मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि नीता अंबानी (Nita Ambani) हे दाम्पत्य नेहमीच चर्चेत असते. या दाम्पत्याचे पुत्र अनंत अंबानी यांचा  राधिका मर्चंट यांच्याशी साखरपुडा झाला. आता लवकरच ही जोडी विवाहबंधनात अडकणार आहे. नीता अंबानी या अब्जाधीश मुकेश अंबानी यांच्या पत्नी असल्या तरी त्यांचे स्वत:चे असे वेगळे व्यक्तीमत्त्व आहे. आपले कौशल्य आणि नेतृत्त्वाची चुणूक दाखवत नीता अंबानी आज वेगवेगळ्या संस्थांची धुरा हाकतात. विशेष म्हणजे लग्न झाल्यानंतर अवघ्या एका वर्षाने त्यांनी नोकरी करण्याचा निर्णय घेतला होता.   


नीता अंबानी शिक्षिका म्हणून करायच्या काम


मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचे 1985 मध्ये लग्न झाले. या दाम्पत्याने सिमी ग्रेवाल यांना एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीत नीता अंबानी यांनी त्यांच्या या नोकरीबाबत सविस्तर सांगितलेले आहे. सनफ्लावर नर्सरीमध्ये त्यांनी शिक्षिका म्हणून काम केलेले आहे.  


नीता अंबानी यांना किती रुपये मिळायचे


सिमी ग्रेवाल यांच्याशी बातचित करताना नीता अंबानी यांनी या शिक्षिकेच्या नोकरीविषयी अधिक माहिती दिली आहे. शिक्षिका असताना मला प्रतिमहिना 800 रुपये मिळायचे असे, नीता अंबानी यांनी या मुलाखतीत सांगितलेले आहे. माझ्या या कामामुळे लोक माझी खिल्ली उडवायचे. मात्र या नोकरीमुळे मला फार समाधान मिळायचे, असे नीता अंबानी यांनी सांगितले होते. त्यानंतर नीता अंबानी यांचा पगार मी घ्यायचो. या पगारातून आम्ही जेवणाचे पैसे द्यायचो, असे मुकेश अंबानी यांनी हसत हसत सांगितले होते. सिमी ग्रेवाल यांनी मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांची घेतलेली ही मुलाखत फार जुनी आहे. पण या मुलाखतीतून नीता अंबानी यांच्या जीवनाचे अनेक पैलू उलगडले आहेत. 


अनंत-राधिका यांचा 12 जुलै रोजी विवाह


दरम्यान, नीता अंबानी आणि मुकेश अंबानी यांचा छोटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा साखरपुडा झाला. या साखरपुड्याची संपूर्ण भारतात चर्चा होती. या समारंभाला बॉलिवूड तसेच अन्य क्षेत्रातील दिग्गज उपस्थित होते. बिल गेट्स, मार्क झुकरबर्ग, रिहाना, इव्हांका ट्रम्प आदी दिग्गज व्यक्ती अनंत-राधिका यांच्या साखरपुड्याच्या सोहळ्याला उपस्थित होते. येत्या 12 जुलै रोजी हे दोघेही लग्नबंधनात अडकणार आहेत. 


हेही वाचा :


तुमच्या पूर्वजांनी 'ही' एक गोष्ट केली असती तर तुमचं नशीब फळफळलं असतं; एका क्षणात झाले असता लखपती!


बँक एफडीवर असतो धोका? जाणून घ्या फिक्स्ड डिपॉझिटच्या माहीत नसलेल्या 'या' गोष्टी