एक्स्प्लोर

Tata Steel : टाटा स्टीलचे शेअर्स 1:10 च्या प्रमाणात विभागले जाणार; स्टॉक होल्ड कराल की सेल?

Tata Steel : टाटा स्टीलने यापूर्वी प्रति शेअर 51 रुपये अंतिम लाभांश दिला आहे. अंतिम लाभांशाची एक्स-डेट १५ जून २०२२ होती. भांडवली बाजारात तरलता वाढवण्यासाठी शेअर विभाजित करण्याचा टाटा स्टीलने हा निर्णय घेतला आहे. 

Tata Steel stock will split record : टाटा समूहाची कंपनी टाटा स्टील आपले शेअर्स विभाजित करणार आहे. टाटा स्टीलच्या (Tata Steel) स्टॉक स्प्लिटची एक्स-डेट 28 जुलै 2022 आहे. त्याच वेळी, कंपनीच्या शेअर्सच्या विभाजनाची रेकॉर्ड तारीख 29 जुलै आहे. टाटा स्टीलचे (Tata Steel) शेअर्स 1:10 च्या प्रमाणात विभाजित होणार आहेत. स्टॉक स्प्लिट (Stock Split) झाल्यानंतर टाटा स्टीलच्या शेअर्सचे दर्शनी मूल्य 10 ते 1 रुपये होईल. या वर्षी मे मध्ये चौथ्या तिमाहीचे FY22 निकाल जाहीर करताना टाटा स्टीलच्या बोर्डाने स्टॉक स्प्लिटला मान्यता दिली होती.

प्रत्येक शेअरवर रु.51 चा अंतिम लाभांश 
टाटा स्टीलने यापूर्वी प्रति शेअर 51 रुपये अंतिम लाभांश दिला आहे. अंतिम लाभांशाची एक्स-डेट १५ जून २०२२ होती. भांडवली बाजारात तरलता वाढवण्यासाठी शेअर विभाजित करण्याचा टाटा स्टीलने हा निर्णय घेतला आहे. 

कंपनीच्या म्हणण्यानुसार, यामुळे शेअरहोल्डर बेस वाढेल आणि लहान गुंतवणूकदारांना शेअर्स अधिक परवडणारे बनतील. स्टॉक स्प्लिटमुळे (Tata Steel) शेअरची बाजारातील किंमत कमी होते. परंतू यामुळे कंपनीचे बाजार भांडवल बदलत नाही.

एका वर्षात कंपनीच्या शेअर्समध्ये 27% घसरण 
गेल्या एका वर्षात टाटा स्टीलचे शेअर्स जवळपास 27% घसरले आहेत. 26 जुलै 2021 रोजी टाटा स्टीलचे (Tata Steel)  शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये 1298.10 रुपयांच्या पातळीवर होते. सध्या, 25 जुलै 2022 रोजी, कंपनीचे शेअर्स BSE वर 957.35 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत आहेत. यावर्षी आतापर्यंत टाटा स्टीलचे शेअर्स जवळपास 16% घसरले आहेत. गेल्या एका महिन्यात कंपनीचे शेअर्स जवळपास 11 टक्क्यांनी वाढले आहेत. टाटा स्टील ही 34 दशलक्ष टन वार्षिक उत्पादन क्षमता असलेल्या जागतिक स्टील कंपन्यांपैकी एक आहे. टाटा स्टीलचे जगातील अनेक देशांमध्ये अस्तित्व आहे.

आणखी वाचा :
Bloomberg Survey : अमेरिका, चीनसह आशिया युरोपमध्ये मंदीचं सावट, भारतासाठी मात्र दिलासा 

दीपक पळसुले हे मागील 12 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. वृत्तनिवेदक म्हणून दशकभरापासून एबीपी माझामध्ये सक्रीय आहेत.  अर्थ, राजकारण, समाजकारण, शेती,सांस्कृतिक, टेक-ऑटो  अशा विविध विषयांमध्ये त्यांचा व्यासंग आहे.   
Read More

महत्त्वाच्या बातम्या

RBI on UCB : नव्या नागरी सहकारी बँकांना परवाने मिळणार, आरबीआयनं 24 वर्षानंतर धोरण बदललं, पतसंस्थांचं बँकेत रुपांतर होण्यासाठी कोणते निकष?
मोठी बातमी, नव्या नागरी सहकारी बँकांना परवाने मिळणार, आरबीआयनं 24 वर्षानंतर धोरण बदललं
Russia Sanctions 100 Percent Tariff On India: भारतासह 5 देशांवर अमेरिका 100% टॅरिफ लावणार; रशियावर निर्बंध लादणारे विधेयक सिनेटकडून मंजूर
भारतासह 5 देशांवर अमेरिका 100% टॅरिफ लावणार; रशियावर निर्बंध लादणारे विधेयक सिनेटकडून मंजूर
Multibagger Stock : संरक्षण क्षेत्रातील मल्टीबॅगर स्टॉकमध्ये घसरण, कंपनी लाभांश देणार, रेकॉर्ड डेट घोषित
संरक्षण क्षेत्रातील मल्टीबॅगर स्टॉकमध्ये घसरण, कंपनी लाभांश देणार, रेकॉर्ड डेट घोषित
सणासुदीच्या काळात साखरेनं दिला दराचा चटका, महिनाभरातच तब्बल 15 टक्क्यांची वाढ, दर वाढण्याचं नेमकं कारण काय?
सणासुदीच्या काळात साखरेनं दिला दराचा चटका, महिनाभरातच तब्बल 15 टक्क्यांची वाढ, दर वाढण्याचं नेमकं कारण काय?

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
Tukaram Mundhe: हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
Rahul Gandhi Fitness Mantra: राहुल गांधींनी रिलमधून Gen Z ला फिटनेस मंत्रा सांगितला, बाॅलिवूड फिटनेस मॅन ऋतिक रोशनकडून सुद्धा व्हिडिओ लाईक
Video: राहुल गांधींनी रिलमधून Gen Z ला फिटनेस मंत्रा सांगितला, बाॅलिवूड फिटनेस मॅन ऋतिक रोशनकडून सुद्धा व्हिडिओ लाईक
Dhananjay Mahadik: राजकीय हाडवैर बाजूला ठेवत खासदार धनंजय महाडिकांनी घेतली सतेज पाटलांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट
Video: राजकीय हाडवैर बाजूला ठेवत खासदार धनंजय महाडिकांनी घेतली सतेज पाटलांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट
Supriya Sule: काँग्रेसने सुनेत्रा पवारांना गुंगी गुडिया म्हटलं; सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, त्यांनी सांगितलं, पुढे काय केलं
काँग्रेसने सुनेत्रा पवारांना गुंगी गुडिया म्हटलं; सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, त्यांनी सांगितलं, पुढे काय केलं
Uddhav Thackeray: गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनात सुनील तटकरेंचं काम चांगलं; प्रशांत किशोर भेटीनंतर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया
सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनात सुनील तटकरेंचं काम चांगलं; प्रशांत किशोर भेटीनंतर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
Embed widget