागणार? जाणून घ्या दर
Mhada : मुंबईच्या नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर बीडीडी संकुलातील 864 सदनिकांचं वितरण 16 मार्चला, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सोहळा
मुंबईच्या नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील 864 सदनिकांचं वितरण 16 मार्चला, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सोहळा
Gratuity Rules :  'या' चुकीमुळे कंपनी रोखू शकते ग्रॅच्युइटीचे पैसे
Gratuity Rules :  'या' चुकीमुळे कंपनी रोखू शकते ग्रॅच्युइटीचे पैसे
Gold Price: इराण-इस्रायल युद्ध सुरू असताना सोन्याच्या किमतीत घसरण का? आता दर वाढणार की कमी होणार? जाणून घ्या सविस्तर
इराण-इस्रायल युद्ध सुरू असताना सोन्याच्या किमतीत घसरण का? आता दर वाढणार की कमी होणार? जाणून घ्या सविस्तर

व्हिडीओ

Baramati Rahuri Election : बारामती, राहुरीची पोटनिवडणूक 23 एप्रिलला, निवडणूक आयोगाची माहिती
North Korea Ballistic missile: एकीकडे इराण Vs अमेरिका युद्ध शिगेला, दुसरीकडे किम जोंग उन मैदानात, उत्तर कोरियाने 10 बॅलेस्टिक मिसाईल सोडल्या
Kishori Pednekar on Ritu Tawde : मुंबईच्या महापौर पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठ्या झाल्या का? पेडणेकर आक्रमक
kharg Island Special Report : इराणच्या मुकूटमणीवर अमेरिकेचा शक्तिशाली बॉम्बहल्ला
Election Comission PC : 5 राज्यांच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार? निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
West Bengal: निवडणूक जाहीर होताच पहिला ओपिनियन पोल आला; पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता? भाजप-तृणमूलमध्येच जोरदार टक्कर
पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता? तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार लढत, पहिला ओपिनियन पोल समोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 मार्च 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 मार्च 2026 | रविवार
SA vs NZ :  दक्षिण आफ्रिकेनं टी 20 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीतील पराभवाचा वचपा काढला, न्यूझीलंडवर 7 विकेटनं दणदणीत विजय
दक्षिण आफ्रिकेनं टी 20 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीतील पराभवाचा वचपा काढला, न्यूझीलंडवर 7 विकेटनं दणदणीत विजय
बीड महिला अत्याचारप्रकरणाची मुंबईतून दखल; पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावरही गुन्हा दाखल करण्याचे निर्देश
बीड महिला अत्याचारप्रकरणाची मुंबईतून दखल; पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावरही गुन्हा दाखल करण्याचे निर्देश
West Bengal Election in 2 phases: केरळ, तमिळनाडू एकाच टप्प्यात अन् पश्चिम बंगालमध्ये दोन टप्प्यात मतदान; सीएम ममता अन् केरळात डाव्यांसमोर गड राखण्याचे आव्हान
केरळ, तमिळनाडू एकाच टप्प्यात अन् पश्चिम बंगालमध्ये दोन टप्प्यात मतदान; सीएम ममता अन् केरळात डाव्यांसमोर गड राखण्याचे आव्हान
Baramati and Rahuri By Election : बारामती आणि राहुरीची पोटनिवडणूक जाहीर, 23 एप्रिलला मतदान, मतमोजणी 'या' दिवशी, निवडणुकीचं संपूर्ण वेळापत्रक, जाणून घ्या
बारामती आणि राहुरीची पोटनिवडणूक जाहीर, 23 एप्रिलला मतदान, मतमोजणी 'या' दिवशी, निवडणुकीचं संपूर्ण वेळापत्रक
West Bengal Election: निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेतील अवघा दीड बाकी असतानाच सीएम ममता बॅनर्जींचा मास्टरस्ट्रोक!
निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेतील अवघा दीड बाकी असतानाच सीएम ममता बॅनर्जींचा मास्टरस्ट्रोक!
मोठी बातमी! प.बंगालसह 5 राज्यातील विधानसभा निवडणुकांची तारीख जाहीर; दोन टप्प्यात मतदान, 4 मे रोजी निकाल
मोठी बातमी! प.बंगालसह 5 राज्यातील विधानसभा निवडणुकांची तारीख जाहीर; दोन टप्प्यात मतदान, 4 मे रोजी निकाल
Embed widget