मुंबई : जगप्रसिद्ध उद्योजक रतन टाटा (Ratan Tata) यांना कोण ओळखत नाही. त्यांनी आपल्या कौशल्याच्या जोरावर टाटा सन्सच्या (Tata Sons) उद्योगांना वाढवलं. या उद्योग समूहाला सन्मा मिळवून दिला. जेवणातल्या मिठापासून ते फॅशन, वाहननिर्मिती अशा सर्वच क्षेत्रात टाटांचा दरारा आहे. रतन टाटा यांनी हे साम्राज्य न थकता कित्येक दशकं सांभाळलं. आलेल्या आव्हानांना लिलया पेललं. आता मात्र ते निवृत्त झाले आहेत. त्यांनी आपल्या आयुष्यात कधी लग्न केलं नाही. त्यामुळे त्यांना मुलं नाहीत. याच कारणामुळे रतन टाटा यांनी उभं केलेलं साम्राज्य कोण सांभाळणार? असं विचारलं जातं. पण रतन टाटा यांना मुलं नसली तरी त्यांचा (Ratan Tata Family Information) परिवार चांगलाच मोठा आहे.


रतन टाटा यांना दोन भाऊ 


रतन टाटा यांनी आयुष्यात लग्न केलं नाही. त्यांच्या मनात अनेकदा लग्नाचा विचार आला होता. पण काही कारणांस्तव ते लग्न करू शकले नाही. दरम्यान, त्यांना मुलं नसली तरी टाटा कुटुंबातीलच अनेक तरुण चेहरे टाटा सन्सचे उद्योग सांभाळत आहेत. टाटा कुटुंबात रतन टाटा यांच्यानंतर नाव येतं ते जिमी टाटा यांचं. जिमी टाटा हे रतन टाटा यांचे छोटे बंधू आहेत. त्यांतर नोएल टाटा हे रतन टाटा यांचे सावत्र भाऊ आहेत. जिमी टाटा (Jimmy Tata) हे रतन टाटा  यांच्यापेक्षा दोन वर्षांनी लहान आहेत. ते 90 च्या दशकात सेवानिवृत्त झाले. त्याआधी त्यांनी टाटा सन्सच्या वेगवेगळ्या कंपन्यांची जबाबदारी सांभाळलेली आहे. जिमी टाटा यांचे टाटा सन्सच्या अनेक कंपन्यांत हिस्सेदारी (शेअर्स) आहेत. जिमी टाटा सर रतन टाटा ट्रस्टचे ट्रस्टी आहेत. त्यांनीदेखील रतन टाटा यांच्याप्रमाणेच लग्न केलं नाही. ते मुंबईत कुलाब्यात एका डबल बेडरुम असलेल्या घरात राहतात. 


सावत्र आई सिमोन नवल टाटा


रतन टाटा यांचे वडील नवल टाटा (Navan Tata) यांनी दोन लग्न केली. त्यांच्या दुसऱ्या आईचे नाव सिमोन नवल टाटा (Simone Tata) असे आहे. सिमोन या 1961 साली टाटाच्या लॅक्मे लिमिटेड या कंपनीच्या संचालक मंडळात होत्या. 2006 सालापर्यंत गैर कार्यकारी अध्यक्ष म्हणून लॅक्मे लिमिटेडचा कारभार सांभाळत होत्या.   


टाटा कुटुंबातील नव्या दमाची नवी पिढी


रतन टाटा आणि जिमी टाटा यांचे सावत्र भाऊ नोएल टाटा (Noel Tata) हेदेखील टाटा समुहाचे अनेक उद्योग सांभाळतात. ते नवल आणि समोन टाटा यांचे पुत्र आहेत. त्यांनी आलू मिस्त्री यांच्याशी लग्न केलेलं आहे. नोएल टाटा आणि आलू मिस्त्री यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे. त्यांची नावे लिआ, माया आणि नेविल अशी आहेत. रतन टाटा यांनी कधीही लग्न केलं नाही. पण टाटा कुटुंब मोठं आहे. आज लिया, माया, नेविल (Leah Maya and Neville Tata) हे टाटा सन्सच्या वेगवेगळ्या कंपन्या सांभाळत आहेत. त्यांच्यावर या कंपन्यांत वेगवेगळी जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. 


हेही वाचा :


चार वर्षांत एका लाखाचे झालेत तब्बल 45 लाख, छप्परतोड रिटर्न्स देणाऱ्या 'या' कंपनीविषयी माहिती आहे का?


'या' कंपनीचं एक पाऊल पुढे! लवकरच येणार 10 हजार कोटींचा IPO, खोऱ्याने पैसे ओढण्याची संधी!


टाटा घराण्यातील 'ही' तीन नावे माहीत आहेत का? लाईमलाईटपासून दूर, पण सांभाळतायत कोट्यवधींचे उद्योग!