Waaree Energies IPO Listing: सोलार पीव्ही मॉड्यूल तयार करणाऱ्या वारी एनर्जीज या कंपनीच्या आयपीओची सध्या कगळीकडे चर्चा आहे. या आयपीओचे शेअर अलॉटमेंट पूर्ण झाले असून 28 ऑक्टोबर रोजी ही कंपनी शेअर बाजारावर सूचिबद्ध होणार आहे. दरम्यान, हा आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला होता, तेव्हा त्याला तुफान प्रतिसाद मिळाला. या आयपीओची ग्रे मार्केटमधील स्थिती पाहून अनेक गुंतवणूकदारांनी खुल्या हाताने गुंतवणूक केली. दरम्यान, ही कंपनी सूचिबद्ध होण्यासाठी अवघा एक दिवस शिल्लक राहिलेला असताना समोर आलेल्या नव्या माहितीमुळे गुंतवणूकदारांची धाकधूक वाढली आहे. 


गुंतवणूकदारांची धाकधूक वाढली


वारी एनर्जीज हा आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला झाला तेव्हा प्रत्येक शेअरचे मूल्य 1503 रुपये होते. हा आयपीओ काही दिवसांपूर्वी ग्रे मार्केटमध्ये सुस्साट धावत होता. ग्रे मार्केटमध्ये या शेअरचे मूल्य थेट 100 टक्क्यांनी वधारले होते. आता मात्र याच ग्रे मार्केटमध्ये स्थिती वेगळी आहे. ही कंपनी शेअर बाजारावर सूचिबद्ध होण्यासाठी अवघा एक दिवस शिल्लक राहिलेला असताना ग्रे मार्केटमधील घडामोडी अनेकांसाठी धाकधूक वाढवणारी ठरली आहे. वारी एनर्जीज ही कंपनी BSE आणि NSE वर 28 ऑक्टोबर रोजी शेअर बाजारावर सूचिबद्ध होणार आहे. 
आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला होता त्या काळात त्याची ग्रे मार्केटमधील स्थिती पाहून 28 ऑक्टोबर रोजी ही कंपनी आपल्या गुंतवणूकादारांचे पैसे थेट दुप्पट करणार, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. आता मात्र या कंपनीच्या शेअरचे ग्रे मार्केटमधील मूल्य कमी झाले आहे. ग्रे मार्केटमध्ये या कंपनीचे शेअर मोठ्या प्रमाणात विकले जात आहेत. हीच स्थिती पाहून दुप्पट रिटर्न्स मिळणार का? अशी शंका उपस्थित केली जात आहे.  


ग्रे मार्केटमध्ये काय स्थिती? 


शेअर अलॉटमेंटच्या दिवशी ग्रे मार्केटमध्ये या शेअरचे मूल्य 1590 रुपये म्हणजेच साधारण 105.79 टकक्यांवर होते. आता याच शेअरचे मूल्य 1225 रुपये प्रति शेअर म्हणजेच साधारण 81.5 टक्क्यांच्या जीएमपीवर आहे. म्हणजेच जीएमपीमध्ये वारी एनर्जीजचा शेअर साधारण 23 टक्क्यांनी घसरला आहे. याच कारणामुळे गुंतणूकदारांत सध्या धाकधूक आहे. दरम्यान, ग्रे मार्केटमध्ये सध्या चढउतार होत असले तरी कंपनीची सध्याची स्थिती आणि लिस्टिंगच्या दिवशीचा शेअर बाजाराचा कल यावर वारी एनर्जीजचा शेअर शेअर बाजारात किती रुपयांवर सूचिबद्ध होणार, हे अवलंबून आहे, असे या क्षेत्रातील तज्ज्ञ सांगत आहेत. 


Waaree Energies आयपीओला मिळाला होता दमदार रिस्पॉन्स


वारी एनर्जीज ही कंपनी आयपीओच्या माध्यमातून 4,321.44 कोटी रुपये उभे करणार आहे. 21 ते 23 ऑक्टोबर या काळात हा आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला होता. या काळात आयपीओला दमदार प्रतिसाद मिळाला होता. हा आयपीओ 79.44 पटीने सबस्क्राईब करण्यात आला. या आयपीओच्या माध्यमातून कंपनीने एकूण 3,600.00 कोटी रुपयांचे नवे शेअर जारी केले आहेत. यातील काही शेअर्स हे ऑफर फॉर सेल होते तर काही फ्रेश शेअर्स होते. फ्रेश शेअर्समधून उभा राहिलेला पैसा हा कंपनीच्या विस्तारासाठी वापरला जाणार आहे.  


हेही वाचा :


दागिने तयार करणाऱ्या कंपनीने गुंतवणूकदारांवर पाडला पैशांचा पाऊस, दिवाळीनिमित्त एका शेअरवर दिले तब्बल 9 शेअर मोफत!


आला रे आला नवा आयपीओ आला! गुंतवणुकीसाठी आता शेवटचे तीन दिवस; जाणून घ्या संपूर्ण माहिती