मुंबई : सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election) धूम आहे. वेगवेगळ्या राज्यांत उमेदवार जोमात प्रचार करत आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करताना हेच उमेदवार जोरदार शक्तिप्रदर्शन करत आहेत. या निवडणुकीच्या माध्यमातून देशभरातील वेगवेगळ्या नेत्यांची संपत्ती समोर येत आहे. दरम्यान, भाजपच्या (BJP) अशाच एका गोव्यातील महिला उमेदवराची संपत्ती चर्चेचा विषय़ ठरली आहे. या महिलेच्या कुटुंबाची लंडन, दुबईत आलिशान घरं आहेत, ही महिला उमेदवार कोट्यवधींची मालकीण आहे.
पल्लवी डेम्पो 1400 कोटींच्या मालकीण
सध्या चर्चेत असलेल्या महिलेचे नाव पल्लवी डेम्पो (Pallavi Dempo) असे आहे. त्या दक्षिण गोव्यातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. त्यांनी नुकतेच आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या अर्जाच्या माध्यमातूनत त्यांच्याकडे असलेल्या संपत्तीची सध्या सगळीकडे चर्चा होत आहे. त्यांनी दाखल केलेल्या 119 पानांच्या शपथपत्रानुसार पल्लवी डेम्पो आणि त्यांचे पती श्रीनिवास डेम्पो यांची एकूण संपत्ती ही 1,400 कोटी रुपये आहे. या डेम्पो दाम्पत्याचा डेम्पो उद्योग समूह आहे. हा उद्योगसमूह फुटबॉल, रियल इस्टेट, जहाज बांधणी, शिक्षण, खाणकाम अशा वेगवेगळ्या क्षेत्रात विस्तारलेला आहे.
पल्लवी यांच्याकडे 255.4 कोटी रुपयांची जंगम मालमत्ता
पल्लवी डेम्पो यांच्या शपथपत्रानुसार त्यांच्याकडे 255.4 कोटी रुपयांची जंगम मालमत्ता आहे. तर श्रीनिवास यांच्या स्थावर संपत्तीचे मूल्य हे 994.8 कोटी रुपये आहे. पल्लवी यांच्या स्थावर मालमत्तेचे मूल्य हे 28.2 कोटी रुपये आहे. श्रीनिवास यांच्या स्थावर संपत्तीचे मूल्य हे 83.2 कोटी रुपये आहे.
लंडन, दुबाई येथे अपार्टमेंट
पल्लवी डेम्मे यांची गोवा तसेच देशाच्या अन्य भागातही संपत्ती आहे. पल्लवी डेम्पो आणि श्रीनिवास डेम्पो या दाम्पत्याचे दुबईत एक अपार्टमेंट आहे. या घराची किंमत ही 2.5 कोटी रुपये आहे. त्यांचे लंडनमध्येही एक घर असून त्याचे मूल्य हे 10 कोटी रुपये आहे.
पल्लवी यांच्याकडे कोट्यवधीचं सोनं
पल्लवी यांच्याकडे 5.7 कोट्यवधी रुपयांचं सोनं आहे. पल्लवी यांन 2022-23 या आर्थिक वर्षात तब्बल 10 रुपयांचा कर भरला होता. तर पल्लवी यांचे पती श्रीनिवास यांनी 11 कोटी रुपयांचा आयकर भरला होता. पल्लीवी यांचे वय 49 वर्षे आहे. त्यांनी पुण्यातील एमआयटीमधून शिक्षण घेतलेलं आहे.
हेही वाचा :
करोडो रुपयांचं 400 किलो सोनं क्षणात लंपास, जगाला हादरवून सोडणाऱ्या दरोड्यात दोन भारतीय वंशाचे चोर!
EVM मशीन तयार करणाऱ्या कंपनीचा नाद खुळा, पाच वर्षांपूर्वी पैसे गुंतवणारे आज झाले मालामाल!
तुम्ही गुंतवलेल्या पैशांचं LIC नेमकं करते तरी काय? उत्तर वाचून विश्वास बसणार नाही!