मुंबई : जग्वार लँण्ड रोव्हरच्या (Jaguar Land Rover) गाड्या या नेहमीच चर्चेच्या विषय ठरतात. या कंपनीकडून तयार केल्या जाणाऱ्या या गाड्या आलिशान असतात. याच कारणामुळे लोक या कंपनीच्या गाड्या घेणं पसंद करतात. या गाड्यांची निर्मिती भारतात होत नसल्यामुळे त्या चांगल्याच महाग असतात. मात्र सध्या या गाड्यांची भारतातील किंमत कमी होण्याची शक्यता आहे. टाटा मोर्टसच्या (Tata Motors) एका निर्णयामुळे जाग्वारच्या गाड्या स्वस्त होण्याची शक्यता आहे.
जग्वार मूळची ब्रिटिश कंपनी
रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार देशातील दिग्गज ऑटो मॅन्यूफॅक्चरिंग कंपनी टाटा मोटर्स (Tata Motors) लवकरच मोठी घोषणा करू शकते. ही कंपनी तमिळनाडूच्या आपल्या नव्या प्लॅन्टमध्ये जग्वार लँण्ड रोव्हर (Jaguar Land Rover) कंपनीच्या इलेक्ट्रिक कार तयार करू शकते. तशी योजना टाटा मोटर्सकडून आखली जात आहे. सध्यातरी या कंपनीने तयार केलेल्या कार भारतात आयात केल्या जातात. ही मूळची ब्रिटिश कंपनी आहे. मात्र टाटा कंपनीने ही कंपनी 2008 साली अधिगृहित केलेली आहे. टाटा मोटर्सकडून तमिळनाडूत जग्वार कारची निर्मिती करण्यात आली, तर भविष्यात या कंपनीच्या कार स्वस्त होण्याची शक्यता आहे.
तमिळनाडूत तयार होणार जाग्वारच्या लँण्ड रोव्हर
टाटा मोटर्सकडून तमिळनाडूमध्ये एक मोठा प्लॅन्ट उभारण्यात येत आहे. या प्लॅन्टमध्ये नेमकं कशाची निर्मिती केली जाणार, हे अद्याप कंपनीने स्पष्ट केलेले नाही. मात्र येथे जग्वार लँण्ड रोव्हर कंपनीच्या कारची निर्मिती केली जाऊ शकते. टाटा मोटर्सकडून हा प्लॅन्ट उभारण्यासाठी तब्बल 1 अब्ज डॉलर्स रुपये खर्च केले जात आहेत.
2008 साली जेएलआर कंपनीचे अधिग्रहण
टाटा मोटर्सने 2008 साली जग्वार लँण्ड रोव्हर ही कंपनी तब्यात घेतली होती. जग्वार कंपनीचे सुटे भाग भारतात आयात केले जातात. त्यानंतर पुण्यातील एका प्लॅन्टमध्ये या कारचे सुटे भाग एकत्र केले जातात आणि कारची निर्मिती केली जाते. दरम्यान, टाटा मोटर्सने तमिळनाडूत या कारची निर्मिती केल्यास रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील. तसेच येथे जग्वार लँण्ड रोव्हरच्या कारची किंमत कमी होईल.
हेही वाचा :
दुबई, लंडनमध्ये आलिशान घर, तब्बल 1400 कोटींची संपत्ती, भाजपच्या महिला उमेदवाराची देशभरात चर्चा!
लग्न, कर्जफेड ते वैद्यकीय उपचार, PF खात्यातील पैसे नेमके कधी काढता येतात? जाणून घ्या नियम आणि अटी!