Emcure Pharma IPO : सध्या शेअर बाजारात (Share Market) गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दुसरीकडे शेअर बाजारात सूचिबद्ध होणाऱ्या कंपन्यांची संख्याही वाढत आहे. असे असतानाच आता शेयर बाजार नियामक संस्था सेबीने (SEBI) शार्क टँक इंडिया (Shark Tank India) फेम नमिता थापर (Namita Thapar) यांच्या वडिल्यांच्या मालकीच्या असलेल्या एमक्यअर फार्मा (Emcure Pharma) या कंपनीच्या आयोपीओला मंजुरी दिली आहे. ही कंपनी आपल्या आयोपीओत नव्या शेअर्ससह ऑफर फॉर सेलच्या (Offer For sale) माध्यमातूनही निधी उभा करणार आहे. ही कंपनी आयपीओच्या फ्रेश इक्विटीने 800 कोटी रुपये जमा करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर कंपनीचे प्रमोटर्स आणि शेअरहोल्डर्स ऑफर फॉर सेलच्या माध्यमातून 1.36 कोटी शेअर्स विकणार आहेत.   


दोन महिन्यांत येऊ शकतो आयपीओ


सेबीने एमक्युअर फार्मा (Emcure Pharma) या कंपनीच्या आयपीओला मान्यता दिली आहे. या मंजुरीनंतर आगामी दोन महिन्यांत या कंपनीचा आयपीओ प्रत्यक्ष गुंतवणुकीसाठी खुला होऊ शकतो, असा अंदाज व्यक्त केला जाऊ शकतो. कंपनीने डिसेंबर 2023 मध्ये आयपीओ आणण्यास मंजुरी द्यावी अशी मागणी करत ड्रॉफ्ट पेपर दाखल केले होते. दाखल केलेल्या कागदपत्रांनुसार आयपीओतून आलेल्या पैशांतून कंपनी आपले कर्ज फेडणार आहे. तसेच उर्वरित रक्कम उद्योगात गुंतवणार आहे. 2022 साली युक्रेन-रशिया युद्धामुळे शेअर बाजारात मोठी पडझड झाली. त्यामुळे एमक्यूअर फार्माने आपली आयपीओ आणण्याची योजना पुढे ढकलली होती. 


500 वैज्ञानिक, 11 हजार कर्मचारी


एमक्युअर फार्मा या कंपनीने जेपी मॉर्गन, जेफ्फीरीज, कोटक या बँकेला इन्व्हेस्टमेंट बँक म्हणून नियुक्त केलं आहे. शार्क टँकच्या जज नमिता थापर यांचे वडील सतीश मेहता यांनी 1981 मध्ये फक्त तीन लाख रुपयांच्या भांडवलात एमक्योअर फार्मा ही कंपनी उभी केली होती. फार्मा क्षेत्रातील ही सर्वांत मोठी 13 वी कंपनी आहे.  गेल्या 40 वर्षांत या कंपन्यांनी 19 उपकंपन्या उभ्या केल्या आहेत. या कंपनीच्या रिसर्च अँड डेव्हलपमेंट टीममध्ये एकूण 500 वैज्ञानिक आहेत. या कंपनीत एकूण 11,000 कर्मचारी काम करतात.


हेही वाचा :


अब्जाधीश मुकेश अंबानींच्या पत्नी नीता अंबानी करायच्या 'ही' नोकरी; पगाराची रक्कम वाचून व्हाल थक्क!


बँक एफडीवर असतो धोका? जाणून घ्या फिक्स्ड डिपॉझिटच्या माहीत नसलेल्या 'या' गोष्टी


एका दिवसात शेअर वाढला अन् झाला चमत्कार, अॅपल, मायक्रोसॉफ्टला मागे टाकत 'ही' कंपनी ठरली सर्वांत मोठी!