आला रे आला नवा आयपीओ आला! गुंतवणुकीसाठी आता शेवटचे तीन दिवस; जाणून घ्या संपूर्ण माहिती
Afcons Infrastructure IPO: शापूरजी पालोनजी उद्योग समुहाची अॅफकॉन इन्फ्रास्टक्चर ही कंपनी शेअर बाजारात सूचिबद्ध होण्यासाठी तयार आहे. इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रात काम करणारी या कंपनीचा आयपीओ सध्या गुंतवणुकीसाठी खुला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयेत्या 29 ऑक्टोबरपर्यंत तुम्हाला या आयपीओत गुंतवणूक करता येणार आहे. ही कंपनी आयपीओच्या माध्यमातून 5,430 कोटी रुपये उभे करणार आहे.
या आयपीओचा किंमत पट्टा 440-463 रुपये प्रति शेअर आहे. या आयपीओच्या प्रत्येक लॉटमध्ये एकूण 32 शेअर्स आहेत.
आयपीओतून उभ्या राहिलेल्या पैशांतून ही कंपनी उपकरणं खरेदी करणार आहे. सोबतच वेगवेगळ्या गरजा पूर्ण करण्यासाठी ही कंपनी पैसे खर्च करणार आहे.
तुम्हाला या आयपीओत 29 ऑक्टोबरपर्यंत गुंतवणूक करता येईल. अयशस्वी गुंतवणूकदारांचे पैसे हे 31 ऑक्टोबरपर्यंत परत येतील. तर 4 नोव्हेंबर रोजी ही कंपनी शेअर बाजारावर सूचिबद्ध होणार आहे.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)