एक्स्प्लोर

Share Market : सेन्सेक्स, निफ्टीची वधारत सुरुवात, नफा वसुलीने तेजीला लावला ब्रेक

Share Market Opening On 05th April:  शेअर बाजारात प्री-ओपनिंगमध्ये आज सकारात्मक संकेत दिसून आले.

Share Market Opening On 05th April:  शेअर बाजारात सोमवारी असलेली तेजी मंगळवारीही कायम राहण्याची शक्यता आहे. मंगळवारी शेअर बाजार सुरू झाला तेव्हा 174 अंकांनी वधारला. प्री-ओपनिंगमध्ये सकारात्मक संकेत दिसून आले. सोमवारी अमेरिकन शेअर बाजारही वधारत बंद झाला होता. तर आशियाई शेअर बाजारातही तेजीचे संकेत मिळत आहेत. शेअर बाजाराच्या प्री-ओपनिंगमध्ये सेन्सेक्स 174 अंकांनी वधारला होता. मात्र, नफा वसुली सुरू झाल्याने तेजीला ब्रेक लागला. 


सेन्सेक्स आज 60,786 अंकांवर सुरू झाला. निफ्टी 27 अंकांनी वधारत 18080 अंकांवर सुरू झाला. आज व्यवहार सुरू झाला तेव्हा निफ्टीतील 50 पैकी 27 शेअर्समध्ये तेजी दिसून आली. तर, 23 शेअरमध्ये घसरण दिसून आली. सेन्सेक्समधील 30 पैकी 15 शेअर्समध्ये तेजी तर 15 शेअर्समध्ये घसरण दिसून येत आहे. बँक निफ्टीमध्ये नफा वसुली दिसून आली. बँक निफ्टीत 283 अंकांची घसरण दिसून आली. बँक निफ्टी निर्देशांक 38,419 अंकावर व्यवसाय करत आहे. 

Share Market : सेन्सेक्स, निफ्टीची वधारत सुरुवात, नफा वसुलीने तेजीला लावला ब्रेक

निफ्टीमध्ये महिंद्रा अॅण्ड महिंद्राच्या शेअर्समध्ये 1.64 टक्के, सन फार्मामध्ये 1.47 टक्के, मारुती 1.35 टक्के, टीसीएस 1.07 टक्के, पॉवर ग्रीडमध्ये 0.95 टक्के, एनटीपीसीमध्ये 0.87 टक्के. टेक महिंद्रा 0.81 टक्के आणि एचयूएलमध्ये 0.72 टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून आले.

सोमवारी बाजारात तेजी

शेअर बाजारात सोमवारी दिवसभर तेजी राहिली. शेअर बाजार सुरू झाल्यानंतर सेन्सेक्स, निफ्टीत तेजी दिसून आली होती. बाजार बंद होताना ही तेजी कायम राहिली. सेन्सेक्स आणि निफ्टीत दोन टक्क्यांची वाढ दिसून आली. सेन्सेक्सने आज 60 हजार अंकाचा टप्पा ओलांडला. तर, निफ्टीने 18 हजारांचा टप्पा ओलांडला. 

एचडीएफसी आणि एचडीएफसी बँकेच्या विलीनीकरणाच्या बातमीने या दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली. बाजार बंद झाला तेव्हा सेन्सेक्स 1,335.05 अंकांनी म्हणजे 2.25 टक्क्यांनी वधारला. सेन्सेक्स 60,611.74 अंकांवर बंद झाला. तर, निफ्टीत 382.90 अंकांनी म्हणजे जवळपास 2.17 टक्क्यांनी वधारला. आज 18,053.40 अंकांवर बंद झाला. 

 

महत्त्वाच्या बातम्या

ऑटोचालकाच्या घरात सापडले 3 कोटी रुपये, दोन दिवस झाले तरी कोणीच केला नाही दावा, नेमके पैसे कोणाचे?  
ऑटोचालकाच्या घरात सापडले 3 कोटी रुपये, दोन दिवस झाले तरी कोणीच केला नाही दावा, नेमके पैसे कोणाचे?  
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
देशातील 'या' बँकेचा मोठा निर्णय, नियमांमध्ये केला बदल, ग्राहकांच्या खिशाला लागणार कात्री? तुमच खातं कोणत्या बँकेत?
देशातील 'या' बँकेचा मोठा निर्णय, नियमांमध्ये केला बदल, ग्राहकांच्या खिशाला लागणार कात्री? तुमच खातं कोणत्या बँकेत?
सणासुदीच्या काळात ग्राहकांना झटका! साखरेच्या दरात मोठी उसळी! 18 दिवसात 18 रुपयांची वाढ, दर वाढण्याचं नेमकं कारण काय? 
सणासुदीच्या काळात ग्राहकांना झटका! साखरेच्या दरात मोठी उसळी! 18 दिवसात 18 रुपयांची वाढ, दर वाढण्याचं नेमकं कारण काय? 

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Cab Driver Viral Video: मुंबईतील मराठी तरुणाचा अमराठी कॅब चालकासोबत वाद, ओटीपी मराठीत सांगताच ड्रायव्हर भडकला, म्हणाला, 'अ‍ॅप इंग्रजी, मग....'
मुंबईतील मराठी तरुणाचा अमराठी कॅब चालकासोबत वाद, ओटीपी मराठीत सांगताच ड्रायव्हर भडकला, म्हणाला, 'अ‍ॅप इंग्रजी, मग....'
Mumbai Crime News : मुंबईत पुतण्याने काकाला संपवलं, मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली लपवला अन् स्वत:च पोलिसांकडे जाऊन बोलला..
मुंबईत पुतण्याने काकाला संपवलं, मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली लपवला अन् स्वत:च पोलिसांकडे जाऊन बोलला..
Ashok Saraf andn Devendra Fadnavis: अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
Free School Bag: आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
Amit Thackeray on ABVP: मुलींचा हात धरल्यावर आम्ही तुम्हाला मारणारच! अमित ठाकरेंचा 'अभाविप'ला इशारा, साठ्ये महाविद्यालयातील राड्याबाबत काय म्हणाले?
मुलींचा हात धरल्यावर आम्ही तुम्हाला मारणारच! अमित ठाकरेंचा 'अभाविप'ला इशारा, साठ्ये महाविद्यालयातील राड्याबाबत काय म्हणाले?
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Embed widget