मुंबई : सध्या जागतिक पातळीवर घडत असलेल्या घडामोडींमुळे भांडवली बाजारात तणाव आहे. गेल्या काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजार आणि मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात घसरण झाल्याचे पाहायला मिळतेय. या काळात गुंतवणूकदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र सध्या ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओस्वालने टाटा उद्योग समूहाच्या एका उद्योगात पैसे गुंतवण्याचा सल्ला दिला आहे. या उद्योगात शॉर्ट टर्मसाठी पैसे गुंतवल्यास चांगला परतावा मिळण्याचा अंदाज मोतीलाल ओस्वाल यांनी व्यक्त केलाय. 


दोन ते तीन दिवसांसाठी गुंतवणूक केल्यास, चांगले रिटर्न्स मिळणार?


आज भांडवली बाजार चालू झाल्यानंतर प्रमुख निर्देशांकांत घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र मोतीलाल ओस्वाल यांनी टाटाच्या ट्रेण्ट या रिटेल कंपनीत पैसे गुंतवण्याचा सल्ला दिला आहे. ट्रेण्टच्या स्टॉकमध्ये 2 ते 3 दिवस गुंतवणूक केल्यास तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो, असे मोतीलाल ओस्वालचे म्हणणे आहे. ट्रेण्ट कंपनीच्या स्टॉकने गेल्या सहा महिन्यांत 100 टक्के रिटर्न्स दिले आहेत. 


सध्या बाजाराची स्थिती काय?


आखातातील तणावाचा भारतीय शेअर बाजारावरही नकारात्मक परिणाम दिसत आहे. बाजार चालू झाल्यानंतर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 600 अंक घरंगळत 72000 वर आला होता. तर भारतीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी हादेखील 150 अंकांनी घसरून 21800 पर्यंत आला होता. या घसरणीमुळे सध्या आयटी,  मेटल, ऑटो आणि PSU बँकिंग क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्सची विक्री पाहायला मिळाली. याआधी गुरुवारी सेन्सेक्स 454 अंकांनी घसरून 72,488 वर बंद झाला होता. सध्या सेन्केक्स 72665.19 अंकावर आहे. तर निफ्टी 22036.05 अंकांवर आहे.


ट्रेण्ट कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला 


ब्रोकरेज फर्म Motilal Oswal ने Trent या कंपनीचे शेअर्स सॉर्ट टर्मसाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. हे शेअर्स खरेदी करताना एका शेअरचे टार्गेट हे 4300 रुपये ठेवावे, असे मोतीलाल ओस्वालने सूचवले आहे. 18 एप्रिल 2024 रोजी या शेअरचे मूल्य 4118 रुपये होते. आगामी काळात सॉर्ट टर्मसाठी ये शेअरमधून 4 ते 5 टक्के रिटर्न्स मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या शेअरचे 52 आठवड्यातील सर्वोच मूल्य हे  4,243.65 रुपये तर 52 आठवड्यातील सर्वाधिक कमी मूल्य 1,307 आहे 


ट्रेण्ट कंपनीने दिले आहेत बम्पर रिर्टन्स 


गेल्या वर्षभरात ट्रेण्ट या कंपनीने चांगले रिटर्न्स दिले आहेत. आकडेवारीत सांगायचं झाल्यास वर्षभरात या कंपनीच्या शेअरचे मूल्य हे 200 टक्क्यांनी वाढलेले आहे. गेल्या 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरचे मूल्य 97 टक्क्यांनी वाढले होते. 2024 साली आतापर्यंत या कंपनीने 35 टक्के रिटर्न्स दिले आहेत. BSE वर या कंपनीचे बाजार भांडवल (मार्केट कॅपिटल) 1.43 लाख कोटी रुपये आहे. 


(फक्त माहिती देणे हाच या लेखाचा उद्देश आहे. तुम्हाला कोणत्याही कंपनीत गुंतवणूक करायची असल्यास या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)


हेही वाचा :


लग्न, कर्जफेड ते वैद्यकीय उपचार, PF खात्यातील पैसे नेमके कधी काढता येतात? जाणून घ्या नियम आणि अटी!


दुबई, लंडनमध्ये आलिशान घर, तब्बल 1400 कोटींची संपत्ती, भाजपच्या महिला उमेदवाराची देशभरात चर्चा!


सोन्याचे दागिने करून गुंतवणूक करताय? थांबा, 'डिजिटल सोनं' आहे चांगला पर्याय; होणार 'हे' फायदे!