एक्स्प्लोर

Bank Layoff: कर्मचारी कपातीचं वारं बँकिंग क्षेत्रातही, 7000 नोकऱ्या संपवण्याचा 'या' बँकेचा निर्णय, एआय आणि रोबोटची मदत घेणार

Standard Chartered Bank Layoffs: स्टँडर्ड चार्टर्ड बँक 2030 पर्यंत एआय आणि ऑटोमेशनद्वारे 7 हजारांहून अधिक नोकऱ्या रद्द करण्याचं नियोजन करत आहे.

Standard Chartered Bank Layoffs नवी दिल्ली: स्टँडर्ड चार्टर्ड बँक येत्या चार वर्षात म्हणजेच 2030 पर्यंत 7 हजारांहून अधिक नोकऱ्या रद्द करण्याचं नियोजन करत आहे. बँक नफा वाढवण्यासाठी एआय आणि ऑटोमेशनचा वापर वाढवत आहे.  रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार या बँकेचं मुख्यालय लंडनमध्ये असून बँक 2030 पर्यंत कॉर्पोरेट विभागांमधून जवळपास 15 टक्के पदं कमी करण्याचं नियोजन करत आहे.  

रॉयटर्सच्या अंदाजानुसार या पुनर्रचनेमुळं बँकेच्या 52 हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांपैकी 7000 हून अधिक कर्मचाऱ्यांवर परिणाम होऊ शकतो. स्टँडर्ड चार्टर्ड बँकेत जगभरात 82 हजारांहून अधिक लोक काम करतात. बँकेचे सीईओ बिल विंटर्स यांच्या मतानुसार हे पाऊल खर्च कमी करण्यासाठी नसून तंत्रज्ञानाच्या बदलाचा भाग आहे. 

सीईओ बिल विंटर्स यांच्या मते लोकांना अधिकचं कौशल्य मिळवायचं असून त्यांना पुढं जायचं आहे. आम्ही त्यांना दुसऱ्या पदावर काम करण्याची पूर्ण संधी देत आहे. बँकेनं म्हटलं की काही कर्मचाऱ्यांना नव्या पदांसाठी प्रशिक्षित आणि शिफ्ट केलं जाणार आहे.  

AI आणि ऑटोमेशनमुळं बँकिंग बदलणार 

बँक सुरक्षा वाढवणे आणि नफा मिळवण्यासाठी एआय आणि ऑटोमेशनचा वापर मोठ्या प्रमाणावर करेल. विंटर्सनं म्हटलं की काही प्रकरणांमध्ये कमी खर्चातील मानवी संसाधनांना वित्तीय आणि गुंतवणुकीच्या साधनांमध्ये बदलण्यासारखं आहे. बँकेच्या माहितीनुसार याचा मोठा परिणाम चेन्नई, बंगळुरु, क्वालालंपूर यासह इतर देशातील बॅक ऑफिसमधील केंद्रावर होणार आहे. 

जपानच्या वित्तीय समूहातही कर्मचारी कपात 

जपानमधील प्रमुख वित्तीय संस्था  'मिजूहो फायनान्शिअल ग्रुप'नं यापूर्वीच ऑटोमशन आणि नव्या तंत्रज्ञानाच्या आधारे  पुढील 10 वर्षात 5000 नोकऱ्या कमी करण्याची घोषणा केली होती. 

स्टँडर्ड चार्टर्ड बँक आणि 'मिजूहो फायनान्शिअल ग्रुप' यांच्या निर्णयाकडे पाहिलं असता जगभरातील बँकिंग इंडस्ट्रीत एक मोठा बदल येत आहे. वित्तीय संस्था जागतिक बाजारात स्वत:ला स्पर्धाक्षम आणि अधिकाधिक नफा मिळवण्यासाठी एआय टूल्सचा वापर करत आहेत.  

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

एका दिवसात किती रेल्वे गाड्या चालवल्या जातात? किती होते कमाई आणि किती होतो खर्च? जाणून घ्या सविस्तर माहिती
एका दिवसात किती रेल्वे गाड्या चालवल्या जातात? किती होते कमाई आणि किती होतो खर्च? जाणून घ्या सविस्तर माहिती
वर्षभरात तुम्ही बँक खात्यात किती पैसे भरु शकता? काय सांगतो बँकेचा नियम? जाणून घ्या सविस्तर माहिती 
वर्षभरात तुम्ही बँक खात्यात किती पैसे भरु शकता? काय सांगतो बँकेचा नियम? जाणून घ्या सविस्तर माहिती 
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
चार भाऊ एकत्र असले तर PM किसान योजनेचा लाभ नेमका कोणाला मिळणार? काय सांगतो नियम? 24 वा हप्ता कधी मिळणार? 
चार भाऊ एकत्र असले तर PM किसान योजनेचा लाभ नेमका कोणाला मिळणार? काय सांगतो नियम? 24 वा हप्ता कधी मिळणार? 
Advertisement

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवस काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवस काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
Prithviraj Chavan : गोपीनाथ मुंडेंबाबत माझ्या मनात आदर, ते काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ची निवडणूक जिंकलो असतो : पृथ्वीराज चव्हाण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ला हारलो नसतो, मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचं नाव सुचवलं असतं: पृथ्वीराज चव्हाण
Revanth Reddy: काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
Embed widget