एक्स्प्लोर

Tata I Phone : 'टाटा' तयार करणार 'मेड इन इंडिया' आयफोन; 1000 कोटींमध्ये झाली डील

Tata I phone : टाटा समूह आता आयफोन तयार करणार आहे. त्यामुळे आता आगामी काळात मेड इन इंडिया आयफोन जागतिक बाजारात दिसून येणार आहे.

नवी दिल्ली : तंत्रज्ञान आणि मोबाईल फोन उत्पादनाची मोठं हब असलेल्या चीनला मोठा झटका बसला आहे. कोरोना आणि लॉकडाऊननंतर चीनची अर्थव्यवस्था वाईट अवस्थेत आहे. भारत आणि चीनमधील तणाव (India China Tension) आणि तेढ कोणापासून लपून राहिलेली नाही. अशा परिस्थितीत जागतिक स्तरावर भारताने उत्पादक बाजारपेठ  म्हणून उदयास येत आहे. आता, त्यादृष्टीने भारताला आणखी एक मोठे यश मिळाले आहे. आता आयफोनची (I-phone) निर्मिती भारतात होणार आहे. 'मेड इन इंडिया' आयफोन (Made In India I-phone) भारतात बनणार आहे. देशातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक असलेल्या टाटा समूहाकडून (Tata Group) हे काम पूर्ण केले जाणार आहे.

टाटा तयार करणार आयफोन

टाटाने अॅपलचा पुरवठादार विस्ट्रॉनचा कारखाना विकत घेतला आहे. ही तैवानची कंपनी खरेदी करून टाटा येत्या अडीच वर्षांत आयफोनचे उत्पादन सुरू करणार आहे. टाटा समूहाची कंपनी टाटा इलेक्ट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमिटेड (TEPL) ने विस्ट्रॉन इन्फोकॉम मॅन्युफॅक्चरिंग (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड $ 125 दशलक्ष म्हणजे सुमारे 1000 कोटी रुपयांना विकत घेतली आहे. गेल्या वर्षभरापासून दोघांमध्ये चर्चा सुरू होती. टाटा समूहासोबत विस्ट्रॉन कारखाना घेण्याच्या कराराला मान्यता देण्यात आली आहे. ही माहिती देताना इलेक्ट्रॉनिक्स आणि तंत्रज्ञान मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी टाटा समूहाचे अभिनंदन केले. या करारानंतर टाटा समूह अडीच वर्षांत देशांतर्गत आणि जागतिक बाजारपेठेसाठी अॅपल आयफोन भारतात तयार करेल. 

टाटाचा आयफोन अडीच वर्षांत बाजारात दाखल होणार

विस्ट्रॉनने 2008 मध्ये भारतात प्रवेश केला. 2017 मध्ये कंपनीने Apple साठी iPhone चे उत्पादन सुरू केले. या प्लांटमध्ये आयफोन-14 मॉडेलची निर्मिती करण्यात आली आहे. 10,000 हून अधिक कामगारांसह हा प्लांट ताब्यात घेऊन टाटांनी मोठे यश मिळवले आहे. टाटाच्या अधिग्रहणानंतर विस्ट्रॉन पूर्णपणे भारतीय बाजारपेठेतून बाहेर पडेल. आम्ही तुम्हाला सांगतो की विस्ट्रॉन व्यतिरिक्त फॉक्सकॉन आणि पेगाट्रॉन देखील भारतात आयफोन उत्पादनात व्यस्त आहेत. आता भारतातील स्वदेशी कंपनी टाटानेही यात उडी घेतली आहे.


Tata Group iphone : टाटा समूह भारतात बनवणार आयफोन, विस्ट्रॉन कंपनी टाटांनी घेतली विकत

इतर महत्त्वाच्या बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe: ॲनालॉग पनीर काय आहे, 1 वर्षांनंतरही बंदी वाढवणार का? तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, म्हणाले, आरोग्याशी तडजोड नाही
ॲनालॉग पनीर काय आहे, 1 वर्षांनंतरही बंदी वाढवणार का? तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, म्हणाले, आरोग्याशी तडजोड नाही
कर्जदारांना दिलासा... महागाईचा दबाव कायम, तरी रेपो दर जैसे थे; आरबीआयची 'वेट अँड वॉच' भूमिका कायम
कर्जदारांना दिलासा... महागाईचा दबाव कायम, तरी रेपो दर जैसे थे; आरबीआयची 'वेट अँड वॉच' भूमिका कायम
Mhada house Lottery Mumbai: मोठी बातमी: म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांची लॉटरी जाहीर होण्याची तारीख अखेर ठरली, ऑनलाईन सोडत कधी आणि कुठे पाहता येणार?
मोठी बातमी: म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांची लॉटरी जाहीर होण्याची तारीख अखेर ठरली, ऑनलाईन सोडत कधी आणि कुठे पाहता येणार?
Dabur Products Ban : 'डाबर'च्या अनेक उत्पादनांवर FSSAI च्या कारवाईची टाच, 100 टक्के शुद्धतेच्या दाव्यावर आक्षेप; थेट विक्रीवर घातली बंदी, नेमकं कारण काय?
'डाबर'च्या अनेक उत्पादनांवर FSSAI च्या कारवाईची टाच, 100 टक्के शुद्धतेच्या दाव्यावर आक्षेप; थेट विक्रीवर घातली बंदी, नेमकं कारण काय?

व्हिडीओ

Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FSSAI Action : Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Sunetra Pawar : म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
Congress News : काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
BMM 2026 : सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
Embed widget