Recession News : पुढील वर्षाच्या मध्यापर्यंत अमेरिका आणि जागतिक अर्थव्यवस्था मंदीच्या (Recession) दिशेने जाऊ शकते, असं भाकित जेपी मॉर्गन चेस अॅण्ड कंपनीचे (JPMorgan Chase & Co) मुख्य कार्यकारी जेमी डिमन (Jamie Dimon) यांनी वर्तवलं आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. चलनवाढ, व्याजदरातील वाढ, रशियाचा युक्रेनवरील हल्ला आणि फेडरल रिझर्व्हच्या परिमाणात्मक कठोर धोरणाचे परिणाम हे संभाव्य मंदीचे संकेत असल्याचं ते म्हणाले.


"या अतिशय गंभीर गोष्टी आहेत ज्यामुळे अमेरिका आणि जगाला धक्का बसण्याची शक्यता आहे, असं मला वाटतं. युरोप आधीच मंदीच्या गर्तेत आहे आणि ते आतापासून सहा ते नऊ महिन्यांत अमेरिकेला मंदीच्या टप्प्यात जाण्याची शक्यता आहे, असं डिमन म्हणाले.


अमेरितील मोठ्या बँका शुक्रवारपासून त्यांच्या तिसऱ्या तिमाही कमाईचा अहवाल देणार आहेत, त्याच्या पार्श्वभूमीवर डिमन यांचं भाकित अतिशय महत्त्वाचं आहे. या वर्षी आतापर्यंत, बेंचमार्क S&P 500 निर्देशांक (.SPX) सुमारे 24 टक्क्यांनी घसरला आहे. अमेरिकेतील तिन्ही प्रमुख निर्देशांक बेअर मार्केट क्षेत्रामध्ये व्यापार करत आहेत.


यंदाच्या वर्षाच्या सुरुवातीला जेमी डिमन यांनी गुंतवणूकदारांना आर्थिक चक्रीवादळासाठी सज्ज राहण्याचा सल्ला जेमी डिमन यांनी दिला होता.


जूनमध्ये, गोल्डमन सॅक्सने पुढील वर्षभरात अमेरिकेची अर्थव्यवस्था मंदीत येण्याची शक्यता 30 टक्के वर्तवली होती, तर मॉर्गन स्टॅन्ले इथल्या अर्थशास्त्रज्ञांनी पुढील 12 महिन्यांसाठी मंदीची शक्यता सुमारे 35 टक्के व्यक्त केली होती.


जागतिक बँकेचे अध्यक्ष डेव्हिड मालपास आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या व्यवस्थापकीय संचालक क्रिस्टालिना जॉर्जिव्हा यांनीही जागतिक मंदीच्या वाढत्या धोक्याचा इशारा दिला होता. 2023 मध्ये जगातील अनेक देशांना आर्थिक मंदीचा सामना करावा लागू शकतो, असं त्या म्हणाल्या होता. तर रशियाच्या युक्रेनवरील हल्ल्यानंतर महागाईची समस्या कायम असल्याचं सांगितलं होतं.


इतर संबंधित बातम्या


चिंताजनक!  पुढील वर्षी अनेक देशांवर मंदीचं संकट, आयएमएफचा इशारा


Bank Of England Recession : मंदीचे सावट आणखी गडद; ब्रिटनमध्ये मंदी येणार असल्याचा BOE चा इशारा