Sky Gold Bonus Share: ज्वेलरी, जेम्स अँड वाचेस कंपनी स्काय गोल्ड (Sky Gold) या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना दिवाळाची खास भेट दिली आहे. ही कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर देणार आहे. 9:1 या प्रमाणात कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना शेअर्सचे वाटप करणार आहे. या कंपनीने याआधी सप्टेंबर 2022 मध्ये गुंतवणूकदारांना लाभांश जाहीर केला होता. हा एक मल्टिबॅगर स्टॉक आहे. या कंपनीने आपल्या शेअरधारकांना सहा महिन्यांत 215 टक्क्यांनी रिटर्न्स दिले आहेत.
Sky Gold Bonus Share: 1 शेअरवर मिळणार 9 शेअर मोफत
स्काय गोल्ड या कंपनीच्या स्टॉक एक्सचेंज फाईलिंगनुसार ही कंपनी, 10 रुपये दर्शनी मूल्य असणाऱ्या एका शेअरवर 9 बोनस शेअर्स देणार आहे. कंपनीने या बोन शेअर्ससाठी सध्यातरी रेकॉर्ड डेट जाहीर केलेली नाही. याआधी Sky Gold या कंपनीने 2022 साली गुंतवणूकदारांना बोनस शेअर (Bonus Share) दिले होते. तेव्हा पात्र शेअरधारकांना प्रत्येक एका शेअरवर एक शेअर मोफत मिळाला होता.
बोनस शेअर म्हणजे काय?
बोनस शेअर हे कंपनीकडून गुंतवणूकदारांना मोफत दिले जातात. गुंतवणूकदाराकडे असलेल्या शेअर्सच्या प्रमाणतात ठरवल्यानुसार बोनस शेअर्स दिले जातात.
Sky Gold Share: 2 वर्षांत 2061 टक्क्यांनी रिटर्न्स
Sky Gold का स्टॉक मल्टिबॅगर स्टॉक आहे. शुक्रवारी या शेअरमध्ये 3.83 टक्क्यांनी घसरण झाली. शुक्रवारी या शेअरचे मूल्य 3434.35 रुपये होते. या शेअरचे 52 आठवड्यातील सर्वाधिक मूल्य 3,687 रुपये आहे. तर 52 आठवड्यातील नीचांकी मूल्य 680.35 रुपये आहे. या कंपनीचे बाजार मूल्य 5,032.70 कोटी रुपये आहे. हा शेअर एका आठवड्यात 7 टक्के, 2 आठवड्यांत 14 टक्के, एका महिन्यात 36 टक्के तर 3 महिन्यांत 47 टक्क्यांनी वाढला आहे.
गेल्या सहा महिन्यात या शेअरमध्ये 216 टक्क्यांनी वाढ झालेली आहे. या वर्षात आतापर्यंत या शेअरमध्ये 245 टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या वर्षी या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 360 टक्क्यांनी रिटर्न्स दिले होते. दोन वर्षांत या कंपनीने गुंतवणूकदारांना 2061 टक्क्यांनी रिटर्न्स दिलेले आहेत. तीन वर्षांत हा शेअर तब्बल 3613 टक्क्यांनी वाढलेला आहे.
हेही वाचा :
आला रे आला नवा आयपीओ आला! गुंतवणुकीसाठी आता शेवटचे तीन दिवस; जाणून घ्या संपूर्ण माहिती