Swiggy IPO: गेल्या काही दिवसांपासून फूड डिलीवरी प्लेटफॉर्म स्विगीच्या आयपीओची सगळीकडे चर्चा आहे. मिंट या अर्थविषयक वृत्त देणाऱ्या वृत्तसंकेतस्थळाने दिलेल्या एका वृत्तानुसार हा आयपीओ नोव्हेंबर महिन्यात येण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे या आयपीओची संभाव्य तारीखही समोर आली आहे. हा आयपीओ 11.3 अब्ज डॉलर्सचा असण्याची शक्यता आहे.


काही महिन्यांपूर्वी स्विगी ही कंपनी आपल्या आयपीओच्या माध्यमातून एकूण 15 अब्ज डॉलर्स रुपये जमवणार असल्याचे सांगितले जात होते. मात्र सध्याची बाजाराची स्थिती आणि किरकोळ गुंतवणूकदारांचा कल पाहता या कंपनीने आपल्या आपयीओच्या मूल्यात घट केली आहे. देशातील आताप र्यंतच्या ह्युंदाई मोटर्स या सर्वांत मोठ्या आयपीओला गुंतवणूकदारांनी चांगला प्रतिसाद दिला होता. मात्र शेअर बाजारावर सूचिबद्ध झाल्यानंतर या कंपनीच्या शेअरचे मूल्य कमी झाले होते. ही बाब लक्षात घेऊनही स्विगीने आपल्या आयपीओचे मूल्य कमी केले आहे, असे म्हटले जात आहे. 


आयपीओ नेमका कधी येणार?  


मिळालेल्या माहितीनुसार स्विगी कंपनीचा आयपीओ गुंतवणुकीसाठी 6 नोव्हेंबर 2024 रोजी गुंतवणुकीसाठी खुला होण्याची शक्यता आहे. साधारण 30 पेक्षा अधिक अँकर इन्व्हेस्टर्स स्विगीच्या आयपीओत गुंतवणूक करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, आयपीओ खुला होण्याची अधिकृत तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. 


स्विगीचा आयपीओ नेमका कसा असू शकतो? 


स्विगी कंपनीकडून भांडवली बाजार नियामक संस्था सेबीकडे नव्याने डीआरएचपी सादर करण्यात आला होता. या डीआरएचपीनुसार स्विगी या आयपीओच्या माध्यातून एकूण 3750 कोटी रुपयांचे शेअर विकण्याची शक्यता आहे.  तर सध्याचे शेअर होल्डर्स 18.52 कोटी रुपयांचे शेअर्स विकण्याची शक्यता आहे.  


स्विगीची कोणत्या कंपन्यांशी टक्कर


स्विगी या कंपनीची झोमॅटो, झेप्टो टाटा उद्योग समूहाची बिगबास्केट या कंपन्यांशी थेट स्पर्धा आहे. स्विगी कंपनीची प्रमुख प्रतिस्पर्धी झोमॅटोदेखील आपल्या उद्योग विस्तारासाठी भांडवल उभं करण्याच्या प्रयत्नात आहे. झोमॅटो क्वालिफाईड इन्स्टीट्यूशनल प्लेसमेंटच्या माध्यमातून पैसे उभे करण्याचा प्रयत्न करत आहे. जुलै 2021 मध्ये झोमॅटो कंपनीचा आयपीओ आला होता. या कंपनीच्या आयपीओचा आकार 9375 कोटी रुपये होता. गेल्या एका वर्षात झोमॅटो कंपनीच्या शेअरमध्ये 136.68 टक्क्यांनी तेजी पाहायला मिळाली आहे. 
 
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)


हेही वाचा : 


Waaree energy : आयपीओ आला तेव्हा तुफान चर्चा, लिस्टिंगच्या एक दिवस आधी धक्कादायक माहिती समोर; गुंतवणूकदारांत धाकधूक!


दागिने तयार करणाऱ्या कंपनीने गुंतवणूकदारांवर पाडला पैशांचा पाऊस, दिवाळीनिमित्त एका शेअरवर दिले तब्बल 9 शेअर मोफत!


आला रे आला नवा आयपीओ आला! गुंतवणुकीसाठी आता शेवटचे तीन दिवस; जाणून घ्या संपूर्ण माहिती